आपल्याकडे अनेकांचा वास्तुशास्त्रावर विश्वास आहे. वास्तुशास्त्रानुसार घर बंधने, त्यात बदल करणे, वास्तुशास्त्रानुसारच घरात वस्तू ठेवणे आदी अनेक गोष्टी बरेच लोकं पाळताना दिसतात. वास्तुशास्त्रानुसार आपले घर असले किंवा आपण तसे बदल केले तर त्याचा परिणाम थेट आपल्या जीवनावर आणि जीवनात घडणाऱ्या गोष्टींवर होतो अशी मान्यता आहे. आपण तर वास्तुशास्त्रामध्ये निपुण असलेल्या लोकांचा सल्ला घेऊन घरात काही गोष्टी ठेवल्या तर नक्कीच त्याचे लाभ होतात, अशी धारणा आहे.
जर आपल्या आयुष्यात अनेक प्रयत्न करून, मेहनत घेऊनही यश मिळत नसेल तर लोकं निराश होतात. आपल्या प्रयत्नांना, मेहनतीला यश मिळावे यासाठी विविध उपाय देखील केले जातात. ज्योतिषाचा सल्ला घेतला जातो, देवाचा धावा केला जातो. कोणी काही उपाय सांगितला की लगेच तो केला जातो. आपल्या कामात, आयुष्यात यश मिळवण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये देखील अनेक उपाय सांगितले आहेत. ज्यांचा वास्तुशास्त्रावर विश्वास आहे, ते लोकं हे उपाय नेहमीच आणि रोजच्या आयुष्यात अंमलात आणताना दिसतात.
आपण जर पाहिले तर अनेक घरांमध्ये, ऑफिसेसमध्ये पळणाऱ्या घोडण्यांचे चित्र लावलेले दिसते. हे पाळणारे घोडे वास्तुशास्त्रानुसार यशाचे आणि प्रगतीचे प्रतीक मानले गेले आहे. त्यामुळे यातल्या तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेऊन हे चित्र लावले जातात. हे घोड्यांचे चित्र फक्त यशासाठी नाही तर भरभराटीसाठी देखील उत्तम मानले गेले आहे. यामुळे आत्मविश्वास वाढीस लागून नकारात्मकता दूर होते.
वास्तुशास्त्रात आयुष्यात यश मिळवण्यासाठी आणि सुखी राहण्यासाठी अनेक मार्ग सांगितले गेले आहेत. वास्तुशास्त्रानुसार ७ धावत्या घोड्यांची पेंटिंग लावल्याने तुम्हाला अनेक बाबतीत यश मिळू शकते. मात्र तुम्हाला माहित आहे का की फक्त ७ धावणाऱ्या घोड्यांचेच चित्र का लावले जाते? वास्तुशास्त्रानुसार, ७ संख्या ही नैसर्गिक आणि नशीबवान मानली गेली आहे. कारण आठवड्यात दिवस सात असतात, इंद्रधनुष्यात रंग सात, सात मुख्य ऋषी अर्थात सप्तर्षी, लग्नातील एक विधी अर्थात सप्तपदी, सात जन्म. आदी गोष्टींच्या सात या अंकावरून हा अंक शुभ मानला गेला आहे. मात्र हे धावणाऱ्या सात घोड्यांचे चित्र कधी कुठे कसे लावावे? याचे देखील काही नियम आहेत. कोणते ते जाणून घेऊया.
– तुम्ही काम करण्यासाठी केबिनमध्ये बसता तेव्हा हे सात घोड्यांचे चित्र अशा प्रकारे भिंतीवर लावा की घोडा जणू आत येत आहे. यामुळे तुमच्या व्यवसायात प्रगती होऊन तुम्हाला कधीही पैशांची कमतरता भासणार नाही.
-वास्तुनुसार कामाच्या ठिकाणी तसेच घरामध्ये सात धावणाऱ्या घोड्यांचे चित्र पूर्व दिशेला लावल्यास तुमच्या कामकाजावर याचा चांगला परिणाम होतो, आणि काम करण्याची क्षमता देखील वाढते.
–घरामध्ये सात घोड्यांच्या रथावर सूर्य देवाचे चित्र लावल्यास ते खूप शुभ असते. जर तुम्हाला शुभ परिणाम हवे असतील तर तुम्ही हे चित्र पूर्व दिशेला लावावे.
– वास्तुशास्त्रानुसार सात धावत्या घोड्यांचे छायाचित्र घराच्या दक्षिण दिशेला लावले तर ते यश आणि यशाचा कारक बनते.
– घरात धावणाऱ्या घोड्याचे चित्र लावण्यापूर्वी लक्षात ठेवा की घोड्यांचे चित्र हे युद्धामध्ये रथ ओढत असलेले नसावे. चित्र अगदी साधे असावे आणि त्यात फक्त धावणारे घोडे असावे.
– तसेच घरामध्ये किंवा ऑफिसच्या केबिनमध्ये आक्रमक ७ धावत्या घोड्यांचे चित्र वास्तूनुसार दुर्दैवाचे प्रतीक मानले जाते. वास्तुनुसार सात पांढरे घोडे शांततेने वास्तू चालवतात आणि ते समृद्धी आणि सौभाग्य आणतात. म्हणून ७ धावणाऱ्या घोड्यांच्या वास्तू छायाचित्रासाठी पांढरा रंग सर्वात योग्य मानला जातो.
– जर तुम्हाला दक्षिण दिशेला धावणाऱ्या घोड्यांचे चित्र लावता येत नसेल, तर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या खिडकीवर धावत्या घोड्याची मूर्ती ठेवू शकता. फक्त घोड्याचा चेहरा खिडकीतून बाहेर पाहत असल्याची खात्री करा.
– जर तुम्ही कर्जामुळे त्रस्त असाल तर पश्चिम दिशेला कृत्रिम घोड्याच्या जोडीची मुर्ती ठेवावी. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि लक्ष्मी सदैव वास करते.
( टीप : वरील माहिती केवळ वाचनासाठी आहे, आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. शिवाय कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)