Home » Red Fort : भारताचे वैभव असलेल्या लाल किल्ल्याची रंजक माहिती

Red Fort : भारताचे वैभव असलेल्या लाल किल्ल्याची रंजक माहिती

by Jyotsna Kulkarni
0 comment
Red Fort
Share

अजून आपण २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यातून पूर्ण बाहेर आलो नव्हतो, तोच दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ असलेल्या मेट्रो स्टेशनजवळ स्फोट झाला आहे. आतापर्यंत या घटनेमध्ये १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीतील या स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Red Fort)

१० नोव्हेंबर सोमवारी रोजी सायंकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी रेड सिग्नलजवळ एक गाडी येऊन थांबली होती. त्या गाडीमध्ये हा स्फोट झाला आहे. त्यावेळी गाडीमध्ये काही लोक बसलेले होते. या स्फोटामुळे आजूबाजूच्या वाहनांनाही आग लागली. या घटनेची माहिती मिळताच सर्व एजन्सी त्यात दिल्ली पोलीस, एफएसएल (FSL), एनआयए (NIA), एनएसजी (NSG) याठिकाणी दाखल झाले आहोत. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला ते ठिकाण लाल किल्ल्यापासून फक्त ८०० मीटर अंतरावर आहे. अतिशय मोक्याच्या ठिकाणी झालेल्या या स्फोटामुळे संपूर्ण देश हादरला आहे. नक्की हा स्फोट कशामुळे झाला याची नीटशी माहिती उपलब्ध झालेली नाही. तपस यंत्रणा या घटनेशी नीट माहिती घेऊन तपास करत आहे. (Marathi News)

दरम्यान लाल किल्ला म्हणजे आपल्या देशाचे वैभव आहे. ही ऐतिहासिक वास्तू बघण्यासाठी देशविदेशातून लोकं दिल्लीमध्ये येतात. लाल किल्ला म्हणजे भारताच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांपैकी एक महत्त्वाचे आणि मोठे वैशिष्ट्य समजले जाते. लाल किल्ला हा भारताच्या अभिमानाचे आणि वैभवाचे प्रतीक आहे, ज्यामध्ये मुघल स्थापत्यकला आणि स्वातंत्र्यलढ्याची कहाणी आहे. राजधानी दिल्लीत २५६ एकरमध्ये परिसरात पसरलेला हा लाल किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे. (Todays Marathi Headline)

Red Fort

भारताच्या या प्राचीन वास्तूला राष्ट्रीय महत्त्व असलेले स्मारक घोषित करण्यात आले आहे. ज्याचे व्यवस्थापन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून केले जाते. सध्या लाल किल्ला हे एक संग्रहालय आहे. ज्यामध्ये ऐतिहासिक कलाकृती संग्रहित आहे. दरवर्षी स्वातंत्र्यदिनी याच लाल किल्ल्यावरून देशाचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात आणि देशाला संबोधित करतात. अशा या लाल किल्ल्याबद्दल आपण आज माहिती जाणून घेऊया. (Marathi News)

ही जागतिक वारसा मध्ये समाविष्ट भारतातील प्राचीन वास्तूंपैकी एक आहे. असे म्हटले जाते की लाल किल्ला मुघल काळात बांधला गेला होता परंतु मुघल काळापूर्वीही त्याचे अस्तित्व असल्याचे संकेत मिळतात. असे सांगितले जाते की पूर्वी तुर्किक जातीतील मुघल लोकं लाल किल्ल्याला लाल हवेली म्हणत असत. काही इतिहासकारांच्या मते, हा लालकोटचा एक प्राचीन किल्ला आणि वाडा आहे, जो शाहजहानने ताब्यात घेतला होता. या किल्ल्यावर तुर्कीची छाप सोडली होती. १२ व्या शतकाच्या उत्तरार्धात दिल्लीचा लालकोट परिसर हिंदू राजा पृथ्वीराज चौहानची राजधानी होती. लालकोटमुळे याला लाल हवेली किंवा लालकोट किल्ला म्हणत. पुढे मुघलांनी लालकोटचे नाव बदलून शाहजहानाबाद केले. (Top Marathi News)

मुघल शासक शाहजहानने १६४८ या प्राचीन वास्तूचे मूळ नाव किला-ए-मुबारक होते. ज्याच्या भिंती प्रचंड लाल वाळूच्या दगडाने बनवलेल्या होत्या. त्यामुळेच इंग्रजांनी याला लाल किल्ला म्हणजेच लाल किल्ला असे नाव दिले. साली आपली राजधानी आग्राहून दिल्लीत हलवताना लाल किल्ला बांधला होता. लाल किल्ल्याची सुंदर रचना आणि अनोखी वास्तुकला याला लोकप्रिय बनवते. तसेच हे मुघल वास्तुकलेचे सुंदर उदाहरण आहे, जे हिंदू आणि पर्शियन वास्तुकलेचे मिश्रण दर्शवते. लाल किल्ला हे ७५ फूट उंच भिंतींनी वेढलेले एक सुंदर स्मारक आहे. त्यात राजवाडे, इनडोअर कॅनॉल, रॉयल चेंबर्स आणि मशिदी देखील आहे. या प्राचीन वास्तूच्या प्रमुख वास्तूंमध्ये प्रामुख्याने दिवाण-ए-आम आणि दिवाण-ए-खास यांचा समावेश होतो. चुनखडीपासून बनवलेल्या लाल किल्ल्याचा दिल्लीतील प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये समावेश आहे. (Latest Marathi Headline)

लाल किल्ला लाल वाळूचा दगडाच्या साहाय्याने बांधण्यात आला होता. याच बरोबर पांढरे संगमरवरी दगडही यात होते. हा किल्ला बांधला तेव्हा अनेक मौल्यवान हिरे आणि सोन्या-चांदीने सजवलेला होता, पण इंग्रजांनी लाल किल्ला ताब्यात घेतला तेव्हा त्यांनी या किल्ल्यातील सर्व मौल्यवान हिरे आणि धातू बाहेर काढले. भारताची ही भव्य ऐतिहासिक वास्तू सुमारे ३० मीटर उंच दगडी भिंतीने वेढलेली आहे. त्या काळी लाल किल्ला बांधण्यासाठी १ कोटी रुपये खर्च आला होता. या किल्ल्याला दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत. एक लाहोर गेट तर दुसरे दिल्ली गेट. ११ मार्च १७८३ रोजी शिखांनी मुघलांवर हल्ला करून हा किल्ला मुघलांच्या ताब्यातून घेतला होता. या विजयाचे श्रेय सरदार बाघेलसिंग धालीवाल यांना जाते. (Top Stories)

हा किल्ला सुरुवातीपासूनच सत्तेचे केंद्र राहिला आहे. लाल किल्ला १८५७ पर्यंत मुघल साम्राज्याची राजधानी होता. १८५७ मध्ये, ब्रिटीशांविरुद्ध देशभरात उठाव झाला. मे महिन्यात, मेरठमधून उठाव झाला आणि बंडखोरांनी लाल किल्ला ताब्यात घेतला. परंतु ४ महिन्यांनंतर, ब्रिटीशांनी किल्ला ताब्यात घेतला. ब्रिटीशांनी त्याचा वापर त्यांचे लष्करी मुख्यालय म्हणून करण्यास सुरुवात केली. किल्ल्याच्या आत बांधलेले अनेक राजवाडे आणि बागा नष्ट झाल्या. सुमारे ८० टक्के मंडप आणि संरचना ब्रिटिशांनी पाडल्या आणि किल्ला लष्करी छावणीत बदलला. या काळात, ब्रिटीश सैनिक आणि अधिकारी लाल किल्ल्यात तैनात होते. (Top Trending News)

=========

America : ट्रम्पसाठी पुढचे वर्ष धोक्याचे !

Johran Mamdani : ममदानींचा मागचा चेहरा…रामा दुवाजी !

=========

लाल किल्ला भारताच्या इतिहासाचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे. ब्रिटिशांनी तो ताब्यात घेतला आणि त्यांचा ध्वज फडकावला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पहिल्यांदाच ब्रिटिश राजवटीचा ध्वज काढून भारताचा राष्ट्रीय ध्वज फडकावला आणि स्वतंत्र भारताची सुरुवात केली. दरवर्षी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देते. स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित अनेक आठवणी येथे जतन केल्या जातात. लाल किल्ल्याला केवळ ऐतिहासिक महत्त्वच नाही तर त्याची विशाल तटबंदी आणि दिवाण-ए-आम राष्ट्रीय समारंभांसाठी योग्य बनवतात. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.