हिवाळा सुरु झाला की सगळीकडे अनेक विविध प्रकारच्या भाज्या दिसायला लागतात. मुबलक आणि वैविध्यपूर्ण भाज्या हे या हिवाळ्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. हिवाळ्यामध्ये अनेक भाज्या मिळतात, मात्र या सर्व भाज्यांमध्ये पालेभाज्या अतिशय ताज्या आणि कोवळ्या मिळतात. हिवाळ्यात सर्वात जास्त मिळणारी आणि खाल्ली जाणारी पालेभाजी म्हणजे पालक.
पालक अनेकांना आवडत नाही अनेकांना पालक थेट नाही पण विशिष्ट पद्धतीने केलेलीच आवडते. लोकांना पालक पनीर, पालक पुरी, पालक पराठा, पालक थेपला हेच पालकाचे प्रकार आवडतात. पालक फक्त खायला चविष्ट असणारी भाजी आहे. सोबतच ही भाजी खाण्याचे आरोग्यासाठी देखील असंख्य फायदे आहेत. पालकाला सुपरफूड असे म्हटले जाते. त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. आजारी व्यक्तीला पालक खायला दिल्यास तो लवकर रिकव्हर होण्यास मदत होते.
पालकामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स, कॅल्शियम, सोडियम, क्लोरीन, फॉस्फरस, लोह, खनिज क्षार, प्रथिने, लोह, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते. हे संसर्गाचा धोका कमी करण्यापासून शरीरातील लोहाची कमतरता दूर करते.
पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. याच गुणांमुळे पालकाच्या भाजीला लाइफ प्रोटेक्टव्ह फूड मानले जाते. जाणून घेऊया पालक खाण्याचे फायदे.
– पालक खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होतो. पालकामध्ये आयर्न, फोलेट आणि व्हिटॅमिन बी मुबलक प्रमाणात असते, जे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवून अॅनिमिया दूर करण्यास मदत करते.
– पचन सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या दूर करण्यात पालक महत्त्वाची भूमिका बजावते.
– पालक खाल्ल्याने शरीरातील सूज दूर होते. पालकामध्ये असलेले अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म संधिवात आणि मायग्रेनसारख्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतात.
– पालक खाल्ल्याने शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखले जाते. हे अनियमित मासिक पाळी, ओटीपोटात क्रॅम्प आणि वेदना, रक्त प्रवाह आणि पीसीओएस यांसारखी लक्षणे कमी करण्यास मदत करते.
– आहारामध्ये नियमितपणे पालकाचा समावेश केल्यास कर्करोगासारख्या आजारांपासून संरक्षण होते.
– रक्तातील सखारेचे प्रमाण नियंत्रित राहाते. पालकाचे नियमित सेवन केल्यास मधुमेहासारखी समस्या देखील दूर होते.
– पालकाच्या नियमित सेवनाने वजन देखील कमी होते. तसेच रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाणा वाढते.
– 100 ग्रॅम पालकामध्ये सुमारे 28.1 मिलीग्राम व्हिटॅमिन-सी असते. जे तुमची त्वचा तरूण ठेवते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवून शरीराला आजारांपासून दूर ठेवते.