भारताला मसाल्यांचा देश असे म्हटले जाते. मसाल्यांशिवाय भारतीय जेवणाचा कोणीच विचारही करू शकणार नाही. आपल्या देशात जगात सर्वात जास्त मसाल्यांचे उत्पादन केले जाते. हे मसाल्याचे आपल्या जेवणाची चव वाढवतात आणि आपल्या शरीराला देखील अतिशय उत्तम आणि निरोगी ठेवतात. प्रत्येक मसाल्याची स्वतःची एक खासियत आहे, स्वतःचे गुणधर्म आहेत.
याच मसाल्यांमधील महत्वाचा पदार्थ म्हणजे वेलची. अतिशय छोटी हिरव्या रंगाची असणारी वेलची गोड आणि तिखट अशा दोन्ही पदार्थांची चव वाढवण्यासोबतच आपल्या आरोग्याला देखील उत्तम ठेवण्यासाठी मदत करते. मसाला वेलची आणि हिरवी वेलची अशा दोन प्रकारांमध्ये ही वेलची येते. वेलचीचा जास्तकरून वापर गोड पदार्थांमध्ये केला जातो. याच हिरव्या वेलचीचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. अनेक आजारांवर उत्तम आणि रामबाण घरगुती उपाय म्हणून हिरव्या वेलचीकडे पाहिले जाते. नक्की काय काय फायदे आहेत या वेलचीचे जाणून घेऊया.
तोंडाची दुर्गंधी दूर होते
वेलचीचा वापर नॅचरल माउथ फ्रेशनर म्हणून केला जातो. रोज एक वेलची चावून खाल्ल्यास तोंडाची दुर्गंधी कमी होते आणि फ्रेश वाटते.
मानसिक ताण
वेलची आपल्या सुगंधी गुणधर्मामुळे मानसिक तणाव कमी करते. हे नैराश्याने त्रस्त असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. वेलची चहामध्ये घाला ती मूड सुधारण्यासाठी मदत करते.
सर्दीपासून बचाव
रात्री झोपण्यापूर्वी दुधात चिमूटभर वेलची, हळद आणि काळी मिरी मिसळून सेवन करू शकता. हे सर्दी आणि फ्लूच्या लक्षणांवर उपचार आणि आराम करण्यास देखील मदत करते.
सुरळीत रक्ताभिसरण
वेलची नैसर्गिंकरित्या ब्लड थिनर म्हणून काम करते. वेलचीमुळे शरीरातील सर्व नसांमध्ये रक्ताभिसरण सुरळीत होते. वेलची खाल्ल्याने रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत त्यामुळं हृदयविकाराचा धोकादेखील कमी होतो.
शरीर डिटॉक्स होते
शरीरात विषारी पदार्थ जमा होण्यास सुरुवात झाली तर अनेक आजारांचा धोका वाढतो. पण वेलची खाल्ल्याने युरिनचा फ्लो वाढतो आणि बॉडी डिटॉक्स होते. वेलची खाल्ल्याने किडनीचे कार्य अधिक सुरळीत होण्यास मदत होते. ज्यामुळे किडनीशी संबंधित आजारांचा धोका दूर होईल.
केस मजबूत होतात
रोज २ वेलच्या खाऊन त्यावर पाणी प्यायल्यास केस मजबूत होतात. त्यामुळं केस गळतीही थांबते आणि ते केस दाट होतात.
चरबी कमी होते
एकाच जागी बसून काम केल्यामुळे लठ्ठपणा येत पोटाचा घेर वाढतो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी वेलची हा चांगला पर्याय आहे. रोज २ वेलची चावून खा आणि त्यावर गरम पाणी प्या. पॉटेशिअम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन B1,B6 आणि व्हिटॅमिन C शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करते. यात असलेल्या फायबर आणि कॅल्शियममुळं वजन कमी करण्यात मदत होते.
कॅन्सरमध्ये फायदा
वेलची मधील एन्टीइम्फालामेट्री (Anti-inflammatory) घटक तोंडाचा कॅन्सर, त्वचेचा कॅन्सरशी लढण्यात मदत करतात.
पोटाचे त्रास
पोटासंबंधी तक्रारी असतील तर, वेलची खायला हवी. वेलची खाण्याने पचन क्रिया सुधारते. यूरिन इन्फेक्शनमध्ये देखील वेलची खाण्याचा फायदा होतो.
ब्लड प्रेशर
ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यासाठी वेलची लाभदायक आहे. ज्यांना हाय ब्लडप्रेशरचा त्रास आहे त्यांनी दररोज दोन ते तीन वेलची चावून खाल्ल्यास फायदा मिळतो. त्यामुळे हृदयातलं रक्ताभिसरण वेगाने होतं. सर्दी, खोकला, दमा यासारख्या समस्यांपासून सुटका होते.
उलटीच्या समस्येमध्ये लाभदायी
जेवणानंतर वेलची खाल्ल्याने उलटीची समस्या होत नाही. जर एखाद्याला उलटी होत असेल तर लगेच वेलची उकळून पाणी प्यावे. यामुळे त्याच्या पोटाला आराम मिळेल.