Home » Juice : लोकप्रिय ABC ज्यूस म्हणजे काय? या ज्यूसचे फायदे कोणते?

Juice : लोकप्रिय ABC ज्यूस म्हणजे काय? या ज्यूसचे फायदे कोणते?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Juice
Share

आजच्या सोशल मीडियाच्या काळात सेलिब्रिटी लोकं अनेकदा आपल्या अकाउंटवर त्यांचा डाएट प्लॅन पोस्ट करताना दिसतात. विविध मुलाखतींमध्ये देखील ते त्यांचे डेली रुटीन सांगतात. हे ऐकून त्यांचे चाहते देखील आपल्या आवडत्या सेलिब्रिटी सारखे उत्तम, निरोगी आरोग्य आणि कमनीय बांधा मिळवण्यासाठी त्यांचे डाएट फॉलो करताना दिसतात. (Juice)

उत्तम आरोग्यासाठी विविध प्रकारचे ज्यूस पिताना दिसतात. यामध्ये विविध फळांच्या, भाज्यांच्या ज्युसचा समावेश असतो. अशातच मधल्या काही काळापासून सेलिब्रिटींमध्ये ABC ज्यूस खूपच लोकप्रिय होताना दिसत आहे. हे ज्यूस अनेक सेलिब्रिटी दररोज पितात. मात्र आता अनेकांना प्रश्न पडला असेल की, हे ABC ज्यूस आहे तरी काय? कसे बनते हे ज्यूस आणि काय फायदे आहेत हे ABC ज्यूस पिण्याचे? चला तर मग जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरं. (ABC Juice)

ए म्हणजे अ‍ॅप्पल (सफरचंद), बी म्हणजे बीटरूट (बीट) आणि सी म्हणजे कॅरेट (गाजर). ABC ज्यूस हे शरीर डिटॉक्स करण्यासाठी उत्तम आहे. यामध्ये नायट्रेट्स, फायबर, व्हिटॅमिन ए, अँटिऑक्सिडंट्स तसंच बीटा कॅरोटीन, लोह, फॉलिक अ‍ॅसिड, मॅग्नेशियम, झिंक इत्यादी पोषक घटक पुरेशा प्रमाणात आढळतात. हा ज्यूस पोषक तत्वांचा पॉवर हाऊस आहे. तसचं हा ज्यूस मानसिक, शारीरिक तसंच केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. (Marathi)

==========

हे देखील वाचा : Urine Therapy : सगळीकडे चर्चेत असलेली युरीन थेरपी म्हणजे काय?

==========

Juice

सफरचंद, बीट आणि गाजरमध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, के आणि पोटॅशियम, लोह अशा अनेक प्रकारची खनिजे आढळतात. याशिवाय यामध्ये फायबर देखील मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळेच हे ज्युस खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सी आणि के आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. या ज्यूसमध्ये असलेल्या अँटी-ऑक्सिडेंट्समुळे हा ज्युस ऑक्सिडेटिव्ह नुकसान टाळण्यासही मदत करतो. हा रस केवळ तुमच्या शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठी तसेच मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. मग हा ज्यूस पिण्यास अजून कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया. (Health News)

प्रतिकारशक्ती मजबूत होते
भरपूर पोषक आणि अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे हा रस आपली रोग प्रतिकारशक्ती मजबूत करतो. हे ज्यूस प्यायल्याने शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढतात. हा रस प्यायल्याने शरीराला आवश्यक अनेक पोषक आणि जीवनसत्त्वांची कमतरता दूर होते.

शरीर डिटॉक्स होते
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याकरिता ABC ज्यूस खूपच फायदेशीर आहे. यामुळे शरीर योग्यरित्या डिटॉक्स होत असून त्वचेवर वेगळीच नैसर्गिक चमक येते. हे एक बेस्ट डिटॉक्स ड्रिंक आहे. (Marathi Latest News)

अकाली वृद्धत्व कमी होते
व्हिटॅमिन सी, ए, के, बी आणि ई सारख्या घटकांच्या उपस्थितीमुळे, हा रस वृद्धत्वाचा प्रभाव कमी करण्यास देखील उपयुक्त आहे. याचे सेवन केल्याने त्वचा अधिक काळ घट्ट आणि तरुण राहते.

Juice

केसांसाठी फायदेशीर
हा रस प्यायल्याने केस निरोगी राहतात कारण त्यात लोह, इलेक्ट्रोलाइट्स आणि पोटॅशियम असते. यामुळे केस लांब, दाट आणि मजबूत होतात.

वजन नियंत्रित राहते
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा रस प्यायल्याने वजन कमी होते. यामध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्याने हा रस प्यायल्याने पोट भरते. यामुळे विनाकारण भूक लागत नाही. (Marathi Trending News)

पचनक्रिया चांगली राहते
फायबरचे प्रमाण चांगले असल्याने पचनक्रिया चांगली राहते. बद्धकोष्ठता, गॅस, एसडीटी सारख्या समस्या दूर राहतात.

हृदयासाठी फायदेशीर
एबीसी ज्यूस शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतो, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयाशी संबंधित आजार दूर राहतात.

विषारी द्रव्य बाहेर काढले जातात
सफरचंद, बीटरुट आणि गाजरचा रस प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत होते. बीटरूट आणि गाजरमध्ये डिटॉक्सिफायिंग गुणधर्म असतात. जे यकृतासाठी खूप फायदेशीर असते. (Social News)

नजरेसाठी फायदेशीर
डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए मदत करते. गाजर आणि बीट यात व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात आढळते, जे डोळे निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही जर हा ज्युस पित असाल तर तुमचे डोळे कमजोर होणार नाहीत.

त्वचेसाठी फायदेशीर
तुम्हाला जर निरोगी आणि चमकदार त्वचा हवी असेल तर तुम्ही तुमच्या आहारात या ज्युसचा समावेश केला पाहिजे. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. (Marathi Top Stories)

रक्तशुद्धीकरण
बीटरूट रक्तशुद्धी करणारे प्रभावी घटक आहे. बीट व गाजरातील पोषकतत्त्वे रक्तातील टॉक्सिन्स दूर करून रक्त परिसंचरण सुधारतात.

तणाव कमी करतो
ABC ज्यूस मानसिक आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. यातील अँटीऑक्सिडंट्स मेंदूला शांत ठेवण्याचे काम करतात, ज्यामुळे तणाव आणि नैराश्य कमी होते.

Juice

==========

हे देखील वाचा : Leukorrhea : व्हाईट डिस्चार्ज होतो…? आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी ‘ही’ फळे खाल्ल्यास होतील भरपूर लाभ

==========

ABC ज्यूस कसे तयार करावे आणि कधी प्यावे?

साहित्य :-
१ मध्यम आकाराचे रसाळ सफरचंद, १ मोठे गाजर, १/२ मध्यम आकाराचे बीट, चिमूटभर काळे मीठ.

कृती :-
सर्वप्रथम सफरचंद कापून घ्यावे, त्यानंतर बीट आणि गाजर सोलून घ्या. सर्व साहित्य चांगले धुवून घ्यावे. त्यानंतर हे सर्व साहित्य तीन-चतुर्थांश कप पाण्यासोबत मिक्सरमध्ये टाका आणि चांगले बारीक करून घ्या. आता एका ग्लासमध्ये काढा, वर काळे मीठ टाकून घ्या. या ज्यूसमध्ये लिंबू देखील पिळून घातलेला चालतो.

* हा ज्यूस सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास त्याचे फायदे जास्त मिळतात. शरीराला ताजेतवाने वाटते आणि दिवसभर स्फूर्ती राहते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.