Home » Apple : सफरचंद खा आणि निरोगी राहा

Apple : सफरचंद खा आणि निरोगी राहा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Apple
Share

आपण नेहमीच एक म्हण ऐकत असतो आणि ती म्हणजे, “An Apple A Day Keeps The Doctor Away” अर्थात रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांना दूर ठेवा. म्हणजेच आपण जर रोज एक सफरचंद खाल्ले तर आपण आजारांना दूर ठेऊ शकतो आणि डॉक्टरांकडे जाण्याची आपल्याला गरज भासणार नाही. मग असे काय आहे या सफरचंदामध्ये की ते खाल्ल्यास आपण निरोगी राहू शकतो? चला तर मग जाणून घेऊया या सफरचंद खाल्ल्याने होणाऱ्या फायद्यांबद्दल. (Apple)

बाराही महिने बाजारामध्ये मिळणारे चाल चुटुक सफरचंद नेहमीच आपले लक्ष वेधून घेते. कधी अतिशय महाग तर कधी स्वस्त असणारे हे सफरचंद लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. आजारी माणसाला भेटल्या जाताना आपण नेहमीच सफरचंद घ्यायलाच प्राधान्य देतो. याचे कारण म्हणजे सफरचंदामध्ये असलेले आरोग्यवर्धक गुण. डॉक्टर देखील आजरी असल्यास सफरचंद खाण्याचाच सल्ला देतात. याचे कारण म्हणजे सफरचंदमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, मिनरल्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. सफरचंद खाल्ल्याने पोटात भर राहते. ज्यामुळे वजन देखील वाढत नाही. सफरचंदांमध्ये कॅलरीजही चांगल्या प्रमाणात असतात. (Apple Benefits)

वजन कमी करण्यास फायदेशीर
रोज सफरचंद खाल्ल्याने पोटात भरलेले राहते. ज्यामुळे अधिक भूक लागत नाही. पर्यायाने वजन कमी होण्यास मदत होते. सफरचंदमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते. यात पाण्याचे प्रमाणही खूप असते. सफरचंद आपण नियमित खाल्ले तर आपल्याला जेवणावर नियंत्रण ठेवता येते.(Top Marathi News)

Apple

हृदयासाठी लाभदायक
भरपूर फायबर असलेल्या सफरचंदामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा देखील मोठा गुणधर्म आहे. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारते. सफरचंद खाल्ल्याने शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होत नाही. एका अभ्यासानुसार, दररोज १०० – १५० ग्रॅम सफरचंद खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो आणि कठीण रोगांचा धोका कमी होतो. यामागचे एक मोठे कारण म्हणजे सफरचंदात फायबर असते. दुसरे मोठे कारण म्हणजे त्यात पॉलिफेनॉल असतात. (Marathi News)

========

हे देखील वाचा : Dr. Mahrang Baloch : बलूच शेरनीचे नाव नोबेल पुरस्कारासाठी !

========

पचन चांगले होते
पोटाच्या आणि पचनाच्या संबंधित समस्या असल्यास सफरचंद खाल्ल्याने नक्कीच फायदा मिळतो. यात फायबर असल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर राहते. सफरचंदमधून शरीराला पेक्टिनचे प्रमाणही चांगले मिळते. यामुळे आतड्याचे आरोग्य सुधारते. (Marathi Trending News)

रोगप्रतिकारशक्ती वाढते
सफरचंद खाल्ल्याने प्रतिकारशक्ती देखील वाढते. रोगप्रतिकारक शक्ती सुधारली तर आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. सफरचंद खाणारे लोकं लवकर आजारी पडत नाहीत. शरीरात असलेले विषारी द्रव्ये यकृत काढण्याचं काम करते. यकृत डिटॉक्स करण्यासाठी सफरचंद खाऊ शकता. (Social News)

मधुमेहाची शक्यता कमी
जर दररोज एक सफरचंद खाल्ले तर मधुमेह होण्याची शक्यता कमी होते. अभ्यासात असे समजले की, सफरचंद खाल्ल्याने मधुमेहाचा धोका १८ टक्क्यांनी कमी होतो. त्यामुळे आहारात एक सफरचंदाचे सेवन करणे लाभदायक ठरते.(Fruits And Health)

Apple

मेंदूचे संरक्षण होते
सफरचंदात असलेले अँटी-ऑक्सिडंट्स आपल्या मेंदूला ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात. एका विश्लेषणानुसार, क्वेरसेटीनमुळे सफरचंद खाल्ल्याने अल्झायमरवर उपचार होऊ शकतो.(Latest News)

मानसिक आरोग्य सुधारते
एका अभ्यासावरून सफरचंदामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंटमुळे जर हे फळ रोज खाल्ल्याने तुमचे मानसिक आरोग्य सुधारते. यामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो आणि मेंदू लवकर म्हातारा होत नाही.(Marathi Top News)

========

हे देखील वाचा : Five Eyes : फाइव्ह आयज आणि भारत !

========

कर्करोगाचा धोका कमी
सफरचंदांमध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट पॉलीफेनॉल असतात. त्यामुळे फुफ्फुस, स्तन आणि पचनसंस्थेच्या कर्करोगासह अनेक प्रकारच्या कर्करोगांवर सफरचंद फायदेशीर आहे. हे फळ कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखतात.(Health Care Tips)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.