नियमित सर्व प्रकारची आणि सिझनल फळं खाणे आपल्या शरीराच्या दृष्टीने अतिशय हितकारक आहे. फळं आपल्या शरीराचा आणि आरोग्याचा समतोल राखण्यासोबतच आपल्याला निरोगी ठेवण्याचे महत्वाचे काम करतात. फळं खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक पोषक घटक देतात आणि आपल्याला अनेक रोगांपासून दूर ठेवण्याचे देखील काम करतात.
आज तर आपल्या बाजारात अनेक प्रकारची देशी, परदेशी फळं अगदी सहजच उपलब्ध होतात. यातलेच एक म्हणजे ड्रॅगन फ्रुट. गुलाबी रंगाचे, इतर फळांपेक्षा अगदी वेगळे दिसणारे आकर्षक रसाळ चवीला गोड असलेले हे फळ नेहमीच बाजारात आपले लक्ष वेधून घेतात. हे फळ आधी नवीन वाटत होते, मात्र आता अगदी सहज हे फळ उपलब्ध झालेले दिसते. अनेक घरांमध्ये सर्रास हे फळ खाल्ले देखील जाते.
अनेक लोकं ड्रॅगन फ्रूटला चीनचे फळ समजतात, मात्र असे नाहीये. ड्रॅगन फ्रूट हे मूळचे मेक्सिकोचे आहे. असे असले तरी आज ते जगाच्या विविध भागांमध्ये उत्पादित केले जाते. ड्रॅगन फ्रूट हायलोसेरस नावाच्या कॅक्टसवर उगवते. ड्रॅगन फ्रूट हे पोषक तत्वांनी युक्त अन्नपदार्थ आहे. याचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. हे ड्रॅगन फ्रुट खाण्याचे असंख्य फायदे आहेत. ड्रगन फ्रुटमध्ये अनेक प्रकारची पोषक द्रवे असतात, जे आपल्याला शरीराला लाभदायक ठरतात. चला जाणून घेऊया ड्रगन फ्रुट खाण्याचे विविध फायदे.
– ड्रॅगन फ्रुट ऊर्जाने परिपूर्ण असे फळ आहे. एका ड्रॅगन फ्रुटमध्ये १०२ कॅलरी ऊर्जा असते. याशिवाय हे फळ कार्बोहायड्रेट्सचा हा एक उत्तम स्रोत आहे. एका ड्रॅगन फळामध्ये २२ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. याशिवाय यात १३ ग्रॅम साखरही असते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ड्रॅगन फ्रूटमध्ये फॅट नसते. त्यामुळे हृदयरोग्यांसाठी ड्रॅगन फ्रूट अत्यंत उपयुक्त आहे.
– ड्रॅगन फ्रुटमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे. ड्रगन फ्रूटचं नियमित सेवन केल्यानं शरीर बळकट होण्यास मदत होते. आपल्या नाश्त्यामध्ये ड्रॅगन फ्रुटचा समावेश केल्यास सर्दी- खोकला या आजारापासून संरक्षण होण्यास मदत मिळू शकते.
– ड्रॅगन फ्रूटच्या बियादेखील खूप फायदेशीर असतात. ड्रॅगन फ्रूटच्या बियांमध्ये ओमेगा-३ आणि ओमेगा-९ फॅटी अॅसिड्स आढळतात. ज्यामुळे हृदयाच्या पेशी मजबूत होतात. ड्रॅगन फ्रूटमध्ये फॅट नसते. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते.
– ड्रॅगन फ्रुट रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. यामध्ये झफ्लाव्होनॉइड्स एस्कॉर्बिक अॅसिड, फेनोलिक अॅसिड आणि फायबर असतात. त्यामुळे साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते. हे फळ मधुमेहींच्या रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवते.
– ड्रॅगन फ्रूटमध्ये प्री बायोटिक गुणधर्म असतात. जे आतड्यातील चांगल्या जीवाणूंना पोषण पुरवते. म्हणजेच ड्रॅगन फ्रूट हे निरोगी जीवाणूंसाठी अन्न म्हणून काम करते. आतड्यात निरोगी जिवाणूंची संख्या खूप जास्त असेल तर पचनसंस्थेला खूप चालना मिळते.
– ड्रॅगन फ्रुटमध्ये बीटा कॅरोटीन आणि लायकोपीन आढळतात. कॅरोटीनॉइड समृद्ध अन्न सेवन केल्याने कर्करोगचा धोकादेखील कमी होतो. आपल्या अन्नामध्ये फायबर असणे खूप महत्वाचे आहे आणि ड्रॅगन फ्रूटमधून पुरेसे फायबर मिळते.
– डेंगू, मलेरिया, कावीळ, आणि इक व्हायरल आजार झाल्यास ड्रॅगन फ्रुट अत्यंत फायदेशीर समजले जाते. शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्यास आवर्जून हे फळ खावे.
– ड्रॅगन फ्रुटमध्ये लोहाचे अधिक प्रमाण असते. त्यामुळे हे फळ खाल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघू शकते. शिवाय ड्रॅगन फ्रुट खाल्यानं अशक्तपणा दूर होतो.
– ड्रॅगन फ्रुटमध्ये कॅल्शियम भरपूर असते. हाडांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कॅल्शियम कमतरतेनं होणारा ऑस्टिओपोरोसिस टाळण्यास मदत होते. कॅल्शियम युक्त ड्रॅगन फळ हाडांची घनता आणि संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी विशेषतः फायदेशीर आहे.
(टीप : ही माहिती केवळ वाचनासाठी दिली जात आहे कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या)