Home » केसांना आठवड्यातून किती वेळा तेल लावावे? घ्या जाणून

केसांना आठवड्यातून किती वेळा तेल लावावे? घ्या जाणून

by Jyotsna Kulkarni
0 comment
Hair Care
Share

प्रत्येक व्यक्तीसाठी आपले केस खूपच महत्वाचे असतात. किंबहुना चेहऱ्यापेक्षा जास्त केसांवर प्रेम करणारी अनेक लोकं आपल्याला पाहायला मिळतील. केसांची निगा राखण्यासाठी आपली आजी तिच्या बटव्यातले अनेक उपाय सांगायची आणि करून पण द्यायची. मात्र आता बाजारामध्ये विविध प्रोडक्ट आले आहे, जे वापरून तुम्ही तुमचे केस जपू शकता.

मात्र असे असले तरी केसांना तेल लावण्याचा नियम कोणीही चुकवत नाही. काही रोजच तेल लावतात तर काही आठवड्यातून एकदा तर काही महिन्यातून एकदा. प्रत्येक व्यक्तीचा केसांना तेल लावण्याचा आपला एक नियम आहे. त्यामुळे विविध लोकं केसांना किती तेल लावावे कधी लावावे याबद्दल एकमेकांना सल्ले देताना दिसतात. तेल लावल्यामुळे केसांना पोषण मिळते आणि केस गळण्यापासून थांबतात. केसांमधले तेल केवळ त्यांची वाढ वाढवण्यासाठीच नाही तर टाळूचे पोषण करण्यासाठी देखील वापरले जाते. याशिवाय केसांना तेल लावल्याने केस तुटणे आणि नुकसान होण्यापासून बचाव होतो.

केसांचे सौंदर्य जपण्यासाठी तेल लावणे देखील आवश्यक आहे. मात्र हे तेल आठवड्यातून कितीवेळा लावावे ते जाणून घेऊया. प्रत्येकाने आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा केसांना तेल लावावे. यामुळे केसांना वेळ चे वेळी मॉइश्चरायझेशन मिळते आणि त्यांची वाढ होते. याशिवाय केस गळत नाहीत. तुमचे केस कोरडे असल्यास त्यांना आठवड्यातून तीन ते चार वेळा तेल लावा. जर तुमचे तेलकट केस असल्यास दोनदा तेल लावा. जर तुमचे केस सामान्य असतील तर आठवड्यातून २ ते ३ वेळा तेल लावा. तेल लावण्याशी संबंधित खालील महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

Hair Care

तेल लावण्यापूर्वी आपल्या टाळूची त्वचा स्वच्छ आहे की नाही याची खात्री करून घ्या. स्वच्छ टाळूवर तेल लावल्यास तेलातील पोषक घटकांचा खोलवर पुरवठा होतो. अस्वच्छ केसांना तेल लावल्याने कोंडा होतो आणि हे जास्त काळ टिकते. त्यामुळे स्वच्छ टाळूलाच तेल लावावे.

केसांना शॅम्पू करण्यापूर्वी केसांना तेल लावणे महत्वाचे असते. याचे कारण दोन आहेत. एक तर ते शॅम्पू करण्यापूर्वी केसांचे पोषण आणि मॉइश्चरायझेशन करते आणि दुसरे म्हणजे, तेल लावल्यानंतर केस धुतले तर केस गळत नाहीत.

======

हे देखील वाचा : बद्धकोष्ठता ते पचनासंदर्भातील समस्यांवर रामबाण उपाय जायफळ

======

जर तुम्ही तेल लावत असाल तर नेहमी तेल थोडे गरम करा आणि नंतर ते लावा. केसांना कोमट तेल लावल्यास मुळांना पोषक द्रव्ये तर मिळतातच, पण असे केल्याने केस निरोगीही होतात. जर तुम्हाला केसांची वाढ हवी असेल किंवा तुमचे केस बराच काळ वाढत नसतील तर तुम्ही केसांना कोमट तेल लावू शकता. असे केल्याने केस लवकर वाढतात. यासोबतच कोंड्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

अनेकांचा असा समज आहे की, केसांना अधिक वेळ तेल लावून ठेवल्याने स्काल्पला पोषण मिळते. पण असे होत नाही. अधिक वेळ केसांना तेल लावून ठेवल्याने धूळ जमा होते. यासह स्काल्प आणि त्वचा तेलकट होते. मुख्य म्हणजे केसांना तेल लावल्यानंतर कंगव्याने विंचरू नये. यासह घट्ट बांधू नये. यामुळे केस अधिक प्रमाणात गळू शकतात.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.