उन्हाळा सुरु झाला की सगळ्याच लोकांना त्यांच्या त्वचेची सर्वात जास्त चिंता असते. कारण उन्हाच्या तीव्र अतिनील किरणांमुळे त्वचेची मोठ्या प्रमाणावर हानी होते आणि यामुळे आपल्या त्वचेला त्रास होतो. मग उन्हापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सर्वात सोपा आणि अतिशय फायदेशीर उपाय म्हणजे नियमित आणि योग्य अशी सनस्क्रीन लावणे. आता आजच्या आधुनिक काळात महिलांना इव्हन पुरुषांना देखील सनस्क्रीन लावण्याबद्दल नवीन सांगायची गरज नाही.(Sunscreen)
सनस्क्रीनबद्दल अनेक लोकं जागृत आहेत. मात्र असेही काही जणं आहेत, ज्यांनी आजवर कधीच सनस्क्रीन वापरलेली नाही. याबद्दल माहिती आहे, मात्र त्याबद्दल जास्त माहिती नाहीये. अनेकांना प्रश्न असेल सनस्क्रीन म्हणजे काय? ती कधी लावायची? कोणती सनस्क्रीन आपल्या स्किनला सूट होईल? आदी सर्वच प्रश्नांबद्दल आम्ही आज या लेखातून तुम्हाला सनस्क्रीनबद्दल सर्वच माहिती देणार आहोत.(Know about Sunscreen)
सनस्क्रीन ही आपल्या त्वचेसाठी एक कवच म्हणून काम करते. सनस्क्रीन लावल्यास सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचेचे नुकसान होत नाही. ही क्रीम सूर्याची अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणे शोषून घेते किंवा ते परावर्तित करते आणि त्वचेचे सनबर्नपासून होणारे नुकसान वाचवते. सनस्क्रीन लावण्याचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे हे क्रीम त्वचेचा कर्करोग टाळण्यास मदत करते. सनस्क्रीन हे लोशन स्प्रे, जेल, फोम्स, स्टिक्स, पावडर आदी स्वरूपात टॉपिकल उत्पादन म्हणून वापरण्यात येते.(Marathi Health News)
सनस्क्रीन कसे लावावे?
घरातून बाहेर सूर्यप्रकाशात जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावणे महत्वाचे आहे. म्हणूनच बाहेर जाण्यापूर्वी २० – ३० मिनिटे आधी सनस्क्रीन लावण्यास सांगितले जाते. सनस्क्रीन लावण्याआधी ती चांगली हलवून घ्या, जेणे करून ती व्यवस्थित मिसळली जाईल. त्वचेला आवश्यक इतके सनस्क्रीन लावावे. त्वचेवर सनस्क्रीनचा थर तयार झाला नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणूनच सनस्क्रीन नीट लावावे. खासकरून कान, पाठ, खांदे, गुडघे आणि पाय यांच्या मागील भागासह तुमच्या त्वचेच्या सर्व उघड्या भागांवर सनस्क्रीन लावावे. (Social News)
डोळ्याभोवती सनस्क्रीन लावताना काळजी घ्या.
सनस्क्रीनचा सर्वात जास्त वापरला जाणारा प्रकार म्हणजे क्रीम सनस्क्रीन. मात्र सनस्क्रीन जेल, लोशन आणि स्टिकच्या स्वरूपातही येते. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर क्रीम स्वरूपातले सनस्क्रीन वापरावे. चेहऱ्यावर शक्यतोवर क्रीम स्वरूपातले सनस्क्रीन लावावे. पाय, पाठ, कंबर आणि हात या भागांवर सनस्क्रीन लोशन लावावे. लोशन हे क्रीमपेक्षा खूप पातळ असल्याने ते सहज पसरते. (Marathi Latest News)
========
हे देखील वाचा : Statue Of Liberty : अमेरिकेची ओळखच पुसली जाणार !
========
शरीराच्या ज्या भागात जास्त केस आहेत त्या भागांवर सनस्क्रीन जेल लावावे. स्टिक स्वरूपात उपलब्ध असलेले सनस्क्रीन डोळ्यांच्या आजूबाजूच्या भागावर लावल्यास फायदेशीर ठरते. सनस्क्रीन स्प्रे सर्व वयोगटातील लोक वापरू शकतात. (Top Marathi News)
सनस्क्रीन खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
* केवळ उन्हाळ्यातच नाही तर वर्षभर सूर्यापासून त्वचेचे रक्षण करणे आवश्यक असते. त्यामुळे योग्य सनस्क्रीन खरेदी करणे महत्त्वाचे आहे. सनस्क्रीन घेताना ताज्या स्टॉकमधून सनस्क्रीन निवडणे महत्त्वाचे आहे. सनस्क्रीन जितके फ्रेश तितकी त्याची कार्यक्षमता चांगली असते. (Skin Care News)
* UVA किरणांमुळे टॅनिंग आणि अकाली वृद्धत्व यांसारख्या समस्या निर्माण होतात, तर UVB किरणांमुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. सनस्क्रीनवरील SPF क्रमांक सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचा लाल होण्यास किती वेळ लागेल हे दर्शवतो. एसपीएफ म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर. सनस्क्रीनमध्ये SPF 30 असेल, तर हे सनस्क्रीन लावल्यावर त्वचा जळण्यास ३० पट जास्त वेळ लागेल. त्यामुळे जास्त एसपीएफ असलेले सनस्क्रीन खरेदी करणे फायदेशीर ठरते.(Trending Marathi News)
* एसपीएफ ३० असलेले सनस्क्रीन त्वचेचे ९६.७% हानिकारक सूर्यकिरणांपासून रक्षण करते. एसपीएफ पातळी बहुतेक सर्व त्वचेच्या प्रकारांसाठी योग्य असून, सूर्याच्या नुकसानापासून संरक्षण प्रदान करते.(Marathi News About Sunscreen)
* एसपीएफ ५० असलेले सनस्क्रीन त्वचेचे जवळपास ९८.५% हानिकारक सूर्यकिरणांपासून रक्षण करू शकते. ही एसपीएफ पातळी अतिशय संवेदनशील त्वचा असलेल्या किंवा दीर्घकाळ सूर्य किरणांच्या संपर्कात असलेल्या लोकांसाठी आहे.
* घरात असणाऱ्या लोकांनी SPF 30 असलेले सनस्क्रीन वापरले तरी चालते. कारण हे दैनंदिन वापरासाठी गरजेपुरते रक्षण करते. मात्र ज्यांना उन्हात जावे लागते, उन्हात काम करावे लागते, अशा लोकांसाठी SPF 50 असलेले सनस्क्रीन चांगले आहे.
सनस्क्रीन वापरण्याचे फायदे
वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात
उन्हाळ्यात सनस्क्रीन न लावता बाहेर गेल्यास सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे कोलेजन, त्वचेच्या पेशी, त्वचेची लवचिकता यांचे मोठे नुकसान होते. त्वचा लहान वयातच सुरकुतलेली, वृद्ध दिसू लागेल. यामुळे त्वचेचा रंग फिकट होणे, बारीक रेषा, सुरकुत्या, निस्तेज, कोरडी, निर्जीव त्वचा आदी त्रास होऊ शकतो. सनस्क्रीन वापरल्यामुळे कमी वयातच वृद्धत्वाची दिसणारी लक्षणे टाळता येतात. (Sunscreen Benefits)
स्किन इन्फ्लेमेशन कमी
अतिनील किरणोत्सर्गामुळे, त्वचेचा एपिडर्मिस लाल होऊ शकतो तसेच सूज येऊ शकते. सनस्क्रिनचा नियमित वापर केल्यास या हानिकारक किरणांमुळे जळजळ कमी होते. त्वचा खूप संवेदनशील असेल आणि त्वचा लाल झाली असेल, तर ज्या सनस्क्रीनमध्ये झिंक ऑक्साईड किंवा टायटॅनियम डायऑक्साइड आदी गोष्टी असलेले सनस्क्रीन असावे.
टॅनिंग कमी होते
उन्हाळ्यात दररोज अँटी-टॅनिंग सनस्क्रीन लोशन लावून घराबाहेर पडल्यास टॅनिंगचा त्रास होत नाही. ही क्रीम अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेच्या टॅनिंगची समस्या दूर करते. दर दोन तासांनी सनस्क्रीन जरूर वापरा. विशेषतः, ज्यांची त्वचा संवेदनशील आहे, त्यांनी ते वापरणे आवश्यक आहे. तुम्ही व्यायाम केल्यानंतरही ते लावू शकता, कारण घामामुळे ते लोशन निघून जाते.
त्वचेला कॅन्सरपासून वाचवते
उन्हात जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावल्याने अल्ट्रा व्हायोलेट किरणांचे हानिकारक प्रभाव टाळू शकता. यामुळे त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यताही कमी होऊ शकते. ऋतू कोणताही असला तरी सनस्क्रीन लोशन लावाले पाहिजे. 30 SPF सह सनस्क्रीन दिवसातून अनेक वेळा वापरल्यास, त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी करू शकता.
========
हे देखील वाचा : Pakistan : सैन्यातील नोकरीपेक्षा मजदूरी बरी !
========
निरोगी त्वचा
सनस्क्रीन लावल्याने कोलेजन, केराटिन आणि इलास्टिन सारखी त्वचेची प्रथिने सुरक्षित राहतात. त्वचा मऊ, गुळगुळीत आणि निरोगी ठेवण्यासाठी ही प्रथिने आवश्यक असतात. सनस्किन लावताना त्यात टायटॅनियम डायऑक्साइड असणे आवश्यक आहे, जेणेकरून ते त्वचेला अतिनील किरणांपासून संरक्षण देऊ शकेल.