आपले भारतीय जेवण, मसाले विविध गुणांनी अतिशय समृद्ध आहेत. स्वयंपाकामधे केल्या जाणाऱ्या सर्वच गोष्टींचे आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यसाठी खूपच मोठे फायदे आहेत. जरी काही लोकं आपल्या जेवणाला नाव ठेवत असले तरी आपल्या देशातील जेवणासारखे जेवण कुठेही मिळत नाही. याच आपल्या दररोजच्या जेवणातील महत्वाचा घटक म्हणजे ‘कढीपत्ता’. भाजी घेताना सर्रास कोथिंबीरसोबत किंवा भाजीसोबत आपण याला फ्रीमध्ये घेतो. मात्र याच फ्रीमध्ये मिळणाऱ्या कढीपत्त्याचे फायदे आणि गुण जे ऐकले तर तुमचे हजारो, लाखो रुपये नक्कीच वाचतील.
कढीपत्ता फोडणीत टाकला की लगेच तडतडून फुटतो आणि जेवणाला अप्रतिम चव देतो. असा हा कढीपत्ता जेवणाची चव तर वाढवतोच शिवाय आपल्या शरीराला, आरोग्याला देखील मोठा फायदा करतो. आपल्यापैकी अनेक लोकं जेवताना हा कढीपत्ता बाजूला काढून ठेवतात. मात्र या कढीपत्त्याचे फायदे ऐकले तर नुसताच कढीपत्ता खाल असे होईल.
अतिशय औषधीय गुणांनी समृद्ध असा हा कढीपत्ता अतिशय लोकप्रिय आहे. कढीपत्ता हा अँटीऑक्सिडेंट गुण असणारा गुणकारी पदार्थ आहे. कढीपत्त्याचे सेवन कोलेस्ट्रॉल, ब्लड शुगर आदी अनेक मोठ्या आजारांवर गुणकारी ठरते. कढीपत्ता कॉपर, मिनरल्स, कॅल्शियम, फॉस्फरस , फायबर कार्बोहायड्रेट मॅग्नेशियम आणि लोह सारख्या पोषकतत्वांनी समृद्ध आहे. त्यामुळे कढीपत्त्यामधून शरीराला असंख्य फायदे मिळतात.
१) कढीपत्ता हा थंड पदार्थ आहे. उन्हाळ्यात जर याचे सेवन केले तर आपले शरीर थंड राहण्यास मदत होते. सोबतच आपली पचनक्रिया देखील सुधारते. रिकाम्या पोटी कढीपत्त्याचे सेवन केले तर गॅस, ऍसिडिटी, पचनाच्या सर्व समस्या दूर होतात.
२) कढीपत्ता खाल्ल्यावर वाईट कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतो. तसेच हृदयाशी संबंधित आजारही दूर होतात. तुम्हाला माहित आहे का…जर शरीरात वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त झाले तर हार्ट अटॅक येण्याची दाट शक्यता असते.
३) ब्लड शुगर नेहमी जास्त असेल तर सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याचे सेवन करावे. कढीपत्त्याचे सेवन केल्यावर शरीरातील इन्सुलिनची पातळी सुधारते आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते.
४) कढीपत्त्याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यासाठी खूप मदत होते. एका माहितीनुसार, कढीपत्ता गायक्लोरोमेथेन, एथिल एसीटेट सारखे तत्व असून हे वजन कमी करण्यासाठी फायदा होतो.
५) कढीपत्त्याची पेस्ट त्वचेवर लावल्यास त्वचा अतिशय तजेलदार होते. चेहऱ्यावरील पिंपल्स देखील कमी होतात. कढीपत्त्याचा वापर हेअर मास्क म्हणून देखील करू शकतो. यामुळे कोंडा कमी होण्यास मदत होते.
६) आपल्या दृष्टीसाठी आणि ती सुधारण्यासाठी व्हिटॅमिन ए खूप महत्वाचे आहे. कढीपत्त्यात विटामिन ए मोठया प्रमाणात असते. जे दृष्टी सुधारण्यास मदत होते. कढीपत्त्याच्या सेवनाने मोतीबिंदूपासून आराम मिळतो.
=======
हे देखील वाचा : नवरात्राची चौथी माळ – कुष्मांडा देवी पूजन
=======
७) कढीपत्ता यकृतासाठी फायदेशीर आहे. एका माहितीनुसार कढीपत्ता खाल्ल्याने यकृत कोणत्याही प्रकारच्या ऑक्सिडेटिव्ह तणावापासून दूर राहू शकते. हे यकृतातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी यकृत निरोगी ठेवण्याचे काम करतात.
८) अॅनिमियाच्या गुणधर्मांमुळे, कढीपत्ता अॅनिमियाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये कॅल्शियम, लोह आणि झिंक मुबलक प्रमाणात आढळतात. कढीपत्त्याच्या आत फॉलिक अॅसिड आणि लोह हे दोन्ही रक्त शोषक घटक आढळतात. यामुळेच अॅनिमियामध्ये हे फायदेशीर आहे.
९) उकळलेले कढीपत्त्याचे पाणी हे उत्तम डिटॉक्स पेय आहे. तसेच शरीरातील घाण, हानिकारक कण आणि विषारी पदार्थ बाहेर काढून रक्त शुद्ध करते. हे वजन कमी करण्यासाठी आणि त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.