हिवाळ्याची चाहूल लागली की, आपल्या देशात लगबग सुरु होते ती, थंडीत खाल्ल्या जाणाऱ्या लाडूंची. भारतामध्ये हिवाळ्याचे मोठे आणि मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ‘मेथीचे लाडू’. आता मेथीचे लाडू म्हटले की, अनेकांच्या कपाळावर आठ्या येतात. याचे कारण म्हणजे हे नावाला जरी लाडू असले तरी चवीला मात्र ते कडवट असतात. त्यामुळे बऱ्याच लोकांना हे लाडू आवडत नाही. मात्र हे लाडू चवीला कडवट असले तरी आरोग्यच्या दृष्टीने मात्र अतिशय लाभदायक असतात. मेथीचे लाडू हे हिवाळ्यात निरोगी राहण्याचे रहस्य आहे. (Winter Health)
मेथीचे हे लाडू फक्त हिवाळ्यातच खाल्ले जातात यामागे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. हिवाळ्यात तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि तुमचे शरीर उबदार ठेवण्यासाठी हे लाडू खूपच उत्तम पर्याय आहे. हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता हे लाडू करतात. म्हणूनच हे लाडू हिवाळ्यात खाणे फायदेशीर असते. जाणून घेऊया हे लाडू खाण्याचे कोणते फायदे शरीराला होतात. (Health Care)
मेथी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच तुम्ही मेथीचे नियमितपणे सेवन केल्याने शरीरातील अनेक आजार बरे होण्यास मदत होते. मेथीचे नाहीतर मेथीच्या पानांचे देखील अनेक फायदे आहेत. मेथीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात आणि पोषक तत्वे देखील असतात. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. मेथीमध्ये आयर्न, कॅल्शियम, फायबर, प्रोटीन आणि झिंक, व्हिटॅमिन या सारखी गुणधर्म जे शरीरासाठी खूप उपयुक्त असतात. तसेच मेथीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म देखील आहेत. मेथीपासून बनवलेले लाडू आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. (Todays Marathi Headline)

थंडी सुरु होताच पाठदुखी, अंगदुखी आणि सांधेदुखीचा त्रास लोकांना होतो. थंड हवामानामुळे सांधेदुखीचा त्रास अनेकांना होतो, मात्र मेथीचे लाडू खाल्ल्याने सांधेदुखी दूर होते. मेथीचे लाडू खाल्ल्याने शरीरात ऊर्जा आणि उष्णता येते. थंडीत रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या वेदनांचा त्रासही वाढतो. जर तुम्हाला हिवाळ्यात सांधेदुखीची समस्या असेल तर तुम्ही मेथीचे सेवन जरूर करावे. मेथीच्या लाडूचे सेवन केल्याने वजन देखील नियंत्रणात राहते. आणि मेथीचे लाडू महिल्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. (Top Stories)
थंडीत मेथीचे लाडूही खाऊ शकता. मेथीचे लाडू गरम दुधासोबत छान लागतात. मेथीचे लाडू चविष्ट तर असतातच पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात. मेथीचे लाडू पाठ आणि सांधेदुखीपासून आरामात मदत करतात. बाळंतीण महिलांना मूल झाल्यावर मेथीचे लाडू खायला दिले जातात. मेथीचे लाडू वृद्धांची कमकुवत झालेली हाडे मजबूत करण्यास आणि शरीरातील उष्णता, शक्ती आणि रोग दूर करण्यास मदत करतात. मेथीचे लाडू नियमितपणे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलचा त्रास कमी होतो. अन्न पचनास मदत होते. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचे काम मेथीचे लाडू करते. या मध्ये असलेले फायबर, व्हिटॅमिन्स, पचनक्रिया सुधारण्यासाठी मेथीचे लाडू मदत करते. (Marathi News)
पोटातील गॅस आणि छातीतील कफ कमी करण्यासाठी मेथीचे लाडू रामबाण उपाय आहे. त्यासाठी तुम्ही सुंठ आणि मेथी समान प्रमाण घेऊन चूर्ण बनवून घ्या. आणि या चूर्णामध्ये गूळ मिक्स करून घ्या आणि त्याचे सेवन करा. हाडे मजबूत होण्यास मदत होईल. (Top Trending News)
सुंठ आणि मेथीचे लाडू बनवण्यासाठी साहित्य
गव्हाचे पीठ
तूप किंवा लोणी – 60 ग्रॅम
साखर किंवा गूळ – 3/4 कप
सुंठ – 1 टेस्पून
मेथी दाणे किंवा पावडर – 1 टेबलस्पून
बडीशेप- 2 चमचे
=========
Winter : हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी करा ‘या’ पौष्टिक लाडूंचे सेवन
Winter Trip : हिवाळ्यातील पर्यटनासाठी ‘ही’ आहेत भारतातील बेस्ट
=========
कृती
सर्वप्रथम कढई घेऊन त्यात गव्हाचे पीठ तुपात तळावे. पीठ फक्त मंद किंवा मध्यम आचेवर भाजायचे आहे हे लक्षात ठेवा. अन्यथा ते तळाशी चिकटू शकते. ते भाजेपर्यंत ढवळत राहा. १५ ते २० मिनिटांत हलका तपकिरी झाला तर गॅसवरून काढून टाका. नंतर भाजलेले पीठ काही वेळ ताटात थंड होण्यासाठी ठेवावे. त्यात भाजलेली सुंठ पावडर, मेथी आणि बडीशेप घाला. आता त्यात गूळ साखर घाला. लाडू चविष्ट बनवण्यासाठी त्यात काजू, बदाम, पिस्ता यांसारखे चिरलेले ड्रायफ्रुट्स टाका. संपूर्ण साहित्य चांगले मिसळा. यानंतर लाडू बनवा. लाडू बनवताना कठिण जात असले तर थोडे तूप घालावे. यानंतर मिश्रणाला लाडूचा आकार द्या आणि तुमचे लाडू तयार आहेत. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
