Home » Chhatrapati Shivaji Maharaj : जाणून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टराज्ञींबद्दल!

Chhatrapati Shivaji Maharaj : जाणून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टराज्ञींबद्दल!

by Jyotsna Kulkarni
0 comment
Chattrapati Shivaji Maharaj
Share

ज्यांच्या केवळ विचारानेच आपल्या संपूर्ण अंगावर शहारा येऊन आपण अभिमानाने ओतप्रोत होते असे आपल्या सर्व मराठी बांधवांचे दैवत अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांबद्दल आजपर्यंत आपण अतिशय हुशार आणि अभ्यासू लोकांकडून नेहमीच त्यांच्या शौर्यचे, पराक्रमाचे किस्से ऐकले आहेत. अनेक लोकांनी खूपच सुंदर आणि अलंकृत शब्दांनी महाराजांचे वर्णन केले आहे. महाराजांना शब्दात मांडणे हे अवघड नाही तर निव्वळ अशक्य आहे. काय आणि किती महिमा वर्णावा आपल्या राजाचा असेच सगळ्यांना होते. (Chhatrapati Shivaji Maharaj)

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj), त्यांच्या शौर्याबद्दल, त्यांच्या गुणांबद्दल, त्यांच्या हुशारीबद्दल, त्यांच्या कीर्तीबद्दल, पराक्रमांबद्दल आपण नेहमीच ऐकत, वाचत आलो आहे. मात्र आज आपण महाराजांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल त्यांच्या पत्नींबद्दल म्हणजेच अष्टराज्ञींबद्दल जाणून घेणार आहोत. जवळपास सगळ्यांनाच त्यांच्या मोजक्या २/३ पत्नींबद्दल माहित असेल. मात्र महाराजांची ८ लग्न झाली होती. सगळ्यांनाच माहित आहे की, महाराजांनी एकापेक्षा जास्त लग्न केली होती. मात्र नक्की महाराजांची लग्न किती झाली होती? त्यांच्या पत्नीचे नाव काय होते? आदी अनेक गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. (Chattrapati Shivaji Maharaj’s Wives)

छत्रपती शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील सर्वात प्रसिद्ध योद्धे आणि राजांपैकी एक मानले जातात. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या विविध साम्राज्यांची सेवा केली. तसेच त्यांच्या आईचे नाव जिजाबाई, ज्या सिंदखेडच्या लखुजी जाधवरावांच्या कन्या होत्या. शिवाजी महाराज हे मराठा कुटुंबातील आणि भोसले कुळातील राजे होते. मराठा साम्राज्याचे संस्थापक असलेल्या  छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक पराक्रम केले. आजही त्यांच्या कर्तृत्वाला व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. अशा या महाराजांनी त्यांच्या आयुष्यात ८ लग्न केली. (Marathi Top Stories)

Chattrapati Shivaji Maharaj

सईबाई निंबाळकर
बालपणीच छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी पुण्यातील लाल महालात १६ मे १६४० रोजी झाला. सईबाई ह्या छत्रपतींच्या पहिल्या पत्नी होत्या. फलटणचे मुधोजीराजे निंबाळकर हे सईबाईंचे वडील होते. सईबाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराज पुत्र म्हणून लाभले होते. सखुबाईसाहेब, राणूबाईसाहेब, अंबिकाबाईसाहेब या त्यांच्या कन्या होत्या. (Latest Marathi News)

सोयराबाई मोहिते
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव सोयराबाई मोहिते होते. सोयराबाई ह्या मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या बहीण होत्या. राजाराम राजे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि सोयराबाई यांचे चिरंजीव होते. तर दीपाबाईसाहेब या त्यांच्या कन्या होत्या. (marathi news)

पुतळाबाई पालकर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या पत्नी होत्या पुतळाबाई पालकर. पुतळाबाई ह्या बाजी प्रभू प्रधान यांच्या कन्या होत्या. छत्रपतींच्या निधनानंतर त्या सती म्हणून महाराजांच्या चितेवर गेल्या होत्या.

सकवारबाई गायकवाड
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौथ्या पत्नी होत्या सकवारबाई गायकवाड. सकवारबाई या नांदोजी राव गायकवाड यांच्या कन्या होत्या. शिवरायांचे अंगरक्षक कृष्णाजी गायकवाड ह्यांच्या भगिनी होत्या. सकवारबाई गायकवाड यांचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांसोबत १६५७ मध्ये झाला. कमलाबाईसाहेब या छत्रपती महाराज आणि सकवारबाईसाहेब यांच्या कन्या होत्या.

सगुणाबाई शिर्के
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाचव्या पत्नी होत्या सगुणाबाई शिर्के. सगुणाबाई आणि महाराज यांना राजकुंवरबाईसाहेब या कन्या होत्या.

काशीबाई जाधव
शिवाजी महाराजांच्या सहाव्या पत्नी होत्या, जाधव घराण्यातील काशीबाई जाधव. त्यांचा विवाह ७ एप्रिल १६५७ रोजी झाला होता. काशीबाई या जिजामातांच्या जाधव कुटुंबातील होत्या आणि त्या शंभूसिंह बांदल यांच्या बहिण होत्या. काशीबाईंचे वडील संताजी जाधवराव आणि आजोबा अचलोजी जाधवराव हे आई साहेब जिज़ाऊंचे बंधू होते.

=============

हे देखील वाचा : Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कसे झाले ?

=============

लक्ष्मीबाई विचारे
विचारें घराण्यातील लक्ष्मीबाई विचारें या शिवाजी महाराजांच्या सातव्या पत्नी होत्या. जावळीच्या गुप्त मोहिमेवर गेलेले असताना १६५६ मध्ये महाराजांनी लक्ष्मीबाई यांच्याशी लग्न केले होते.

गुणवंताबाई इंगळे
गुणवंताबाई इंगळे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठव्या पत्नी होत्या. गुणवंताबाई इंगळे ह्या विदर्भातील चिखलीच्या इंगळे घराण्यातील सरदार शिवाजीराव इंगळे ह्यांची कन्या होत्या. १५ एप्रिल रोजी महाराजांचा गुणवंताबाई यांच्याशी विवाह झाला होता.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.