फळं आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. कोणताही आजार झाला, त्रास झाला तर डॉक्टर औषधांसोबतच विविध फळं खाण्याचा सल्ला देतात. आपल्या देशात देखील देशी, परदेशी अशा विविध प्रकारची अगणित फळं मिळतात. प्रत्येक फळ आपल्या शरीरासाठी आणि आजाराला बरे करण्यासाठी उपयुक्त आहे.
आपल्या देशात सर्वात जास्त आवडीने खाल्ले जाणारे फळ म्हणजे केळी. केळी हे फळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. सर्वच मोठ्या आवडीने हे फळ खातात. भारतात सगळ्यात जास्त केळीचं उत्पादन होतं. पिवळी केळी, वेलची केळी आदी प्रकार तुम्ही केळीचे खाल्ले असतील किंवा नियमित खातात. मात्र तुम्हाला माहिती आहे का या केळीचाच एक प्रकार म्हणजे लाल केळी. लाल केळी हे नाव ऐकून आश्चर्य वाटले ना…?
पिवळी आणि वेलची केळी आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहे. मात्र लाल केळी ही देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. लाल केळी भारतात फारशी प्रचलित नसली, तरी ती कर्नाटक, गोवा आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणावर पिकवली आणि खाल्ली देखील जाते.
लाल केळीमध्ये खनिजे, जीवनसत्त्वे, भरपूर फायबर आणि चांगले कार्बोहायड्रेट्स असतात. लाल केळी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि वजन नियंत्रित ठेवता येते. केळी हे जगातील सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या फळांपैकी एक आहे. जगभरात केळीच्या अनेक प्रकार आहेत, त्यापैकी २० जाती भारतात आढळतात. पिवळ्या, वेलची आणि हिरव्या केळीबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे.
भारतीय बाजारातच नाही तर ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, मेक्सिको आणि अमेरिका इत्यादी अनेक देशांमध्ये लाल रंगाची केळी मिळतात. पिवळ्या रंगाच्या केळ्यांपेक्षा लाल रंगाची केळी अधिक पौष्टिक आणि आरोग्यासाठी गुणकारी आहेत. चला तर जाणून घेऊया लाल केळी खाण्याचे फायदे.
रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत
लाल केळी नियमित खाल्ल्यामुळे तुमची रोग प्रतिकारकशक्ती वाढते. या केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि बी 6 उपलब्ध आहे. ही केळी खाल्ल्यामुळे शरीरात पांढऱ्या रक्त पेशी वाढण्यास मोठी मदत होते.
डोळ्यांसाठी फायदेशीर
लाल केळीमध्ये असलेले कॅरोटीनाईड्स त्यामुळे डोळ्याच्या आरोग्यासाठी खूप फायदेशी आहे. त्यात ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन नावाची मूलद्रव्ये आढळतात. याशिवाय बीटा-कॅरोटीनॉइड आणि व्हिटॅमिन ए देखील यामध्ये आढळतात, जे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे.
हाडे बळकट होतात
लाल केळीमध्ये पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात असल्याने लाल केळी नियमित खाल्ल्यामुळे हाडे बळकट होतात.
वजन नियंत्रित राहते
लाल केळीमध्ये फायबर्स आणि फॅट्स कमी असतात त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
अशक्तपणा कमी होतो
लाल केळामध्ये अँटि ऑक्सिडंटमुळे लाल केळी खाल्ल्यामुळे हिमोग्लेबिन वाढण्यास फायदा होतो. त्यामुळे अँनिमियापासून बचाव होतो.
इन्संट एनर्जी
भूक लागल्यावर आपण केळ खातो. कारण त्यातून आपल्याला एनर्जी मिळते. लाल केळ खाल्ल्यामुळे इन्संट एनर्जी मिळते.
मन शांत होते
लाल केळीमध्ये असलेले ट्रायटोफन हे मनाला शांत ठेवते आणि तुमची बुद्धिमत्ता वाढविण्यास मदत करते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर
लाल केळी खाल्ल्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. लाल केळ्यामध्ये कमी ग्लायसेमिक प्रतिसाद असतो, जो मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी लाल केळीचे सेवन करावे.
पोषक तत्वांनी परिपूर्ण
लाल केळीमध्ये भरपूर पोषक असतात. एका लहान लाल केळीमध्ये फक्त ९० कॅलरीज असतात आणि त्यात प्रामुख्याने पाणी आणि कर्बोदके असतात. व्हिटॅमिन बी 6, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी या उच्च सामग्रीमुळे या केळीचे पौष्टिक मूल्य वाढते.
रक्तदाब नियंत्रित करते
लाल केळ्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात आढळते. पोटॅशियम हे रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी लाल केळीचे सेवन करा.
पचन सुधारते
लाल केळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. हे फायबर पचन सुधारते, बद्धकोष्ठतेपासून आराम देते आणि आतडे निरोगी ठेवते. लाल केळ्यामध्ये असलेले फायबर पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते, ज्यामुळे पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा कमी होते.
रक्तदाब नियंत्रित करते
लाल केळ्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. हे रक्तवाहिन्या रुंद करण्यासाठी उपयुक्त आहे, ज्यामुळे रक्त प्रवाह सुधारतो आणि रक्तदाब कमी होतो.
इतर फायदे
लाल केळी खाल्ल्याने पार्किन्सन्स सारखे आजार बरे होऊ शकतात. लाल केळ्यामध्ये व्हिटॅमिन बी-6 असल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कायम राहते. लाल केळ्यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम आढळते.
(टीप : कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)