Home » कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी आहे लाभदायक

कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी आहे लाभदायक

by Jyotsna Kulkarni
0 comment
Lukewarm Water Benefits
Share

आपल्याला आजच्या आधुनिक काळात ऑफिस, काम, घर, जबाबदाऱ्या आदी सर्वच गोष्टींना सांभाळताना नाकी नऊ येतात. सर्वच नीट संभाळताना स्त्री असो किंवा पुरुष सर्वच तारेवरची कसरत करत असतात. आजच्या धकाधकीच्या युगात आपल्या आरोग्याकडे बघण्यासाठी आपल्याला वेळच मिळत नाही. आपण सतत अनेक गोष्टींच्या मागे पळत असतो. त्यामुळे स्वतःसाठी आपल्याला वेळच मिळत नाही.

पण हे खरंच योग्य आहे का? आपण आपल्या आरोग्याकडे वेळेअभावी दुर्लक्ष करतो पण याचे कधी कधी आपल्याला मोठे परिणाम भोगावे लागतात. त्यासाठी आपण जास्त काही न करता आपल्या सवयी आणि आपल्या रोजच्या आयुष्यात काही छोटे छोटे बदल केले तरी ते मोठे फायदे देतात.

जसे पाणी तर आपण रोज न चुकता पितो. दररोज किमान २ लिटर पाणी पिणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी महत्वाचे आहे. आता पाणी पिताना जर आपण साधे, थंड, फ्रिजचे पाणी न पिता ते कोमट करून प्यायलो तर याचा मोठा आणि सकारत्मक परिणाम आपल्याला आपल्या शरीरावर दिसायला लागेल. आता हा उपाय अतिशय सोपा आणि विना खर्चिक आहे. ऑफिसमध्ये देखील कोमट पाणी सहज उपलब्ध होते. नसेल तर थर्मासमध्ये देखील कोमट पाणी ठेऊन ते तुम्ही पिऊ शकता. आता रोज कोमट पाणी प्यायल्यामुळे शरीरावर कोणते आणि कसे परिणाम होतात चला जाणून घेऊया.

– जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्यास अन्न जलद पचते आणि योग्य पोषक तत्वे शरीराला सहज वितरीत करतात. कोमट पाणी पिण्याचा आणखी एक फायदा म्हणजे ते बद्धकोष्ठतेच त्रास कमी होतो.

– गरम पाणी आपल्या शरीरात पचनाच्या वेळी गमावलेल्या द्रवपदार्थांची भरपाई करण्यासाठी लाभदायक ठरते. गरम पाणी नेहमी विषारी पदार्थांविरुद्ध कार्य करते आणि शरीराला निर्जलीकरणापासून वाचवत शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

– वजन कमी करण्यास कोमट पाणी मदत करते. जेवण करण्यापूर्वी कोमट पाणी पिल्याने चयापचय दर ३२ टक्क्यांनी वाढू शकतो. त्यामुळे सूज येणे आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्याही बऱ्याच प्रमाणात कमी होतात.

Lukewarm Water Benefits

– जेवणानंतर गरम पाणी पिण्याचे महिलांसाठी चांगले आरोग्य फायदे आहेत. विशेषतः जर तुम्ही दररोज कोमट पाणी प्यायले तर ते गर्भाशयातील कडक स्नायूंना आराम मिळतो आणि रक्ताभिसरण सुधारते. यामुळे मासिक पाळी दरम्यान होणारी पोटदुखी कमी होते.

– गरम पाणी प्यायल्यामुळे शरीरात रक्त प्रवाह वाढवण्यास मदत करते. हे स्नायूंना आराम करण्यास आणि वेदना कमी करण्यास देखील मदत करते.

– हिवाळ्यात सकाळी लवकर उठल्यावर कोमट पाणी प्यायल्यास आळस कमी होऊन शरीर पूर्ण सक्रियपणे काम करेल. विशेषत: याचा हिवाळ्यात सर्दी आणि संसर्गापासून चांगला आराम मिळतो.

– गरम पाणी तणाव कमी करण्यास आणि विश्रांतीस प्रोत्साहन देण्यास मदत करू शकते. त्यामुळे शक्य तितके कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते.

– कोमट पाणी पिणे तात्पुरते दातदुखी दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. हे हिरड्यांमध्ये रक्त प्रवाह उत्तेजित करते आणि त्यांचे आरोग्य सुधारते. हे दातांमधून टार्टर काढून टाकण्यास मदत करते.

– कोमट पाणी पिल्यामुळे शरीराची घाण साफ होते. रक्त स्वच्छ करण्यासही कोमट पाणी मदत करते. शरीराची त्वचा तजेलदार होऊन कोरड्या त्वचेत आर्द्रता निर्माण करण्याचे काम करते. शिवाय मुरुमांचा त्रास कमी होतो आणि त्वचेचे सौंदर्यही टिकते.

– सर्दी झाल्यावर कोमट पाणी पिण्याने कफ वितळतो. दिवसातून तीन किंवा चार वेळा कोमट पाणी घेतल्यास थंडीत आराम मिळेल. कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून गुळण्या केल्याने देखील खोकला बरा होऊ शकतो.

– कोमट पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील मेटाबॉलिजम अ‍ॅक्टिव्ह होऊ शकते. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी वितळण्यास मदत मिळते. इतकंच नाही तर कोमट पाणी पिण्यामुळे आतडी स्वच्छ होण्यास मदत मिळते.

– सकाळी उपाशीपोटी तुम्ही कोमट पाण्याचे सेवन केल्यास, पचनक्रिया अधिक सुरळीत होते. अपचन अथवा गॅससारखी समस्या तुम्हाला असेल तर तुम्ही सकाळी उठल्यावर कोमट पाणी फायदेशीर आहे.

– ज्या लोकांना जास्त थकवा येण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी कोमट पाणी हे सर्वोत्तम उपचार आहे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी नियमितपणे कोमट पाणी प्यायल्याने थकवा येण्याची समस्या दूर होईल.

(टीप : कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.