आपल्या आजूबाजूला असंख्य फळं आपल्याला दिसतात. फळांचे आपल्या आयुष्यातील महत्व खूप मोठे आहे. फळं आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या शरीरासाठी खूपच आवश्यक आहे. आपल्याला होणाऱ्या प्रत्येक आजारावर कोणते ना कोणते फळ उपयुक्त असतेच. डॉक्टर देखील रोज कोणतेही एक फळ खाण्याचा सल्ला आपल्याला देतच असतात.
फळांना आपल्या जीवनात मोठे स्थान आहे. आज तर आपल्या देशी फळांसोबतच विदेशी फळं देखील सर्रास बाजारात मिळतात. आपण बाजारात किंवा फळं मिळणाऱ्या दुकानात गेलो तर आपले आपल्या सफरचंद, पेरू, आंबा, चिकू आदी देशी फळांसोबतच अनेक विदेशी फळं देखील लक्ष वेधून घेताना दिसतात. यात ड्रॅगन फ्रुट, अवकाडो, विविध प्रकारच्या बेरीज आदी अनेक प्रकारच्या फळांचा समावेश असतो. यातलेच अजून एक फळ म्हणजे किवी.
वरून चिकू सारखे आवरण आणि आत हिरव्या रंगाचा गर असलेले किवी हे फळ मूळचे न्युझीलंडचे आहे. आंबट, गोड असलेल्या या फळाने आपल्या देशातील मार्केट काबीज केले आहे. बऱ्यापैकी महाग मिळणाऱ्या या फळाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. किवी हे फळ वर्षभर बाजारात उपलब्ध असते. त्याला सुपरफूड म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही कारण त्यात आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असलेले अनेक पोषक घटक असतात. आजच्या या लेखात आपण याच किवी फळाच्या आपल्या शरीरासाठी असणाऱ्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया.
किवीमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, जे लोक आपल्या फिटनेसची विशेष काळजी घेतात त्यांनी किवी नक्कीच खावी. या फळामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि फायबर आढळतात, जे आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. दररोज एक मध्यम आकाराची किवी खाणे आपल्यासाठी पुरेसे ठरेल.
किवी खाण्याचे फायदे
– ज्या लोकांना हृदयरोग आहे त्यांना बरेचदा किवी खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
– जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची तक्रार असेल तर किवी फळ खा, यामुळे बीपी नियंत्रणात येईल.
– कमी कॅलरीजमुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते एखाद्या औषधापेक्षा कमी नाही. यामुळे साखरेची पातळी कमी होते.
– किवी खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडू लागतात, ज्याचा सकारात्मक परिणाम आपल्या त्वचेवर दिसू लागतो.
– किवीच्या नियमित सेवनाने त्वचा आश्चर्यकारक दिसते आणि सुरकुत्या दूर होतात.
– ज्या लोकांच्या पोटात गडबड आहे त्यांनी नियमितपणे किवीचे सेवन करावे.
– किवी पोटातील अल्सर बरे करण्यास देखील मदत करू शकते.
– किवीमध्ये लोह आणि फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते, जे गरोदर महिलांसाठी फायदेशीर आहे.
– किवीचे सेवन आपल्या हाडांसाठी देखील फायदेशीर आहे, यामुळे सांधेदुखी दूर होते.
– जे लोक मानसिक समस्यांना बळी पडतात त्यांनी तणाव कमी करण्यासाठी किवी खाणे आवश्यक आहे.
– किवी मुळे आपली रोगप्रतिकारशक्ती खूप वाढते, यामुळे अनेक आजार आणि इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
– किवी फळ खाल्ल्याने पांढऱ्या पेशी देखील वेगाने वाढतात.
=======
हे देखील वाचा : उटणे लावण्याचे ‘हे’ आहेत चमत्कारिक फायदे
=======
– मानसिक आजार असलेल्या लोकांनी तणाव कमी करण्यासाठी किवी खाणे आवश्यक आहे.
– किवीमध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी आणि ई हे केस गळणे कमी करण्यासाठी मदत करतात. या फळामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक हे इतर पोषक घटक आहेत जे रक्ताभिसरणात मदत करतात आणि परिणामी केसांच्या विकासासाठी पोषक ठरतात.
(टीप येथे दिलेली माहितीसाठी गाजावाजा कोणताही दावा करत नाही. तुम्ही हे उपाय करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)