Home » Bara Motanchi Vihir : स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेली ऐतिहासिक बारामोटेची विहीर

Bara Motanchi Vihir : स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेली ऐतिहासिक बारामोटेची विहीर

by Jyotsna Kulkarni
0 comment
Bara Motanchi Vihir
Share

छावा (Chhaava) सिनेमा प्रदर्शित झाला आणि अनेक गोष्टी लाइमलाइटमध्ये आल्या. अनेक गोष्टींबद्दल पुन्हा चर्चा सुरु झाल्या. सिनेमात दाखवलेल्या संभाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल तर सगळीकडेच चर्चा होत असताना सिनेमातील इतरही अनेक बाबी लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या सिनेमातील एक सीन आहे, जो सर्वाधिक चर्चेत असून, सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. या सीनमध्ये छत्रपती संभाजी महाराज अर्थात विकी कौशल शिव शंकराच्या पिंडीवर दुग्धाभिषेक करताना दिसत आहे.(Bara Motanchi Vihir)

हा सीन पहिल्यापासून अनेकांनी या लोकेशनबद्दल गुगलवर सर्च केले. यावर अनेक बातम्या देखील आल्या. हा सीन नक्की कुठे शूट झाला?, इतके सुंदर लोकेशन कोणते? याबाबत लोकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. आज आम्ही तुम्हाला याच लोकेशनबद्दल सर्व इत्यंभूत माहिती देणार आहोत. जिथे हा सीन शूट झाला तो कोणताही सेट नाही तर ते एक रियल लोकेशन आहे. मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील साताऱ्यामध्ये हे ठिकाण वसलेलं आहे. जिथे हा सीन शूट झाला त्या लोकेशनचे नाव आहे, बारामोटेची विहीर. (Bara Motanchi Vihir History)

Bara Motanchi Vihir

अतिशय महत्वाचा ऐतिहासिक वारसा असलेलं हे ठिकाण खूपच सुंदर आणि प्रसन्न आहे. सातारा (Satara) महाराष्ट्रातील मोठे आणि महत्वाचे शहर. या शहराला शिवाजी महाराजांचा इतिहास असल्यामुळे देशप्रेम, पराक्रम, शौर्य हे साताऱ्यातील लोकांच्या रक्तातच आहे. शूरवीरांच्या भूमी असे जरी साताऱ्याचे वर्णन केले तरी अतिशयोक्ती वाटायला नको. अशा या सातारा जिल्ह्यामध्ये ही बारामोटेची विहीर आहे. साताऱ्यापासून जवळच असलेल्या लिंब (Limb) या गावी ३०० वर्ष जुनी ही विहीर आहे.(Marathi Top Stories)

स्थापत्य कलेचा अतिशय सुंदर आणि नेत्रदीपक नमुना म्हणून देखील ही विहीर ओळखली जाते. एकेकाळी विहिरीतून पाणी उपसण्यासाठी १२ मोटी लावल्या जात, कदाचित यावरूनच या विहिरीचे नाव ‘बारामोटेची विहीर’ असे ठेवले गेले असावे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू अर्थात छत्रपती संभाजी महाराजांचे चिरंजीव असलेल्या शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये ही विहीर बांधली गेली आहे. दगडी खडकांचा वापर करून अतिशय सुबक पद्धतीने या विहिरीचे बांधकाम करण्यात आले आहे. (Indian History)

सातारा शहरापासून पुण्याकडे येण्याच्या मार्गावर अंदाजे १२ कि.मी वर लिंब फाटा लागतो. इथूनच उजवीकडे आत गेल्यावर ३ कि.मी. वर लिंब गाव आहे. ह्या गावाच्या दक्षिणेला २ कि.मी. अंतरावरील शेरीची वाडी या ठिकाणी कृष्णा नदीच्या तीरावर ही बारामोटेची विहीर आहे. पुण्याहून साताऱ्याला येताना लिंब गावाचा फाटा लागतो या फाट्यापासून आत ही विहीर आहे. अंदाजे शके १७१९ ते १७२४ ह्या दरम्यान श्रीमंत वीरूबाई भोसले यांनी ह्या विहिरीचे बांधकाम केले. लिंब गावाच्या आसपास असलेल्या शेतीसाठी आणि या परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी ह्या विहिरीचे बांधकाम केले असल्याचे अभ्यासकांकडून सांगितले जाते. (Marathi Latest News)

Bara Motanchi Vihir

या ऐतिहासिक विहिरीचा व्यास ५० फूट आणि खोली ११० फूट आहे. तर तिचा आकार अष्टकोनी, शिवलिंगाकृती आहे. या विहिरीजवळ मोडी लिपीत एक शिलालेखही असल्याचे आपल्याला दिसते. पेशव्यांच्या, शाहुंच्या अनेक खासगी बैठकी, निवांत क्षण या विहिरीच्या जवळ व्यतीत व्हायचे. या विहिरीच्या भिंतीवर वाघाची आणि सिंहाची शिल्प कोरलेली आहेत. विहिरीला प्रशस्त जिना आणि काही चोरवाटा देखील आहेत. या विहिरीवर १५ थारोळी आहेत. ह्या चोरावाटांतून वर आले की १२ मोटांची जागा, दरबाराची आणि सिंहासनाची जागा बघायला मिळते. ही विहीर सुंदर स्थापत्यशास्त्रचे उत्तम उदाहरण आहे.(social News)

===============

हे देखील वाचा : Sugarcane : सगळ्या रसवंती गृहांची नावं कानिफनाथच का असतात ?

Donald Trump : ट्रम्पचा धाक !

==============

मग या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही नक्कीच तुमच्या जवळच्या लोकांसोबत या विहीरला बघण्याचा प्लॅन करू शकता. अप्रतिम निसर्गामध्ये वसलेल्या या विहिरीसोबतच सज्जनगड, असल्याची देवी, भोगावची समाधी, मेरुलिंग, पाटेश्रर, वाईचं गणपती मंदिर, कल्याणगड आदी ठिकाणं देखील तुम्ही पाहू शकतात. आपण स्वतः आणि आपल्या येणाऱ्या पिढीला जर जाज्वल्य आणि पराक्रमी इतिहासाची माहिती व्हावी असे वाटत असेल तर नक्कीच या विहिरीला भेट द्या.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.