Home » Sweet Potato : रताळे खाताय तर सालासकट खा आणि मिळवा ‘हे’ मोठे फायदे

Sweet Potato : रताळे खाताय तर सालासकट खा आणि मिळवा ‘हे’ मोठे फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Sweet Potato
Share

आजच्या सोशल मीडियाच्या काळात कोणतीही गोष्ट ट्रेंड व्हायला वेळ लागत नाही, आणि ट्रेंड झालेली गोष्ट फॉलो करणारे देखील अफाट लोकं आहेत. रताळे ही सध्या सोशल मीडियावर कमालीची ट्रेंड होणारी गोष्ट ठरत आहे. अनेक लोकं त्यांच्या डाएटमध्ये, रेसिपींमध्ये आवर्जून या रताळ्याचा समावेश करताना आपल्याला दिसत आहे. रताळे आवडणारे, नियमीत खाणारे जर तुम्ही असाल तर आजचा हा लेख तुमच्यासाठीच आहे. (Healthy Food)

आधुनिक काळात जिथे जग अनेक चांगल्या बाजूने बदलत आहे, तिथे लोकांमध्ये हळूहळू का होईना मात्र फिटनेसबद्दल आपल्या चांगल्या तब्येतीबद्दल देखील जागरूकता निर्माण होताना दिसत आहे. सतत ऐकू येणारे नवनवीन, गंभीर आजारांच्या भीतीमुळे का होईना मात्र लोकांना फिटनेसमध्ये रस निर्माण होत आहे. योगा, कार्डिओ करण्याचे प्रमाण देखील लोकांमध्ये झपाट्याने वाढत आहे. मात्र चांगल्या फिटनेससाठी, निरोगी शरीरासाठी नुसतं व्यायाम करणे पुरेसे आहे का? अजिबातच नाही. (Sweet Potato)

नियमित व्यायामासोबतच सकस, पौष्टिक खाणे देखील आवश्यक आहे. यासाठी नेहमीच पाश्चात्यच गोष्टी खाव्या आणि सॅलाडच खावे असे अजिबातच नाही. आपल्या आजूबाजूला दररोज मिळणाऱ्या जवळपास सर्वच गोष्टी देखील आरोग्याच्या दृष्टीने खूपच लाभदायक आहे. प्रत्येक भाजीचे, फळांचे सेवनाचे अनेक फायदे शरीराला होत असतात. भारतामध्ये सर्वात जास्त उपवास केले जातात. या उपवासांमध्ये अगदी सर्रास खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे रताळे. (Food And Health)

Sweet Potato

बटाट्यासारखेच असणारे रताळे हे गोडसर असल्याने त्याला इंग्लिशमध्ये स्वीट पोटॅटो (Sweet Potato) असे म्हणतात. बटाट्याला उत्तम आणि हेल्दी पर्याय म्हणून रताळे सध्या खूपच प्रसिद्ध होताना दिसत आहे. मधल्या काही काळापासून रताळे खाण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. पूर्वी फक्त उपवासाच्या दिवसांमध्ये मिळणारे आणि खाल्ले जाणारे रताळे आता वर्षभर सहज उपलब्ध होते. (Top Stories)

सोशल मीडियामुळे तर या रताळ्याचा एक वेगळेच महत्व आणि ग्लॅमर मिळाले आहे. सेलिब्रिटीच्या डाएटमधील सर्वात महत्वाची भाजी, फळ म्हणून रताळ्याचा मान चांगलाच वाढला आहे. रताळ्याचा वापर अतिशय चविष्ट आणि तितक्याच आरोग्यदायी रेसिपी आपण बनवू शकतो. मात्र हे रताळे खाल्ल्याने आपल्या शरीराला नक्की लाभ कोणते होतात? सेलिब्रिटी खातात म्हणून तुम्ही देखील डोळे मिटून खातात का? तर थांबा आधी हे रताळे खाल्ल्याने काय फायदे होतात ते जाणून तर घ्या. (Marathi Latest News)

मधुमेह नियंत्रणात फायदेशीर
रताळ्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत करतो. त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. रताळ्यामुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते, त्यामुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी होते. (Good Food)

=======

हे देखील वाचा : Fairness Cream : सावधान! नियमित फेयरनेस क्रीमचा वापर करताय…? होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

=======

हृदयरोग प्रतिबंधक
रताळ्यामध्ये फायबर आणि पोटॅशियम जास्त प्रमाणात असते, त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. रताळ्यामध्ये असलेले फायबर खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे चांगले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते.

पचन सुधारते
रताळ्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, जे पचनासाठी खूप महत्वाचे आहे. ते खाल्ल्याने अन्न आतड्यांमध्ये सहज हलू शकते, ज्यामुळे पोषक तत्वांचे शोषण सुलभ होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या देखील कमी होते. (Celebrity News)

वजन कमी करण्यास फायदेशीर
रताळे वजन कमी करण्यास लाभदायक आहे. रताळ्यामधे असलेले फायबर पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते. त्यामुळे तुमच्या आहारात त्याचा समावेश करून तुमचा वजन कमी करण्याचा प्रवास सोपा होऊ शकतो. रताळ्यामध्ये फायबर असते, जे हळूहळू पचते आणि तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते, ज्यामुळे तुम्ही जास्त खात नाही आणि वजन वाढण्याची समस्या कमी होते.

Sweet Potato

बीपी नियंत्रणात राहते
रताळ्यामध्ये पोटॅशियम आढळते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे अनेक आजारांपासून बचाव होण्यास मदत होते. रक्तदाब नियंत्रणात ठेवल्यास हृदयविकार, मधुमेह, पक्षाघात यांसारखे धोकादायक आजार टाळता येतात. त्यामुळे रताळ्याचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लाभदायक
रताळ्यात जीवनसत्त्व C खूप प्रमाणात असते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यात असलेल्या कॅरोटेनॉइड्स आणि अँथोसायनिन्स शरीराला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देतात आणि यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 124 ग्राम गोड बटाट्यात 12.8 मिलीग्राम जीवनसत्त्व C असते.

डोळ्यांसाठी फायदेशीर
रताळ्यात जीवनसत्त्व A आणि बीटा कॅरोटिन मोठ्या प्रमाणावर आहे. ते UV किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करते. यासोबतच रताळ्यातील बीटा कॅरोटिन, अँथोसायनिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांच्या आरोग्याला सुधारतात आणि दृष्टिदोष होण्यापासूनही प्रतिबंधित करतात.

पचनशक्ती सुधारते
रताळे आहारात समाविष्ट केल्याने पचन संबंधित समस्या दूर होतात. रताळ्यात फायबर पचन प्रणालीला सुधारते. याशिवाय, रताळ्यातील खनिजे आणि जीवनसत्त्व बी पोटदुखी, आम्लता आणि constipation सारख्या समस्यांपासून बचाव करतात.

=============

हे देखील वाचा : Chhaava : थिएटरमध्ये गारद देऊन आपण शिवरायांचा अनादर करतोय का ?

=============

रताळे खाणे नक्कीच आपल्या शरीराच्या दृष्टीने उत्तम असले तरी ते सालीसह खाणे अधिक चांगले आणि फायदेशीर मानले जाते. कारण रताळ्याचा सालींमधे मोठ्याप्रमाणावर फायबर्स असतात. रताळ्याच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जसे की फिनोलिक कंपाउंड्स आणि फ्लेवोनॉइड्स, जे फ्री रॅडिकल्सशी लढायला मदत करतात.

रताळ्याच्या सालीत आतल्या भागापेक्षा अधिक व्हिटॅमिन C आणि E असतात, जे त्वचा आरोग्य आणि रोगप्रतिकारक वाढवण्यास मदत करतात. रताळ्याच्या सालीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅंगनीजसारखी आवश्यक खनिजे असतात, जी हृदयाच्या आरोग्यासाठी आणि स्नायूंच्या कार्यासाठी महत्त्वाची असतात.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.