काही वर्षांपूर्वी सगळ्यांना एकच प्रश्न पडला होता आणि तो म्हणजे, ‘कटप्पाने बाहुबली को क्यो मारा?’ जणू काही हा जागतिक प्रश्नच निर्माण झाला होता. मात्र आता याच प्रश्नासारखा एक प्रश्न कमालीचा गाजत आहे, आणि जो तो एकमेकांना हाच प्रश्न विचारताना दिसत आहे. सोशल मीडिया देखील याच प्रश्नाने व्यापले आहे. आणि तो प्रश्न म्हणजे, ‘खरंच एसीपी प्रद्युम्न यांचा मृत्यू झाला आहे?’ सगळीकडे हा एकच प्रश्न फिरताना दिसतोय. आता हे कितपत खरे आहे की खोटे हे सीआयडीच्या येणाऱ्या भागांमध्ये समजेलच.(Shivaji Satam)
मात्र ही एसीपी प्रद्युम्नची भूमिका जगप्रसिद्ध करणारे शिवाजी साटम हे अव्वल दर्जाचे अभिनेते असून, त्यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये आपल्या दर्जेदार अभिनयाची चुणूक दाखवली आहे. आज एसीपी प्रद्युमन सीआयडीची ओळख असण्याचे एकमेव कारण म्हणजे शिवाजी साटम आणि त्यांचा प्रभावी अभिनय.(Shivaji Satam News)
‘कुछ तो गडबड है’ हे त्यांच्या तोंडी असलेले पालुपद आज त्यांची ओळख आहे. यावरून किती विनोद निर्माण झाले तरी एसीपी प्रद्युमन या वाक्याशिवाय अपूर्णच आहे. एसीपी प्रद्युमन ही सीआयडीची दुसरी ओळख आहे असे, म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आज आपण याच शिवाजी साटम यांच्याबद्दल रंजक माहिती जाणून घेणार आहोत.(Marathi Latest News)
मूळचे मुंबईकर असलेल्या शिवाजी साटम यांचा जन्म २१ एप्रिल १९५० रोजी मुंबईत झाला. त्यांनी फिजिक्स विषयात ग्रॅज्युएशन केल्यानंतर बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये डिप्लोमा केला. छोट्या पडद्यावरील तुफान गाजलेल्या ‘सीआयडी’ या मालिकेमुळे ते घराघरांत पोहोचले आणि एसीपी प्रद्युमन नावाने प्रसिद्ध झाले. तब्बल २१ वर्षे शिवाजी साटम यांनी सीआयडी मालिकेत ‘एसीपी प्रद्युम्न’ ही व्यक्तिरेखा साकारली. लहानपणापासूनच त्यांचा ओढा अभिनयाकडे होता.(Top Stories)
=========
हे देखील वाचा : Pamban Bridge : जाणून घ्या भारतातील पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिजची वैशिष्ट्ये
==========
मात्र मोठे झाल्यानंतर त्यांनी सेंट्रल बँकेत नोकरी सुरु केली आणि सोबतच अभिनयाचे धडे देखील गिरवण्यास आरंभ केला. अशातच त्यांची ओळख मराठी रंगभूमीचे ज्येष्ठ अभिनेते बाळ धुरी यांच्याशी झाली. धुरी यांनी शिवाजी साटम यांच्यातली ग्रेस आणि अभिनयाबाबतचे प्रेम ओळखले. त्यांनी शिवाजी यांना अभिनयात पदार्पण करण्यासाठी संधी दिली. शिवाजी साटम यांनी १९८८ मध्ये रिलीज झालेल्या ‘पेस्टोनजी’ या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.(Marathi Top News)
पुढे शिवाजी यांनी मागे वळून कधीच पाहिले नाही. ते सतत एक एक काम करत राहिले. मात्र या कामाचा परिणाम हळूहळू त्यांच्या बँकेतील कामावर होऊ लागला. आणि पुढे त्यांनी बँकेतील नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. याबद्दल एका मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते की, “शूटिंग आणि नोकरी या गोष्टीत ताळमेळ घालणे मला प्रचंड कठीण जात होते. पण तरीही मी नोकरी सोडली नाही. मी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अनेक वर्षं काम करत होतो. नोकरी सांभाळून मी अभिनय करत होतो. माझ्या बँकेतील सहकाऱ्यांनी आणि सिनियर्सने मला खूपच समजून घेतले. चित्रीकरणामुळे बँकेत जाणे शक्य नसल्यास मी एकदम सकाळी किंवा रात्री उशिरा बँकेत जाऊन माझी कामं पूर्ण करत असे. (Social News)
मात्र या गोष्टीवर कधीच कोणी आक्षेप घेतला नाही. त्याचमुळे मी २००० पर्यंत माझी नोकरी करू शकलो. पण नंतर माझी पत्नी खूप आजारी पडली. तिच्या आजारपणामुळे आणि मालिकेच्या चित्रीकरणामुळे मला नोकरीला जाणे शक्य होतच नव्हते. सतत होत असलेल्या दांड्यामुळे मला बँकेकडून पत्र आले. तेव्हा मला जाणवले की आता काहीही अड्जस्ट होणार नाही आणि आपल्याला नोकरी करणे जमणार नाही म्हणून मी राजीनामा दिला.”(Marathi News)
शिवाजी साटम यांनी ‘नायक’, ‘वास्तव’, ‘गुलाम-ए-मुस्तफा’, ‘चायना गेट’, ‘यशवंत’, ‘जिस देश में गंगा रेहता हैं’ ‘सूर्यवंशम’, ‘हू तू ‘तू’, ‘100 डेज’, ‘इंग्लिश अगस्त’, ‘यशवंत’, ‘जोड़ी नंबर 1’, ‘कुरुक्षेत्र’, ‘फिलहाल’, ‘दे धक्का’, ‘जुनं फर्निचर’, ‘शिवाजी पार्क’ अशा अनेक हिंदी, मराठी सिनेमांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. तर १९८० सालात आलेल्या ‘रिश्ते नाते’ या मालिकेतून त्यांनी टेलिव्हिजनवर एण्ट्री केली. त्यांनी ‘एक शून्य शून्य’ या मराठी मालिकेत देखील पोलिसांची भूमिका साकारली होती.(Marathi)
शिवाजी साटम यांनी एका मुलाखतीवेळी त्यांच्या तुफान गाजलेल्या ‘सीआयडी’ मालिकेतील ‘एसीपी प्रद्युम्न’ या भूमिकेविषयी सांगितले होते. त्यांना ही भूमिका कशी मिळाली होती, याबद्दल त्यांनी सांगितले होते की, सीआयडी या मालिकेचे निर्माते बी. पी. सिंग आणि शिवाजी साटम हे अनेक वर्षांपासूनचे जवळचे मित्र आहेत. त्या दोघांनी ‘एक शून्य शून्य’ या मराठी मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेतले त्यांचे काम सिंग यांना आवडले होते, त्यामुळे शिवाजी साटमच एसीपी प्रद्युमन या भूमिकेसाठी योग्य असल्याचे बी. पी. सिंग यांना वाटले. जेव्हा शिवाजी साटम यांना या मालिकेविषयी विचारले आणि त्यांनी देखील लगेचच या मालिकेत काम करण्यास होकार दिला. (Shivaji Satam Marathi News)
दरम्यान शिवाजी साटम यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, शिवाजी साटम आणि अरुणा साटम यांचं अरेंज मॅरेज होतं. शिवाजी साटम यांच्या वडिलांच्या इच्छेने शिवाजी साटम आणि अरुणा साटम यांचं लग्न झालं.(Shivaji Satam Journey)
शिवाजी साटम यांचे वडील जिमनॅस्ट होते. सोबतच ते उत्कृष्ट कुस्तीपटू देखील होते. ते रोज कुस्ती खेळायला जायचे. तर त्यांची बहीण ऍथलिट होती. शिवाजी साटम यांच्या पत्नी महाराष्ट्र कबड्डी संघाच्या कॅप्टन होत्या. त्यांना छत्रपती शिवाजी पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. पण शिवाजी साटम आणि अरुणा साटम यांचा संसार केवळ २४ वर्षच होऊ शकला. कारण २००० साली अरुणा साटम यांचं कर्करोगाने निधन झालं. त्यांच्यावर तब्बल सात वर्ष उपचार सुरु होते.(Shivaji Satam Personal Life)
=========
हे देखील वाचा : Airports : ‘ही’ आहेत जगातील सर्वाधिक धोकायदायक विमानतळं
==========
शिवाजी साटम हे ‘गुलाम-ए-मुस्तफा’ सिनेमाचं शुटिंग करत असताना त्यांच्या पत्नीचं निधन झालं. या अतिशय कठीण परिस्थितीत अभिनेते नाना पाटेकर, अरूणा इराणी यांनी शिवाजी साटम यांना भक्कम साथ दिली. अनेक महिने त्यांनी शिवाजी साटम यांना सांभाळून घेतलं. शिवाजी साटम यांना अभिजीत साटम नावाचा एक मुलगा आहे. अभिजीतचे लग्न अभिनेत्री मधुरा वेलणकरसोबत झाले आहे. विशेष म्हणजे शिवाजी साटम यांच्याप्रमाणेच त्यांचा मुलगा आणि सून हे दोघेही अभिनय क्षेत्रात कार्यरत असून मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरे आहेत. (Shivaji Satam Life)