आपल्याकडे एक पद्धत, परंपरा आहे की, आजारी माणसाला भेटायला जाताना नारळ पाणी नेण्याची. नारळ पाणी हे आजारी माणसाला ताकद देते. लढण्याची शक्ती देते सोबतच आजारातून लवकर बरे होण्यास मदत करते. नारळ पाण्याला अमृततुल्य पेय देखील म्हटले जाते. हे अगदी खरे आहे. नारळ पाणी आपल्या शरीरासाठी कोणत्याही अमृतापेक्षा कमी नाही. जर तुम्हाला देखील एक आरोग्यदायी आणि ताजे पेय पिऊ इच्छीता तर नारळपाण्यासारखं उत्तम पेय नाही.
आपल्या देशात अगदी छोट्या खेड्यापासून मोठमोठ्या शहरांपर्यंत सर्वत्र नारळ पाणी अगदी सहज उपलब्ध होते. शिवाय हे नारळ पाणी अगदी बाराही महिने मिळते. या नारळ पाण्याचे फायदे ऐकूनच किंवा त्याची माहिती झाल्यामुळेच अनेक सेलिब्रिटी देखील अगदी रोज न चुकता नारळ पाणी पितात. नारळ पाणी पिल्याने अनेक फायदे होतात. कारण त्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. नारळ पाणी हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. नारळ पाणी प्रत्येक ऋतूत प्यायला हवे. नारळाचे पाणी केवळ हायड्रेशनच्या दृष्टीनेच नाही तर शरीराला पोषण देण्याच्या दृष्टीनेही उत्तम आहे.
1. त्वचेचे आजार
नारळाचे पाणी आपल्याला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. नारळाच्या पाण्यात अँटिऑक्सिडेंट असल्याने शरीरावर सुरकत्या पडत नाहीत. नारळ पाणी त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. हे तुमच्या त्वचेचे संरक्षण करते. नारळ पाण्यात व्हिटॅमिन सी आणि ई देखील असतात जे त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.
2. किडनी स्टोन
किडनी स्टोन असलेल्या व्यक्तीला डॉक्टर भरपूर पाणी प्यायला सांगतात पण थोडे नारळाचे पाणीही प्यावे. कारण ते लघवीची वारंवारता वाढवते आणि दगड तयार करणाऱ्या खनिजांना कमी करते. त्यामुळे किडनी स्टोनमध्ये नारळाचे पाणी प्यायला हवे.
3. पचन चांगले होते.
नारळाच्या पाण्यात मुबलक प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे पचन सुधारण्यास मदत करते. यात एंजाइम देखील असतात जे तुम्ही खात असलेले अन्न बारीक करण्यास मदत करू शकतात. यामुळे पोटाचे आजार दूर राहतात.
4. इलेक्ट्रोलाइट
नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम यासारखे महत्वाचे इलेक्ट्रोलाइट्स असतात. हे शरीरातील द्रव संतुलन नियंत्रित करण्यास मदत करतात. ज्यांना खूप घाम येतो त्यांच्यासाठी नारळ पाणी मदत करु शकते.
5. रक्तदाब नियमन
नारळ पाणी प्यायल्याने रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी हे खूप चांगले आहे. उच्च पोटॅशियम सामग्रीमुळे ते सोडियमच्या प्रभावांना संतुलित करण्यास मदत करते.
=======
हे देखील वाचा : गरबा केल्याने आरोग्यास होतात ‘हे’ फायदे
=======
6. शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत
नारळाच्या पाण्यात ९४ टक्के पाणी असते, जे शरीराला पूर्णपणे हायड्रेट ठेवण्यास मदत करते. नारळाच्या पाण्यात आढळणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि सोडियम यांपासून शरीराला अनेक पौष्टिक घटक मिळतात.
7. वजन कमी करण्यास मदत करते
नारळाच्या पाण्यात कमी कॅलरीज असतात. त्यात ट्रान्स फॅट किंवा कोलेस्टेरॉल नसते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ते उत्तम पेय बनते. हे नैसर्गिक ऊर्जा बूस्टर म्हणून देखील कार्य करते, जे भूक कमी करते आणि अनियमित खाण्याच्या सवयी टाळण्यास मदत करू शकते.