Home » तुम्हाला माहित आहेत का ग्रीन टी सेवनाचे ‘हे’ फायदे

तुम्हाला माहित आहेत का ग्रीन टी सेवनाचे ‘हे’ फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Green Tea Health Benefits
Share

आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती तिच्या शरीराकडे पर्यायाने फिटनेसकडे दुर्लक्ष करताना दिसतो. प्रत्येक व्यक्तीला फिटनेस पाहिजे पण वेळेअभावी तो ते करू शकत नाही. अशावेळेस तो अगदी सोप्या आणि घरगुती उपाय करून फिटनेस मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. आपण जर पाहिले तर अनेक लोकं म्हणतात की, “आम्हाला फिटनेस पाहिजे मात्र आम्ही चहा नाही सोडणार.” चहा म्हणजे आपल्या भारतीय लोकांचे पाहिले प्रेम आहे. (Green Tea Health Benefits)

Green Tea Health Benefits

आपण खूप मोठ्या डॉक्टरांकडून, आहार तज्ज्ञांकडून, जाणकारांकडून ऐकले आहे की, चहा हा शरीरासाठी घातक आहे. त्यामुळे चहा बंद केला तर बऱ्याच समस्या कमी होतील. मात्र चहा कमी करणे किंवा बंद करणे चहा प्रेमींसाठी शक्य नाही. अशावेळेस सल्ला मिळतो तो ग्रीन टी पिण्याचा. आता आपला नॉर्मल चहा आणि ग्रीन टी यात नक्कीच फरक आहे. मात्र चहा चहा असतो असे मानून जर तुम्ही ग्रीन टी प्यायला सुरुवात केली तर नक्कीच याचे फायदे तुम्हाला तुमच्या शरीरावर दिसून येतील. या ग्रीन टी प्यायल्याने इम्युनिटी सुधारते. तसेच यामुळे कर्करोग, कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर आणि ह्रदयरोगाच्या रुग्णांसाठीही ग्रीन टी फायदेशीर मानली जाते. नक्की ग्रीन टी पिण्यामुळे कोणते फायदे होतात हेच आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत.

वजन कमी होण्यासाठी :

जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल, तर ग्रीन टी नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. ग्रीन टी मधील कॅफीन आणि कॅटेचिन्स तुमच्या चयापचय गतीला चालना देण्यासाठी आणि फॅट ऑक्सिडेशनमध्ये मदत करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी :
ग्रीन टीमध्ये पॉलीफेनॉल आढळतात, जे ट्यूमर आणि कर्करोगाच्या पेशींना रोखण्यासाठी उपयुक्त मानले जातात. ते प्यायल्याने ब्रेस्ट कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो.

 

पोटाचे विकार टाळण्यासाठी :
चहा प्यायल्याने गॅस, अॅसिडिटीची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढते, पण ग्रीन टी तुमच्या पोटाचे विकार दूर करण्याचे काम करते. यामुळे तुमची पचनक्रिया मजबूत होते आणि पोटाच्या सर्व समस्या कमी होतात.

तोंडाचे आरोग्य सुधारण्यासाठी :
ग्रीन टीच्या फायद्यांमध्ये केवळ शरीराचे आरोग्यच नाही तर तोंडाच्या आरोग्याचाही समावेश होतो. ग्रीन टीचे प्रतिजैविक गुणधर्म तुमच्या तोंडातील हानिकारक जीवाणूंची वाढ कमी करण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे तोंडी आरोग्य सुधारते. ग्रीन टीच्या नियमित सेवनाने तोंडाच्या संसर्गाचे धोके होतात.

मधुमेह कमी करण्यासाठी :
मधुमेहाचा सामना करणाऱ्या व्यक्तींसाठी ग्रीन टी एक उत्तम औषध आहे. ग्रीन टी ग्लुकोजच्या पातळीचे नियमन करण्यास मदत करून, मधुमेह आजारात आवश्यक असणाऱ्या अतिरिक्त औषधांची गरज कमी करून रुग्णाची स्थिती नैसर्गिकरित्या सामान्य करण्यासाठी मदत करतो.

हृदयविकार टाळण्यासाठी :
हृदयाचे आरोग्य हे सर्वांसाठीच प्राधान्य असते. ग्रीन टी रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत करताना खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याठी उपयुक्त ठरते. परिणामी हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत होते.

Green Tea Health Benefits

हे देखील वाचा : जिभेला चव देणाऱ्या कांद्याचे ‘हे’ औषधी गुणधर्म ऐकले आहेत का…?

उत्तम त्वचेसाठी :
ग्रीन टी मधील मुबलक प्रमाणात असलेले अँटिऑक्सिडेंट आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. हे आपल्या त्वचेला वातावरणातील घातक घटकांमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवते. ग्रीन टीचे नियमित सेवन केल्याने त्वचेची नैसर्गिक चमक वाढून त्वचेचे पोषण होते. सोबतच निरोगी आणि तरुण दिसण्यासही ग्रीन टी उपयुक्त आहे.

एलर्जी कमी करण्यासाठी :
ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचा एक पदार्थ असतो. ज्यामध्ये अँटी-एलर्जेनिक गुणधर्म असतात. कॅटेचिन शरीरातील ऍलर्जीच्या प्रतिक्रियांना रोखण्यास मदत करतात.ग्रीन टीचे नियमित सेवन केल्याने शिंका येणे, नाक वाहणे आणि डोळ्यांना खाज येणे यासारख्या ऍलर्जीच्या लक्षणांमध्ये घट होते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.