थंडी सुरु झाली की, आपोआपच थोडातून चहा असा शब्द निघतो. भारतात चहा पिणाऱ्या लोकांची संख्या सर्वात जास्त आहे. आपल्याकडे चहा न पिणारे लोकं अगदी बोटावर मोजण्या इतकेच असतील. बोचऱ्या थंडीत चहा आणि त्यातही आल्याचा चहा म्हटल्यावर स्वर्गच जणू. चहा मध्ये आले टाकून चहा पिणे म्हणजे स्वर्ग सुखच. आल्याचा चहा जवळपास सगळ्यांनाच आवडतो. काही लोकं तर बाराही महिने आल्याच्या चहा पितात तर काही फक्त हिवाळ्यामध्ये आल्याचा चहा पितात. तुम्हाला माहित आहे का की हिवाळ्यात आल्याचा चहा प्यायल्याने आपल्या शरीराला आणि आरोग्याला अनेक फायदे होतात.
हिवाळा सुरु झाला की, लगेच त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि सर्दी, खोकला असे आजार डोके वर काढायला लागतात. हिवाळ्यात आपले शरीर उबदार ठेवणे अत्यंत महत्वाचे असते कारण रोग आणि संक्रमणांपासून स्वत: चे संरक्षण होईल. आल्याशिवाय चहाचा आनंद अपूर्ण आहे. आल्याच्या चहामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध आल्यापासून बनवलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आल्याचा चहा पिण्याचे मोठे फायदे कोणते आहेत ते जाणून घ्या.
मासिक पाळीमध्ये उपयुक्त
मासिक पाळीदरम्यान महिलांना मोठ्या प्रमाणावर असहनीय त्रास होतो. या काळात होणाऱ्या वेदना हा त्रास कमी करतो. तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये आल्याच्या चहाचा समावेश करू शकता. आल्यामध्ये असलेले घटक तुमच्या मासिक पाळीच्या सुरुवातीला जळजळ कमी करण्यास आणि पेटके कमी करण्यास मदत करतात.
साखरेची पातळी नियंत्रित
आल्याचा चहा सेवन केल्याने फास्ट इन्सुलिनची पातळी, हिमोग्लोबिन ए १ सी आणि ट्रायग्लिसेराइड्स कमी होतात, संभाव्यत: टाइप २ मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी होते.
तणाव कमी होतो
ऋतू कोणताही असून दे, लोकांना काही ना काही त्रास असतात. अशा परिस्थित आल्याची चहा काही प्रमाणात तणावपासून दूर राहण्यास मदत करते.
रक्ताभिसरणास मदत
थंडीत रक्ताभिसरणाच्या समस्या वाढतात. तसेच आल्यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन्स, मिनिरल्स आणि अॅमिनो अॅसिड हे थंडीत रक्ताभिसरण क्रियेस मदत करतात. त्यामुळे खास करुन वयोवृद्धांनी या आल्याच्या चहाचे थंडीत सेवन करावे.
संसर्गापासून रक्षण
हिवाळ्यात अनेकदा रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते, ज्यामुळे अनेक प्रकारचे आजार आणि इन्फेक्शनला लोकं सहज बळी पडतात. अशावेळी आल्याचा चहा तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरेल. यामध्ये असणारे पोषक घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि आजारांपासून बचाव करतात.
मेंदूची कार्यक्षमता सुधारते
आल्याचा चहा शरीराला निरोगी बनवण्यासोबतच तुमचा मेंदूही निरोगी बनवतो. तसेच आल्याचा चहा घेतल्याने ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळ होण्यापासून संरक्षण करते, जे अल्झायमरसारख्या न्यूरोडीजेनेरेटिव्ह रोगांच्या विकासात दोन प्रमुख कारक आहेत. त्यामुळे मेंदूची कार्यक्षमताही सुधारते.
मोशन सिकनेससाठी फायदा
खूप कमी लोकांना माहित असेल की आल्याचा चहा मोशन सिकनेसपासून मुक्त होण्यास देखील मदत करतो. आल्याच्या चहाचे सेवन केल्यास तुम्हाला चक्कर येणे, मळमळ आणि घाम येणे यासारख्या मोशन सिकनेसची लक्षणे घालवण्यास मदत होते.
मळमळ कमी होते
गर्भवती महिला, केमोथेरपी घेत असलेले रुग्ण किंवा शस्त्रक्रिया झालेले लोकांनी आल्याचा चहाचे सेवन केल्यास होणारी मळमळ दूर होते. ल्यामध्ये असलेले जिंजरॉल्स घटक मळमळीपासून तुम्हाला दूर ठेवते.
सर्दी पासून बचाव
थंडीमध्ये प्रवास करणार असाल तर प्रवासाला निघण्यापूर्वी आल्याची चहा प्यावी. त्यामुळे प्रवासादरम्यान होणाऱ्या सर्दीच्या शंकेचे निरसन होण्यास मदत होते.
=======
हे देखील वाचा : हिवाळ्यात बाजरीचे सेवन शरीरासाठी ठरेल वरदान
=======
पचनक्रिया योग्य राहते
आल्याची चहा खाल्लेले अन्न पचवण्यासाठी थंडीत मदत करतो. जेवल्यानंतर एक कप आल्याचा चहा प्यायल्यास पोटाच्या संबंधित थंडीत होणारे आजार दूर राहतात.
हाडांना मजबूती
आल्यामध्ये असणारे आयुर्वेदिक तत्वांमुळे थंडीतत्याची चहा प्यायल्यास पेशी आणि स्नायूंना थंडीच्या काळात मजबूत राहण्यास मदत होते.
अॅलर्जींपासून बचाव
थंडीच्या काळात हवेची आद्रता खूप वाढते. तसेच काही वेळेस लोकांना श्वास घेण्यास त्रास होतो. यावर आल्याचा चहा अत्यंत साधा सोपा उपाय आहे.