आपल्या मनुष्य प्राण्याचा अतिशय जवळचा, लाडका आणि प्रामाणिक मित्र कोण तर कुत्रा. बोलता येत नसले तर स्पर्शाने आणि आपल्या वागण्याने कुत्रे त्यांच्या भावना व्यक्त करताना दिसतात. आजकाल आपण पाहिले तर अनेक लोकं घरात कुत्रे पाळतात. मुका असला तरी हा प्राणी आपल्याला खूपच लळा लावतो. बऱ्याच लोकांच्या घरात तर एकापेक्षा जास्त कुत्री आपल्याला पाहायला मिळतात. हेच कुत्रे आपल्या घराचा, परिसराचा आणि पर्यायाने आपल्या जीवनाचा जणू भागच बनले आहेत. घरात कुत्रे असो ना असो मात्र घराबाहेर, ऑफिसबाहेर आपल्या परिसराबाहेर आपल्याला कुत्रे दिसतातच दिसतात. (Dog Free State)
जरी कोणाच्या घरात कुत्रे नसले तरी आजूबाजूला आपल्याला कुत्रे दिसतातच दिसतात. त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी ही कुत्रे कायम असतात. याच कुत्र्यांशिवाय आपण आपले जग, आपला परिसर, आपल्या घराची कल्पनाच करू शकत नाही. मात्र तुम्हाला जर कोणी सांगितले की, भारतात एक जागा अशी आहे किंवा एक राज्य असे आहे, जिथे एकही कुत्रा आणि एकही साप दिसत नाही तर….? तुम्ही म्हणाल सापाचे तरी काही जास्त सांगू शकत नाही मात्र कुत्रे नाही…..काय राव काहीही काय बोलताय….? कुत्रा नाही असे होऊच शकत नाही.(Top Stories)
मात्र हो हे खरे आहे. भारतात एक राज्य असे आहे, जिथे एकही कुत्रा नाही किंवा सापही आढळून येत नाही. विश्वास बसत नाही ना..? चला मग आता तुम्हाला याबद्दल सर्व सविस्तरच सांगतो, म्हणजे नक्कीच विश्वास बसेल तुमचा. भारतातील हे राज्य काही महिन्यांपूर्वी खूपच चर्चेत आले होते. याच राज्याच्या एका समुद्र किनारी निवांत खुर्चीत बसून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मालदीव देशाचे संपूर्ण पर्यटन हलवले होते. (Latest Marathi News)
लक्षात आलेच असेल….? अगदी बरोबर लक्षद्वीप. (Lakshadweep) हेच भारतातील एकमेव असे राज्य आहे, जिथे आपल्याला एकही कुत्रा किंवा साप दिसत नाही. इथे कुत्रा पाळण्यास देखील मनाई आहे. पर्यटकांना देखील इथे कुत्रे घेऊन येण्यास बंदी आहे. सरकारने लक्षद्वीप मध्ये पाळीव आणि बिगर पाळीव कुत्रे नेण्यास देखील बंदी घातली आहे. भारतातील लक्षद्वीप हे असे राज्य आहे, जे मालदीवला पर्यटनाच्या याबाबतीत आणि सौंदर्याच्या बाबतीत जोरदार टक्कर देते. (Social News)
भारतातील अतिशय सुंदर बेट म्हणून लक्षद्वीपला ओळखले जाते. येथे असणारे निळेशार, अथांग समुद्र किनारे आणि निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी देशभरातून, जगभरातून पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात. मात्र लक्षद्वीपमध्ये कुत्रा हा प्राणी तुम्हाला कुठेही दिसणार नाही. पण या राज्यात मांजर आणि उंदीर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. (Latest Marathi News)
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, लक्षद्वीप हे रेबीज मुक्त राज्य आहे. येथील लोकांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धेमुळे कुत्र्यांची पैदास तसेच पालन केले जात नाही. बेटावर कुत्रे नसल्यामुळे वातावरण स्वच्छ आणि शांत राहण्यास मदत होते. लक्षद्वीपचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या राज्यात साप आढळत नाहीत. ते ‘सर्पमुक्त राज्य’ आहे. लक्षद्विपच्या शेजारील राज्य असलेल्या केरळमध्ये तर भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत सापांच्या अनेक प्रजाती आढळतात, परंतु लक्षद्वीपमध्ये सापांची कोणतीही प्रजाती आढळत नाही. (Dog Free State In India)
लक्षद्वीपच्या समुद्रात ६०० पेक्षा जास्त प्रजातींचे मासे आढळतात. येथील पाण्यात फुलपाखरू मासा विशेषतः प्रसिद्ध आहे आणि तो लक्षद्वीपचा राज्याचा प्राणी देखील मानला जातो. याशिवाय, येथे फुलपाखरू माशांच्या अनेक प्रजाती पाहायला मिळतात. ३६ लहान बेटांनी बनलेल्या लक्षद्वीपची एकूण लोकसंख्या सुमारे ६४००० असून, ९६ टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात. पर्यटन आणि मासेमारी हा लक्षद्वीप राज्यातील महत्वाचा, मुख्य आणि मोठे उत्पन्नाचा स्त्रोत आहे.
=============
हे देखील वाचा : Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कसे झाले ?
=============
निसर्गाने मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळण केलेल्या या लक्षद्वीप राज्यामध्ये ३२ बेटे असूनही यातील केवळ दहा बेटांवरच लोकं राहतात. ज्यामध्ये कावरत्ती, अगत्ती, अमिनी, कदम, किलातन, चेतलाट, बित्रा, अंदोह, कल्पना आणि मिनीकॉय यांचा समावेश आहे. कावरत्ती ही येथील राजधानी आहे. अशी अनेक बेटे आहेत जिथे १०० पेक्षा कमी लोकं राहतात.