भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीची तयारी नाही म्हटले तरी थोड्याफार प्रमाणात वर्षभर चालू असते. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊभीज असा पाच दिवस दिवाळीचा सण असतो. या पाचही दिवसांचे आपापले स्वतःचे वेगळे महत्व आहे. दिवाळी म्हटले की, फराळ, फटाके, साफसफाई आदी गोष्टी तर आहेच, मात्र यासोबतच दिवाळीची एक खासियत म्हणजे अभ्यंगस्नान. दिवाळीचे पाच दिवस रोज सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करण्याची प्रथा खूपच जुनी आहे. या अभ्यंगस्नानाला जितके धार्मिक महत्व आहे, तितकेच आरोग्यच्या दृष्टीने देखील महत्व आहे. (Diwali)
अभ्यंगस्नान म्हणजे काय तर, ब्राम्ह मुहूर्तावर म्हणजेच सकाळी लवकर उठून साडेचार पासून ते सकाळी सातच्या दरम्यान केले जाते. या दरम्यानच्या कालावधीमध्ये वातावरणात वात हा जास्त प्रमाणात असतो. आपल्या शरीरात देखील वाताचे प्रमाण जास्त असते. अशा वेळेस अभ्यंगस्नान केल्याने शरीराला जास्त फायदे होतात. यामध्ये आधी सुगंधित तेल शरीराला लावले जाते आणि त्यानंतर उटणे लावतात. मग आपली नॉर्मल अंघोळ करायची असते. यालाच अभ्यंगस्नान म्हटले जाते. (Marathi News)
अभ्यंगस्नान करण्यामागे देखील एक धार्मिक आख्ययिका सांगितली जाते, नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे भगवान कृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला. हा एक राजा होता आणि त्याने स्त्रियांना बंदी करून आपल्या कैदेत ठेवले होते. त्याच्या वधानंतर कृष्णाने या स्त्रियांची सुटका केली. नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की जो कुणी या दिवशी सकाळी मंगलस्नान करेल त्याला नरकाची बाधा होऊ नये. कृष्णाने त्याला वर दिला. त्यानुसार नरकात जाण्यापासून मानवाला वाचविणारे पवित्र आणि मंगल स्नान या दिवशी पहाटे करण्याची पद्धती प्रचलित आहे. (Marathi News)
अभ्यंगस्नान हे उटण्याशिवाय अपूर्ण असते. दिवाळीमध्ये उटण्याला मोठे महत्व देण्यात आले आहे. दिवाळी हा सण थंडीमध्ये येतो किंबहुना दिवाळीमध्येच थंडीची चाहूल लागते. कडाक्याच्या थंडीत पहाटे तेल आणि उटणे लावून मस्त कडक पाण्याने आंघोळ दिवाळीत करतात. या अभ्यंगस्नानाला आपल्याकडे पूर्वीपासून महत्त्व आहे. अभ्यंगाचे आयुर्वेदात असंख्य वर्षांपूर्वी महत्त्व सांगितले आहे. यात वापरले जाणारे उटणे हे विविध नैसर्गिक घटकांपासून तयार झालेले एकप्रकारचे सुगंधी स्क्रबरच आहे. हे उटणे केवळ थंडीतच नाही तर बाराही महिने वापरले तरी त्याचे अनेक लाभ आपल्याला होतात. उटणे लावल्यामुळे शरीराला होणारे फायदे काय आहेत पाहूया. (Todays Marathi Headline)
* उटण्यामध्ये विविध आयुर्वेदीक घटकांचा समावेश असतो. या घटकांमुळे त्वचेचा संसर्ग कमी होण्यास मदत होते. यासोबतच जर तुमच्या त्वचेवर अॅक्ने, पिगमेंटेशन, स्कार्स असतील तर ते देखील कमी होण्यास मदत होते. (Latest Marathi Headline)
*आठवड्यातून एकदा उटण्याचा वापर केल्याने त्वचा निरोगी होण्यास मदत होते. मात्र उटणे लावल्यानंतर लगेचच सूर्यप्रकाशात जाणे टाळावे. जर जायचे असल्यास सनस्क्रीनचा वापर आवर्जून करावा. (Marathi News)
* उटण्यामध्ये रक्तचंदन, वाळा, चंदन, वेखंड, कात, नागरमोथा यासारख्या औषधी गुणांनी युक्त अशा वनस्पती आणि खोडांचा वापर केला जातो. हे घटक त्वचेला स्क्रबर म्हणून काम करतात. यामुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होते. (Top Stories)
* दिवाळी हा थंडीच्या दिवसांत येणारा सण. थंडीमुळे शरीराची त्वचा कोरडी होते. अनेकदा अशा कोरड्या त्वचेमुळे आगही होते. या समस्येपासून सुटका व्हावी यासाठी पूर्वीपासून उटण्याचा वापर केला जातो. उटण्यामध्ये असलेल्या चंदनामुळे शरीराला थंडावा मिळतो. (Latest Marathi News)
* उटण्यामधील आयुर्वेदिक घटकांमुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन ती मुलायम होण्यास सुरुवात होते. उटण्यामध्ये असणारी चंदन पावडर आणि हळद यामुळे त्वचा उजळण्यास देखील मदत होते. त्यामुळे दिवाळी झाल्यानंतरही आणि विशेषतः थंडीच्या दिवसात आठवड्यातून एकदा उटण्याचा वापर जरुर करावा. (Top Trending Headline)
* उटण्याच्या नियमित वापरामुळे त्वचेवर सुरकुत्या पडण्याचे प्रमाण कमी होते. हळदीमध्ये अॅन्टी एजिंग घटक असल्याने त्याचा त्वचेला फायदा होतो. त्वचा दीर्घकाळ तजेलदार आणि टवटवीत दिसते. याशिवाय उटण्यात मध किंवा दूध लावल्यास त्याचा जास्त फायदा होतो. मध मिसळल्यास त्वचा मुलायम होण्यास मदत होते. (Top Marathi Headline)
* चेहऱ्यावरील किंवा हाता-पायांवरील केस जास्त असल्यास ते काढण्यासाठी उटणे हा अतिशय उत्तम पर्याय असतो. उटणे लावताना ते गोलाकार फिरवून लावल्यास केसांची वाढ थांबण्यासाठी उपयोग होतो. मात्र अशाप्रकारे उटणे चोळताना त्याचा त्वचेवर वाईट परिणाम होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. (Top Trending News)
उटणे लावण्याची पद्धत
थोड्या प्रमाणात उटणे घ्या, आणि आपल्या संपूर्ण शरीरावर लावा. काही मिनिटांसाठी त्वचेवर गोलाकार मसाज करा. किमान १० ते १५ मिनिटे उटणे चांगले चोळून घ्या. त्यानंतर पाण्याने उटणे स्वच्छ धुवून काढा. त्वचेवर विशिष्ट चमक आल्यासारखे तुम्हाला जाणवेल. यानंतर त्वचा मऊ टॉवेलने कोरडी करा आणि हायड्रेशन लॉक करण्यासाठी शेवटी त्वचेवर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. (Social News)
=========
Diwali 2025 : दिवाळीत गोडधोड खाताना साखरेचे प्रमाण कसे नियंत्रणात ठेवावे? वाचा टिप्स
Skin Care : सणासुदीच्या दिवसात गुलाबजल वापरून सुंदर दिसण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
=========
अशाप्रकारे बनवा घरच्या घरी उटणे
साहित्य
२ चमचे मुलतानी मिट्टी
२ चमचे चंदन पावडर
अर्धी वाटी बेसन अर्थात चणा डाळीचे पीठ
अर्धी वाटी मसूर डाळीचे पीठ
१ चमचा कचोरा पावडर
१ चमचा आवळा पावडर
१ चमचा वाळा पावडर
१ चमचा अनंतमूळ पावडर
१ चमचा गुलाब पावडर
पाव चमचा आंबेहळद, पाव चमचा हळद, पाव चमचा दारूहळद
१ चमचा नागरमोथा पावडर
कृती
वरील सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून घ्या. मात्र उटणे लावण्यापूर्वी यातील कोणत्याही गोष्टीची तुमच्या त्वचेला अलर्जी नाही याची पहिले काळजी घेऊन पॅच टेस्ट करा आणि मगच वापरा. (वरील सर्व साहित्य तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात किंवा ऑनलाइन सुद्धा मिळेल)
(टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं डॉक्टरांच्या किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावीत.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics