आजच्या घडीला जवळपास प्रत्येक जणं हा आपल्या शरीरासाठी सजग झाला आहे. आपण काय खावे?, काय खाऊ नये?, कोणती गोष्ट शरीरासाठी चांगली कोणती वाईट? याचा विचार सगळेच करत आहे. त्यामुळे जड जेवणानंतर किंवा उन्हातून आल्यानंतर, ऍसिडिटी झाल्यानंतर गोळ्या औषधं घेण्यापेक्षा किंवा विदेशी कोणताही उपचार करण्याआधी सगळेच देशी किंवा घरगुती गोष्टी करण्यावर भर देताना दिसतात.
आपल्या सर्वांच्या घरात ताक हे हमखास बनत असते. ताकापासून विविध पदार्थ देखील भारतीय घरांमध्ये बनतात. आपण ताक पिण्यासाठी देखील अनेकदा वापरतो. आयुर्वेदामध्ये तर ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ शरीराबाहेर टाकून रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. शिवाय ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्त्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे, तर चेहऱ्यावरील काळे डाग जाऊन चेहरा तरतरीत, तेजस्वी होतो.
ताकात व्हिटॅमिन ‘B12’, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरससारखी अनेक महत्वाची आणि मोठी तत्वे असतात जी शरीरासाठी फारच फायद्याची आहेत. पोटाचा त्रास असलेल्यांची ताक प्यायल्याने त्यांचे आजार नाहीसे होतात. ताक प्यायल्यानंतर शरीराची ९० % झीज भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. साधारण माणसानेसुद्धा दररोज ताक प्यायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकद प्रचंड प्रमाणात वाढते. चला तर मग जाणून घेऊया ताक पिण्याचे महत्वाचे फायदे.
शरीराला नैसर्गिक थंडावा
ताक हे थंड पेय असल्यामुळे ते प्यायल्यामुळे शरीर लगेच थंड होते. उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. शरीरात निर्माण झालेली उष्णता देखील ताकामुळे कमी होण्यास मदत होते. मॅनोपॉजच्या काळात अनेक महिलांना अंगात दाह जाणवतो. अशा महिलांनी नियमित ताक प्यायल्यास त्यांना नक्कीच आराम मिळू शकतो.
पोटाच्या आजारांवर फायदेशीर
ताक हे आपल्या पचनसंस्थेसाठी वरदान असते. ताकामध्ये हेल्दी बॅक्टेरिआ आणि लॅक्टिक ॲसिड असते, ते पचनक्रियेत मदत करतात. व त्यामुळे चयापचय क्रिया सुधारते. यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. ताक हे इरिटेबल बाऊल सिंड्रोमवर उपचार करण्यातही उपयुक्त ठरते. ताकाचे सेवन केल्याने पोटाला होणारा संसर्ग आणि पोटाचा कॅन्सर रोखण्यास देखील मदत करते.
निरोगी हाडांसाठी उपयुक्त
ताक हे आपली हाडे आणि दातांसाठी अतिशय फायदेशीर असते. 100 मिलीलिटर ताकामध्ये सुमारे 116 ग्रॅम कॅल्शिअम असते. निरोगी हाडांसाठी कॅल्शिअम आवश्यक असते. ताकामुळे आपली हाडे आणि दातही मजबूत होतात. कॅल्शिअममुळे ऑस्टिओपोरायसिस सारख्या हाडाच्या आजारांना प्रतिबंध करता येतो.
डिहाड्रेशनपासून बचाव होतो
दह्यामध्ये भरपूर पाणी टाकून ते बराच वेळ घुसळण्यामुळे ताक तयार केले जाते. त्यामुळे दह्यापेक्षा ताकामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. ताकामध्ये नव्वद टक्के पाणी आणि पोटॅशिअमसारखे इलेक्ट्रोलेट असतात. ज्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. जेव्हा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा डिहायड्रेशनचा धोका निर्माण होतो. मात्र जर तुम्ही नियमित ताप पित असाल तर तुमचे शरीर सतत हायड्रेट राहते आणि डिहाड्रेशन होत नाही.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यास लाभदायक
ताकामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म असतात. नियमितपणे ताकाचे सेवन केल्यास रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यास मदत मिळते. त्यामुळे रक्त पेशींमध्ये सूज येत नाही. तसेच हृदयाचे आरोग्यही चांगले राहते.
उत्तम त्वचेसाठी
ताकामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड आपल्या त्वचेसाठी चांगले असते. ताकामुळे आपली त्वचा चमकदार बनते आणि ताक हे उत्तम स्किन क्लींजर आणि टोनर आहे. ताकामुळे टॅनिंग, मुरुमांमुळे निर्माण होणारे डाग दूर होण्यास मदत होते. ताक आपल्या त्वचेला मॉइश्चराइझ करते आणि चमकदार बनवते, ज्यामुळे ॲंटी- एजिंग प्रभाव होतो.
वजन कमी होण्यास मदत
ताकाचे सेवन केल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. ताकामध्ये प्रोटीन्स, व्हिटॅमिन आणि अनेक खनिजे मुबलक प्रमाणात असतात. मात्र त्यामध्ये कॅलरीज आणि चरबी अतिशय कमी असते. ताक प्यायल्याने आपण हायड्रेटेड आणि उत्साही राहतो. ताक प्यायल्यामुळे आपले पोट भरल्यासारखे वाटते व भूक कमी लागते. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी ताक हे एक आदर्श पेय आहे.
======
हे देखील वाचा : घरी ‘हे’ व्यायाम करा आणि पोटाचा घेर करा कमी
======
ऍसिडिटी कमी होते
तेलकट, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे किंवा बाहेरील पदार्थ खाण्यामुळे अनेकांना ऍसिडिटीचा त्रास जाणवतो. ज्यामुळे पोटदुखी, छातीत जळजळ, पोटात गॅस पकडणे असे त्रास होतात. मात्र यावर सोपा उपाय ताक पिणे. कारण ताकातील लॅक्टिक अॅसिड तुमच्या पोटातील ऍसिडिटी कमी करते आणि धणे पावडर आणि ताकाचा थंडावा छातीत होणारी जळजळ कमी करते.
रक्तदाब कमी होतो
बऱ्याचदा ताणामुळे आपला रक्तदाब वाढतो आणि हायपटेंशन, ह्रदयविकाराच्या समस्या वाढू लागतात. मात्र जर तुम्ही दररोज ताक पित असाल तर तुमचा रक्तदाब कमी होतो. कारण ताकामध्ये रक्तदाब नियंत्रित ठेवणारे पोटॅशिअम असते. यासाठीच उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांच्या आहारात ताक असायलाच हवे.