आपण अनेकदा बऱ्याच अशा गोष्टी खात असतो, ज्या आपल्याला फक्त चवीसाठी आवडतात. आपल्याला विशिष्ट पदार्थाची चव आवडते म्हणून आपण तो पदार्थ सतत खात असतो. मात्र जर का तुम्हाला कोणी सांगितले की, तुला आवडणाऱ्या या पदार्थाचे आरोग्याच्या दृष्टीने हे मोठे फायदे आहे तर? तर आपण फक्त चवीसाठी आनंद घेण्यासाठी खात असणारा पदार्थ नक्कीच आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या असल्याने अधिक सकारात्मक पद्धतीने खाण्यास सुरुवात करू.
आता फाळांचेच घ्या. फळं कोणाला आवडत नाही अशी व्यक्ती सापडणारच नाही. सगळ्यांनी फळं आवडतातच. त्यातही जर पपई असेल तर प्रश्नच नाही. अतिशय रसाळ, गोड चवीची पपई अनेकांचा तर जीव की प्राण आहे. मात्र हीच पपई आरोग्याच्या आणि शरीराच्या दृष्टीने अमृत समजले जाते. ती खाण्याचे अनेक उत्तम फायदे आपल्या शरीराला होतात. त्यामुळे ही पपई जर तुम्ही खात नसाल तर हा लेख वाचून नक्की खायला सुरुवात करा आणि जर खात असाल तर आता अधिक सकारात्मक दृष्टीने खा. चला जाणून घेऊया याच पपईचे नक्की कोणते फायदे होतात.
रोगप्रतिकारशक्ती वाढते
पपईमध्ये फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. तसेच व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई भरपूर प्रमाणात असते. इतकंच नाही तर पपईमध्ये ल्युटिन आणि झेक्सॅन्थिन कॅरोटीनोईड्स सारखे घटकदेखील आढळतात. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
मधुमेहींसाठी लाभदायक
पपई चवीला गोड असली तरीही त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. कपभर पपईच्या तुकड्यांमध्ये केवळ काही ग्रॅमच साखर असते. यामुळे मधुमेहींनी पपई खाणे चांगले आहे. पपई खाल्ल्याने मधुमेह होण्यापासून देखील बचाव होतो.
डोळ्यांचे आरोग्य सुधारते
पपईमध्ये व्हिटमिन ए मोठ्या प्रमाणात असते. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी व्हिटामिन ए अत्यंत आवश्यक आहे. वाढणाऱ्या वयानुसार दृष्टी कमी होण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे या समस्येपासून वाचण्यासाठी पपईचा आहारात समावेश केल्यास नक्कीच फायदा होईल.
सांधेदुखीपासून आराम
पपईमध्ये व्हिटामिन सी प्रमाणेच वेदनाशामक गुणधर्म असल्याने सांधेदुखीच्या रुग्णांना पपईचे सेवन फारच चांगले आहे. पपईतील व्हिटामीन सी सांध्यांना मजबुती देण्यास तसेच सूज कमी करण्यास मदत करतात.
पचन सुधारते
आजकालच्या आधुनिक काळात खाण्याच्या सवयी बदल्याने पचनशक्ती बिघडण्याची शक्यता देखील वाढलेली दिसून येते. अशावेळी पपई खाल्ल्याने चुकीच्या खाण्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळण्यास मदत होते. पपईतील पपैन नामक एंजाईम पचन कार्य सुधारते. पपईमध्ये कॅरोटेनॉइड्स, अल्कालॉइड्स, मोनोटेरपेनॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स असतात.
पाळीचा त्रास कमी
अनियमित मासिक पाळी तसेच मासिक पाळीच्या काळातील त्रास अशा समस्या दूर करण्यासाठी पपई फारच उपयुक्त आहे.
ताण-तणाव कमी
दिवसभराच्या धावपळीनंतर वाटीभर पपईचे काप खाल्ल्यास थकवा कमी होण्यास मदत होते. तसेच व्हिटामिन सी शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राखते.
वजन कमी करण्यासाठी
वजन कमी करण्यासाठी पपई खूप प्रभावी आहे हे तुम्हाला माहित नसेल. जे लोकं बऱ्याच काळापासून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी नाश्त्यात पपई खावी. पपई खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
त्वचेसाठी फायदेशीर
पपई हे एक असे फळ आहे जे व्हिटॅमिन सी सह अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. त्यामुळे रिकाम्या पोटी पपईचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हे त्वचेसाठी देखील खूप आरोग्यदायी आहे. याशिवाय शरीर डिटॉक्सही होते.
कोलेस्टेरॉल नियंत्रणात
ज्यांचे कोलेस्टेरॉल वाढले आहे किंवा ज्यांना मधुमेह, हृदयरोग आणि लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे त्यांच्यासाठी पपई खूप फायदेशीर ठरू शकते. दररोज रिकाम्या पोटी पपईचे सेवन करावे. कारण यामुळे बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊ शकते. रक्तदाबाच्या रुग्णांसाठीही पपई फायदेशीर मानली जाते.
==========
हे देखील वाचा : केळी सेवनाचे ‘हे’ आहेत जादुई फायदे
==========
बद्धकोष्ठता कमी करते
रोज सकाळी उठून नाश्त्यात रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यास पचनसंस्था मजबूत होईल. पपईमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने नेहमी खाल्ल्यानंतर ते खा. इतकंच नाही तर बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळेल. तसेच तुमचे पोट नियमित पणे स्वच्छ होईल.
अँटिऑक्सिडंट्स
पपईमध्ये कॅफीक ॲसिड, मायरिसेटिन आणि व्हिटॅमिन सी, ए आणि ई यांसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात. हे अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील पेशींना नुकसान पोहोचवणाऱ्या घटकांबरोबर लढतात आणि आपले आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली अंमलात आधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या.)