Home » विड्याच्या पानाचे आरोग्यदायी फायदे

विड्याच्या पानाचे आरोग्यदायी फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Betel Leaf
Share

आपल्या देशाला दोन सर्वात मोठे आणि महत्वाचे वरदान लाभलेले आहेत. ते म्हणजे एक तर आयुर्वेद आणि दुसरे हजारो प्रकारच्या औषधी वनस्पती. लहान मोठ्या अशा अनेक प्रकारच्या असंख्य वनस्पती आहेत, ज्या आपल्या आरोग्यासाठी, शरीरासाठी खूपच उत्तम आहेत. अशीच एक वनस्पती म्हणजे नागवेलीची पाने अर्थात खाण्याचे पान किंवा विड्याचे पान. अगदी देवाच्या पूजेपासून, सणवार ते मुखशुध्दीपर्यंत या विड्याच्या पानांना मोठा मान आहे.

पान खाल्ल्याने की तोंडातील अनेक जीवाणूंचा प्रभावीपणे सामना केला जातो. ज्यामुळे तोंडाला दुर्गंध येत नाही. तसेच दात पोकळी, दात किडणे यांचा त्रास कमी होतो. जेवणानंतर पानाचा विडा किंवा नुसते पान चावून खाल्ल्याने आतड्या निरोगी राहतात.

मुखशुद्धीसाठी आपण नेहमीच मसाला पान, बनारस पान, आदी अनेक प्रकारचे पान खातो. पण तुम्हाला माहित आहे का, मुखवास म्हणून खाणाऱ्या या पंचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. विडा खाल्ल्याने अन्नाचे चांगले पचन होते. यासोबतच या पानांमध्ये कॅल्शियम, प्रोटीन, खनिजे, कार्बोहायड्रेट ,फायबर, व्हीटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात. जे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात. महिलांनी कॅल्शियमसाठी आणि हाडांचे आरोग्य टिकवण्यासाठी हा विडा नक्कीच खायला पाहिजे. पाहूयात विडा खाण्याचे फायदे…

१) विड्याचे पान खाल्ल्यामुळे युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी होते. विड्याच्या पानांमध्ये दाहक-विरोधी घटक आढळतात. हे सांधेदुखी कमी करण्यास मदत करते, जे संधिवात, ऑस्टिओपोरोसिस इत्यादीसारख्या अनेक जुनाट आजारांचे मुख्य लक्षण असू शकते. युरिक अ‍ॅसिडच्या समस्येने त्रस्त असलेल्या रुग्णांनी रोज विड्यांची पाने चावून खावी. परंतु, तंबाखू सेवन करू नये.

Betel Leaf

२) पोट आणि पचनाशी संबंधीत समस्यांवर रामबाण उपायजर तुमचं पोट फुगलेले किंवा जड असल्यासारखे जाणवत असेल तर अशावेळी हे विड्याचे पान जेवण पचवण्यासाठी मदत करते.

३) विड्याचे पान बद्धकोष्ठता, अल्सरसारखे आणि अॅसिडिटीसारख्या समस्या देखील दूर करते.

४) जेवणानंतर थोड्या प्रमाणात विड्याची पानं खाल्याने आतडे निरोगी राहतील.  श्वासाची दुर्गंधीही दूर होईल.  दात आणि हिरड्यांमधील वेदना, सूज आणि तोंडाच्या संसर्गापासून देखील आराम मिळेल.

५) टाईप 2 मधुमेह असलेल्या रूग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी विड्याच्या पानांच्या पावडर प्रभावी असल्याचे अनेक अभ्यासांनी सूचित केले आहे. विड्याचे पान एक मजबूत अँटिऑक्सिडेंट आहे. याशिवाय, अनियंत्रित रक्तातील ग्लुकोजमुळे होणारी जळजळ देखील कमी करते आणि मधुमेह नियंत्रणात ठेवते.

६) दातांमध्ये पायरियाची समस्या असेल तर पानात १० ग्रॅम कापूर घालून चावा. नियमित खाल्ल्याने लवकरच ही समस्या संपुष्टात येईल. यामुळे तोंड आल्यासही लवकर आराम मिळतो.

७) सर्दी झाल्यास पान लवंगेसोबत खाणे फायद्याचे आहे. खोकला दूर करण्यासाठी ओव्यासोबत चावून पान खाल्ले पाहिजे.

८) विड्याच्या पानामध्ये दाहक-विरोधी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे पिंपल्स दूर करण्यासाठी प्रभावी ठरतात. विड्याची पाने घ्या आणि त्यांची पेस्ट बनवा. आता त्यात 2 चिमूटभर हळद आणि कोरफडीचे जेल मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याच्या अनेक समस्या यामुळे दूर होतात.

९) पानात असे काही गुणधर्म असतात, जे आपल्या तोंडाची दुर्गंध लपवतात, ज्यामुळे ते माउथ फ्रेशनर म्हणून देखील काम करतात. म्हणूनच याला जेवणानंतर खाल्लं जातं.

=======

हे देखील वाचा : नवरात्र माळ दुसरी – देवी ब्रह्मचारिणी

=======

१०) विड्याचे पान चावून खाल्ल्याने हिरड्यांना सूज येण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळू शकते. यात असलेले घटक हिरड्यांची सूज कमी करतात.

११) खोकला, ब्राँकायटिस आणि दमा यांसारख्या श्वसनविषयक आजारांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदात सुपारीची पाने विशेषतः वापरली जातात. पानांमध्ये आढळणारी संयुगे रक्तसंचय दूर करण्यास आणि श्वासोच्छवास सुधारण्यास मदत करतात.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.