भारतीय लोकं सकाळी उठले की, त्यांना सर्वात आधी हातात चहाचा कप लागतो. चहाशिवाय भारतीय लोकांचा दिवस सुरु होत नाही. चहा आणि बिस्कीट हा अनेक घरांमध्ये अतिशय प्रसिद्ध आणि दररोज होणारा नाश्ता आहे. चहा आणि बिस्कीट हे अतिशय जुने आणि प्रसिद्ध कॉम्बिनेशन आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अशा विविध वयोगटात चहा-बिस्कीटचा नाश्ता हा आवडीचा नाश्ता आहे. चहा हे भारतीयांचे आवडते पेय आहे. मात्र चहा बिस्कीट खाणे हे चवीला जरी अतिशय चांगले लागत असले तरी आरोग्याच्या दृष्टीने खूपच घातक आहे. बहुतेक लोक चहामध्ये बुडवलेले बिस्किट खातात. मात्र, बाजारात उपलब्ध असलेले बहुतेक बिस्किटे रिफाइंड पीठ, जास्त साखर, मीठ आणि प्रिझर्व्हेटिव्ह्जने भरलेले असतात. चहासोबत ते खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. शिवाय, त्याचे इतरही अनेक तोटे आहेत. (Health)
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चहा आणि बिस्किटे एकत्र कधीही खाऊ नयेत. बिस्किटे बनवण्यासाठी रिफाइंड पीठ आणि हायड्रोजन फॅट्स वापरतात. त्यामुळे वजन आणि लठ्ठपणा दोन्ही वाढू लागतात. यामुळेच डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञ चहा आणि बिस्किट एकत्र खाण्याचा सल्ला देत नाहीत. चहा-बिस्कीट खाल्ल्याने काही क्षणांसाठी आपल्याला काही खाल्ल्याचा आनंद वाटू शकतो. मात्र, आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतो. बहुतांश बिस्किटे रिफाइंड पीठापासून (मैदा) बनवले जातात, ज्यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे नसतात. त्यात केवळ जास्त कॅलरीज असतात. चहासोबत बिस्किटे खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते, पण त्यातून शरीराला पोषण मिळत नाही. यामुळं पोट भरल्यासारखं वाटतं पण नंतर सतत भूक लागते. (Marathi News)
बिस्कीटांमध्ये जास्त प्रमाणात कॅलरी आणि हाइड्रोजेनेटेड फॅट्स असतात. मारीच्या बिस्कीटमध्ये ४० कॅलरीज असतात. तर क्रिमच्या बिस्किटांमध्ये जवळपास १०० ते १५० कॅलरीज असतात. त्यात बरीचशी बिस्कीटे ही मैद्यापासून बनलेली असतात. मैदा हा इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण करण्यास मदत करतो आणि त्यामुळे वजन वाढते. चहा उष्ण आणि उत्तेजक असतो, त्यात कॅफीन असते जे पचनसंस्थेला तात्पुरती चालना देतो. पण शरीरात लोहासारख्या काही पोषक घटकाच्या शोषणात अडथळा आणतो. बिस्कीटमध्ये मैदा, साखर, हायड्रोजनेटेड तेल किंवा ट्रान्स फॅट, प्रक्रिया केलेला पदार्थ असतात जे जड आणि पचायला कठीण आहे. (Todays Marathi Headline)

काही बिस्कीटांमध्ये तर, विविध केमिकल्सचा समावेश असतो. हे केमिकल्स बिस्कीटांची अंतिम मुदत वाढवण्यास मदत करतात. बिस्कीटांमध्ये अतिप्रमाणात साखर आणि मिठाचा समावेश असतो. जास्त प्रमाणात सोडियमचा समावेश असतो. यामुळे, शरीरात पाणी साचले जाते. यामुळे शरीरावर सूज येणे, शरीर फुगणे किंवा वजन वाढू शकते. याच कारणाने उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा जास्त वजन असलेल्या व्यक्तींनी बिस्कीटे खाणे टाळावे. चहा आणि बिस्किटे यांचे मिश्रण पोटासाठी देखील चांगले नाही. ते खाल्ल्याने गॅस, आम्लपित्त आणि पोटफुगी होऊ शकते. (Top Marathi News)
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, बिस्किटे अधिक कुरकुरीत करण्यासाठी हायड्रोजनेटेड तेले किंवा ट्रान्स फॅट्सचा वापर केला जातो. ट्रान्स फॅट्स हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. या फॅट्सचे नियमित सेवन केल्याने वाईट कोलेस्ट्रॉल वाढते आणि चांगले कोलेस्ट्रॉल कमी होते, ज्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. चहामध्ये कॅफिन आणि साखर असते. दुसरीकडे, बिस्किटांमध्ये रिफाइंड पीठ, अस्वास्थ्यकर चरबी आणि साखर भरपूर असते. ते खाल्ल्याने साखरेचे प्रमाण अचानक वाढू शकते. (Latest Marathi Headline)
चहा आणि बिस्किटे खाल्ल्यानेही वजन वाढू शकते. बिस्किटांमध्ये कॅलरीज, मैदा, साखर आणि ट्रान्स फॅट्स जास्त असतात, जे शरीराला जास्त पोषण देत नाहीत परंतु चरबी जमा होण्यास हातभार लावतात. यामुळे चयापचय मंदावतो, ज्यामुळे वजन वाढते. शुगर फ्री बिस्कीटेसुद्धा खाताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण शुगर फ्री बिस्किटांमध्ये aspartame आणि sucralose सारखी आर्टिफिशिअल साखर असते. जी आपल्या मेटाबॉलिझमवर परिणाम करते. (Top Trending News)
=========
Breakfast : जाणून घ्या सकाळी नाश्ता करण्याची योग्य वेळ आणि नाश्ता करण्याचे फायदे
=========
हाडे आणि दात कमजोर होण्यास चहा आणि बिस्कीट खूप प्रमाणात कारणीभूत आहे, वयाच्या ३० ते ३५ पर्यंत चहा बिस्कीट खात राहिल्यास हाडे आणि दात कमजोर होण्याची शक्यता असते. बिस्कीट आणि इतर बेकरी प्रॉडक्टमुळे रक्तातील pH value कमी झाल्यामुळे असे घडून येते. चहा-बिस्किट एकत्र खाल्ल्याने दात खराब होऊ शकतात. चहा-बिस्किटमध्ये आढळणाऱ्या सुक्रोन्झमुळे दात किडतात. चहा बिस्किटे जास्त प्रमाणात खाल्ल्याने दातांचे अनेक आजार होऊ शकतात. त्याच्या परिणामी दात पडणे, दात किडणे, दाढ दुखणे, काळे डाग पडणे, दाढेमध्ये खड्डा पडणे आदी समस्याही चहा-बिस्किटांमुळे होऊ शकतात. (Social News)
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
