भारतामध्ये तांदुळाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आपल्या देशातील मुख्य धान्यांपैकी एक म्हणून तांदुळाची ओळख आहे. प्रत्येक घरामध्ये तांदूळ वापरला जातोच. भारतामध्ये तांदूळ किंवा भात म्हणजे अमृत आहे. भाताशिवाय कोणत्याही भारतीय व्यक्तीचे जेवण पूर्ण होत नाही. तर काहींसाठी भात म्हणजेच जेवण असते. तांदुळापासून मुख्यत्वे भात केला जातो. मात्र तांदुळाचा वापर करून इतरही अनेक पदार्थ तयार केले जातात. (Health)
मात्र आपण जर पाहिले तर आपल्या देशात ९० ते ९५ टक्के पांढरा तांदूळ वापरला जातो किंवा खाल्ला जातो. मात्र तांदुळामध्ये अजून काही प्रकार आहेत. जसे लाल तांदूळ, ब्राऊन तांदूळ. मात्र आपण या प्रकारांबद्दल जास्त जागरूक नाही. पण हे तांदूळ आपल्या शरीराच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने खूपच लाभदायक आहे. नक्कीच पांढरा तांदूळ देखील चांगलाच आहे. मात्र तुलनेने लाल तांदूळ (Red Rice) अधिक फायदेशीर आहे. मग हा लाल तांदूळ खाण्याचे आपल्या शरीराला कोणते फायदे मिळतात चला जाणून घेऊया. (Red Rice)
– लाल भात खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. लाल भात हा फॅट फ्री असतो, जे लोक हा भात रोज खातात त्यांना लठ्ठपणाचा धोका कमी असतो. सोबतच वजन कमी होण्यास देखील मदत होते. (Top Stories)
– लाल तांदळात लोह, जस्त, पोटॅशियम, फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि बी 6 आणि बी 12 सारखी जीवनसत्त्वे असतात. हे पोषक तत्व एकंदर आरोग्य आणि कल्याणासाठी फायदेशीर असतात.
– पांढर्या तांदळाच्या तुलनेत लाल तांदळात फायबरचे प्रमाण अधिक असते. हे फायबर आपल्या पचनास मदत करते आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते.
– लाल तांदूळ अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. त्यामुळे लाल तांदळाचा भात खाल्ल्याने कर्करोग, हृदयरोग आणि मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो.
– लाल तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत कमी असतो. कमी GI असलेले खाद्यपदार्थ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत करतात. त्यामुळे मधुमेहाने त्रस्त व्यक्तींसाठी किंवा रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्याचे लक्ष्य ठेवणार्यांसाठी लाल तांदूळ एक उत्तम पर्याय आहे.
– लाल तांदळात मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणावर आढळते. हे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे सांधेदुखीच्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.
– लाल तांदूळ नैसर्गिकरित्या ग्लूटेन-फ्री आहे. त्यामुळे ग्लूटेन फ्री जेवण घेणाऱ्यांसाठी आणि सेलिआक रोग असलेल्या व्यक्तींसाठी हा तांदूळ योग्य पर्याय आहे.
– लाल तांदळात पोटॅशियम, लोह आणि मॅग्नेशियम असे तीनही घटक असतात, जे रक्तदाब आणि चयापचय चांगले राखण्यास मदत करतात. लाल तांदळाचा भात रक्तपेशींच्या निर्मितीस प्रोत्साहन देतो.
===============
हे देखील वाचा : Maharashtra State Lottery : अनेकांना लखपति बनवणारी राज्य लॉटरी बंद होणार?
===============
– लाल तांदूळ कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतो. एका अभ्यासानुसार, जे लोकं काही महिने लाल तांदूळ खातात त्यांच्या शरीरात असणारी खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी झाल्याचे दिसून आले.
– लाल तांदूळ जीवनसत्त्वे आणि खनिजांनी भरलेला असतो, लाल तांदळाच्या भातामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. लाल तांदळातील फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि कमी GI हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. अँटिऑक्सिडंट्स जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी करून हृदयरोगापासून संरक्षण करतात.
(टीप- कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)