आपल्या सगळ्यांच्या घरात रोज सकाळी नाश्ता बनतोच. नाष्टाशिवाय अनेक लोकं घराबाहेरच पडत नाही. अनेकांना नाश्ता म्हटले की, लगेच डोक्यात येतात ते पोहे. प्रत्येक महाराष्ट्रातील घरामध्ये पोहे नेहमीच बनतात. अनेकांचा आवडता नाश्ता देखील पोहेच आहे. पोह्यांशिवाय मराठी लोकांचा नाश्ता अपूर्णच असतो. पोहे हा पटकन तयार होणारा आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील खूपच फायदेशीर आहे. पोहे नाश्त्याला खाण्याचे फायदे कोणते ते आपण जाणून घेऊया.
फायबरचा स्त्रोत
पोह्यात फायबरचे प्रमाण पुरेसे असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते यामुळे तुमची पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. फायबरचा स्रोत असल्याने पोट साफ होण्याची समस्या दूर होऊ शकते.
लवकर भूक लागत नाही
अभ्यासानुसार पोहे खाल्ल्यानंतर आपले पोट भरलेले राहते आणि आपल्याला लवकर भूक लागत नाही. त्यामुळे आपण अतिरिक्त खाणे टाळतो.
चरबी वाढत नाही
तुम्ही नियमितपणे नाश्त्यात पोहे खाल्ल्यास तुमची पचनसंस्था सुदृढ राहते आणि जास्त खाण्याची सवय सुटते. त्यामुळे शरीरात अनावश्यक चरबी जमा होत नाही.
मर्यादित प्रमाणात करा सेवन
जाणकारांच्या माहितीनुसार, जर रोज मर्यादित प्रमाणात पोहे खाल्ले तर त्यामुळे तुमचे वजन वाढत नाही, मात्र जास्त प्रमाणात पोहे खाल्ल्याने लठ्ठपणा येऊ शकतो.
एनर्जी देते
सकाळी नाश्त्यात पोहे खाल्ले तर दिवसभर उत्साही वाटू शकते. पोह्यात कार्बोहायड्रेट्स आढळतात जे शरीराला एनर्जी देण्यास मदत करतात. नाश्त्यात एक प्लेट पोहे खाल्ल्याने दिवसभर उत्साही वाटू शकते.
बीपी नियंत्रित राहते
बीपीच्या रुग्णांसाठी पोहे खाणे फायदेशीर ठरू शकते. पोह्यात भरपूर फायबर असते आणि ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यापासून रोखते.त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर आहे.
पचनासाठी चांगले
पोहे हे अतिशय चांगले प्रोबायोटिक अन्न आहे. हे तुमच्या आतड्याच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स आणि फायबर्समुळे तुमची पचनशक्ती मजबूत होते.
रोगप्रतिकारशक्ती
पोहे खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते. कारण पोहे फक्त हिरव्या भाज्या वापरून बनवले जातात. याच्या मदतीने शरीराला प्रोटीन आयर्न आणि इतर आवश्यक पोषक घटक मिळू शकतात. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते.
लोहाची कमतरता भरून निघते
नियमितपणे एक प्लेट पोहे खाणाऱ्या व्यक्तीला लोहाची कमतरता भासत नाही. ॲनिमियाचा त्रास होत नाही. पोहे खाल्ल्याने हिमोग्लोबिन आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. लोह शरीराच्या पेशींना ऑक्सिजन पुरवतो. गरोदर महिलांनी आणि लहान मुलांनी याचे सेवन करावे. जेणेकरून त्यांच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढू शकेल.
ग्लुटेन फ्री
पोहे हा ग्लुटेन मुक्त आहार आहे, जर डॉक्टरांनी ग्लूटेन मुक्त आहार घेण्यास सांगितले असेल तर पोह्यांचा आहारात नक्कीच समावेश करा. मधुमेहींनाही त्यांच्या आहारात ग्लुटेनमुक्त आहाराचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.
( टीप : ही माहिती केवळ वाचनासाठी आहे. कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. )