दिवाळीचा सण म्हटला की फराळाचे पदार्थ लगेच डोळ्यासमोर येतात. फराळाशिवाय दिवाळीची मजा आणि आनंद अपूर्ण असतो. दिवाळीमध्ये तर विविध छान छान चविष्ट पदार्थांची नुसती मेजवानी असते. करंज्या, चकल्या, लाडू, चिवडा, शेव, शंकरपाळी, अनारसे आदी पदार्थांची घरात नुसती रेलचेल असते. दिवाळीत देवाला देखील याच फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. मात्र दिवाळीला असा फराळ करायची पद्धत का आणि कशी सुरु झाली असेल? याचा कधी विचार केलाय का? नाही ना… म्हणूनच आज आम्ही दिवाळीच्या फराळामगील इतिहास सांगणार आहोत. (Diwali 2025)
आजच्या काळात तर दिवाळीच्या फराळाची तशी फारशी क्रेझ पाहायला मिळत नाही. कारण आता तर दिवाळीचा फराळ बाराही महिने दुकानांमध्ये उपलब्ध असतो किंवा घरी फर्माइश केली की लगेच बनवल्या देखील जातो. मात्र पूर्वीच्या काळी असे नव्हते. लोकांना त्यांच्या जेवणात गोड पदार्थ क्वचितच मिळायचे. पण दिवाळीमध्ये लाडूंचे, करंजी, अनारसे अशा अनेक गोड पदार्थांनी जेवणात मधुर रस उतरायचा. गोडधोड पदार्थ शेतकऱ्याच्या घरात देखील कधीतरी केले जात. दिवाळीच्या काळात गोडधोड म्हणून आणि एक आनंद म्हणून शेतकरी आपल्या घरी हे पदार्थ करत असत. यालाच अनुसरुन आपली फराळ संस्कृती पुढे वाढत गेली आणि दिवाळी आणि फराळ हे समीकरण झाले. आज आपण दिवाळीच्या फराळाच्या काही सोप्या रेसिपी जाणून घेऊया. (Marathi News)
पोह्यांचा चिवडा
साहित्य
भाजके पोहे
ग्रॅम शेंगदाणे
ग्रॅम खोबऱ्याचे पातळ काप
डाळ
मिरच्या
तेल
चवीनुसार मीठ
लाल तिखट
हळद
धणे पूड
पिठीसाखर
कढीपत्ता
कृती
पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी सर्वात आधी पोहे स्वच्छ चाळणीने चाळून घ्यावे.आता एका मोठ्या कढईमध्ये भाजून घ्यावे. आता मोठ्या पातेल्यात तेल घालून त्यात कढीपत्त्याची पाने, मिरच्या घालून परतवून घ्यावे. आता त्यामध्ये हळद, तिखट, धणेपूड व दाणे घालून घ्यावे. तसेच दाणे खमंग परतले कि खोबर्याचे काप व डाळ घालून परतावे. आता तयार झालेल्या या फोडणीमध्ये भाजलेले पोहे घालावे. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ व पिठी साखर घालून चिवडा परतवून घ्यावा. तर चला तयार आहे आपला दिवाळी विशेष पोह्यांचा चिवडा, थंड झाल्यानंतर डब्ब्यात भरावा. (Todays Marathi Headline)
========
Diwali : दिवाळीसाठी आकर्षक आणि सोप्या रांगोळी डिझाईन्स
========
बेसनाचे लाडू
साहित्य
१ वाटी जाड बेसन
२ चमचे साजूक तूप
१ वाटी पिठी साखर
वेलची पूड
ड्रायफ्रुट्सचे काप
कृती
बेसनाचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी एका कढईमध्ये बेसन भाजून घ्यावे. आता त्यामध्ये तूप घालावे व बेसन हलके तपकिरी होईपर्यंत भाजून घ्यावे. आता बेसनात पिठी साखर, वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स मिक्स करावे. व हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करावे. थंड झाल्यावर आता याचे छोटे लाडू बनवा. (Marathi Trending Headline)
चकली रेसिपी
साहित्य
एक किलो तांदुळ, एक मोठी वाटी चणा डाळ, अर्धी वाटी मुगडाळ, अर्थी वाटी ज्वारी आणि पोह्यांचे मिश्रण
एक चमचा जिरे
एक चमचा तीळ
अर्धा चमचा धणे
चवीनुसार मीठ
एक चमचा तिखट
तळण्यासाठी तेल
कृती
खुसखुशीत खमंग चकली बनवण्यासाठी सर्वात आधी तांदुळ, मूग डाळ, चणा डाळ, पोहे, ज्वारी हे एकत्र करून भाजून घ्यावे. नंतर त्यामध्ये धणे व जिरे घालून हे सर्व मिश्रण दळून घ्यावे. आता दळलेल्या या मिश्रणाचे पीठ एका ताटात घेउन त्यामध्ये मीठ, तिखट, तीळ, थोडेसे तेल व गरजेपुरते कोमट पाणी घालावे व हे चांगल्याप्रकारे घट्ट मळून घ्यावे. तसेच चकली यंत्राच्या मदतीने चकली तयार करावी व तेलात खमंग होइसपर्यंत तळावी. (Top Marathi News)
गुळाचे शंकरपाळे
साहित्य
2 वाटी गव्हाच पीठ
अर्धा वाटी डाळीच पीठ
सवा वाटी किसलेला गूळ
अर्धी वाटी तुपाच मोहन
चिमूटभर मीठ
तळायला तूप
कृती
गुळाचे शंकरपाळे बनवण्यासाठी सर्वात आधी अर्धी वाटी पाण्यामध्ये गूळ, तूप व मीठ घालून उकळून घ्यावे. तसेच थंड झाल्यानंतर त्यामध्ये गव्हाच पीठ आणि डाळीच पीठ घालून पीठ घट्ट भिजवून घ्यावे. आता साधारण तासभर पीठ भिजल्यानंतर मोठे गोळे करुन पोळी लाटून घ्यावी व शंकरपाळे कापून घ्यावे. कढईमध्ये तूप गरम करुन शंकरपाळे तांबूस रंग येई पर्यंत तळून घ्यावे. (Latest Marathi Headline)
साखरेचे शंकरपाळे
साहित्य
एक कप मैदा
अर्धा कप तूप
एक कप दूध
दीड कप पिठी साखर
अर्धा चमचा वेलची पूड
कृती
साखरेचे शंकरपाळे बनवण्यासाठी सर्वात आधी दुधात पिठी साखर मिक्स करावी. तसेच हे मिश्रण चांगल्याप्रकारे एकजीव करावे. दूध व साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर आता मैदा घेऊन त्यामध्ये वेलची पूड घालावी. तसेच आता या मैद्यामध्ये तयार केले दूध घालून मळून घ्या. व दोन गोळे तयार करा. दोन्ही गोळे पोळपाटावर वेगवेगळे लाटून घ्यावे. व शंकरपाळ्यांच्या आकारात कापून घ्यावे. आता एका कढईत तेल गरम करून कापलेले शंकरपाळे लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यावे. (Marathi Trending Headline)
========
Dhanteras : धनतेरसला पुजल्या जाणाऱ्या कुबेर देवाची रंजक माहिती
========
खमंग शेव
साहित्य
८ वाटया डाळीचे पीठ
२ वाटी तेल
आवश्यकतेनुसार तिखट
चवीनुसार मीठ
अर्धा चमचा हळद
२ चमचा ओवापूड
तळण्याकरता तेल
कृती
दिवाळी फराळ मध्ये शेव बनवण्यासाठी सर्वात आधी एका परातीत तेल, पाणी घालून हाताने मिक्स करावे. मग त्या तेलात ओवापूड, मीठ, तिखट, हळद घालावी व डाळीचे पीठ घालावे. खूप घट्ट पण भिजवायचे नाही. आता कढईत तेल गरम करण्यास ठेवावे. तसेच तयार पीठ सोर्यात भरावे. सोर्याला कढईतल्या तेलावर धरून हाताने गोल फिरवत सोर्या दाबून कढईत शेवेचा गोल चवंगा पाडावा. आता थोडया वेळाने दूसर्या बाजूनी तळावे. अश्या प्रकारे शेव तळून घ्यावी. (Top Marathi Stories)
तिखट शंकरपाळे
साहित्य
२ वाट्या गव्हाचे पीठ
दीड चमचा साखर
चिमूटभर हळद
मीठ
जिरे
तिखट
तळण्यासाठी तेल
कृती
गव्हाच्या पिठात वरील सर्व साहित्य मिक्स करून घ्या आणि पाण्याने पीठ घट्ट भिजवून घ्या. गोळे करून लाटा आणि कातणीने बारीक शंकरपाळ्या करून घ्या. मंद आचेवर तेलात तळा. हे तिखट शंकरपाळे खुसखुशीत होतात. (Scocial News /Updates)
ओल्या नारळाच्या करंज्या
साहित्य
ओलं खोबरं (एक नारळ)
चिरलेला गूळ
वेलची पावडर
काजू – बदाम – बेदाणे (हवे असल्यास)
तूप
गव्हाचे पीठ
मीठ
पाणी
कृती
कणीक मळून घ्या आणि कापडाखाली झाकून ठेवा. एका भांड्यात ओलं खोबरं आणि गूळ एकत्र करून ते भाजून घ्या. व्यवस्थित मिक्स झाले की त्यात वेलची पावडर, काजू, बदाम आणि बेदाणे घाला आणि मिश्रण थंड होऊ द्या. कणेकेचे गोळे करून छोटी पोळी लाटा आणि त्यात हे सारण भरा आणि करंजीच्या आकारात तयार करा. तेल गरम करून मंद आचेवर या करंज्या तळा. (Top Stories)
अनारसे
साहित्य
एक वाटी तांदूळ
किसलेला गूळ
एक चमचा तूप
खसखस
तळण्यासाठी तेल
कृती
तीन दिवस तांदूळ पाण्यात भिजवून ठेवा. रोज सकाळी याचे पाणी बदला. चौथ्या दिवशी तांदूळ कोरडे करून घ्या आणि मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घ्या. किसलेला गूळ आणि तूप बारीक केलेल्या तांदळात टाका. सर्व एकत्र करून घट्ट मळून घ्या. हा तयार केलेला गोळा तुम्ही चार ते पाच दिवस एका डब्यात ठेऊन द्या. पाच दिवसांनी बाहेर काढून मळून घ्या. त्याचे छोटे गोळे करून पुरीसारखे लाटा आणि त्यावर खसखस घालून ते तेलात अथवा तुपात तळा. (Marathi Headline)
बेसन बर्फी रेसिपी
साहित्य
बेसन- 2 कप
तूप- 1 वाटी
साखर- 1 कप
पाणी- 1/2 कप
वेलची पूड- 1/2 टीस्पून
सुकामेवा
=========
Diwali : ‘या’ सोप्या टिप्स वापरून दिवाळीची स्वच्छता करून लक्ष्मीला करा प्रसन्न
=========
कृती
बेसनची बर्फी बनवण्याकरिता एका कढईमध्ये तूप गरम करावे. तसेच तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये बेसन घालावे. व भाजून घ्यावे. बेसन मधून तूप निघू लागल्यास बेसन भाजले गेले असे समजावे. हे भाजलेले बेसन थंड करण्यासाठी ठेवावे. दुसऱ्या कढईमध्ये साखर आणि पाणी घालावे आणि साखरेचा पाक तयार करून घ्यावा. आता भाजलेल्या बेसनात साखरेचा पाक घालून चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्यावे. यामध्ये वेलची पूड देखील घालावी. आता हे मिश्रण लहान गॅस वर शिजवून घ्यावे. आता का ताटाला तूप लावून घ्यावे. हे मिश्रण ताटामध्ये काढावे. वरून सुक्यामेव्याने सजवावे. हे मिश्रण थंड होऊ द्यावे. त्यानंतर तुम्हाला आवडेल त्या आकारात बर्फी कापून घ्यावी. (Marathi Headline)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics