Home » अमृत वाटणारा चहा रिकाम्या पोटी घेतला तर होतील ‘हे’ गंभीर दुष्परिणाम

अमृत वाटणारा चहा रिकाम्या पोटी घेतला तर होतील ‘हे’ गंभीर दुष्परिणाम

by Jyotsna Kulkarni
0 comment
know side effects of drinking tea on an empty stomach
Share

आपल्या भारतीय लोकांसाठी सकाळ झाली म्हणजेच चहा पिण्याची वेळ. काही लोकांसाठी चहा म्हणजे अमृत आहे. अनेकांना तर सकाळी उठल्यावर चहा मिळाला नाही तर सकाळ झाल्यासारखीच वाटत नाही. ब्रश केल्यानंतर चहा हवाच अशी लोकं आपल्या देशात सर्वात जास्त सापडतील. मात्र तुम्हाला माहित आहे का…? चहा पिण्याचे अनेक तोटे सांगितले जातात. फायदे देखील नक्कीच असतील, मात्र तोटेच सर्वात जास्त सांगितले जातात. (know side effects of drinking tea on an empty stomach)

चहाचे आपण कितीही तोटे सांगितले तरी चहा पिणाऱ्यांवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. सकाळी आणि संध्याकाळी चहा पिणे हे आपल्या भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटकच बनले आहे. कमी प्रमाणात आणि नीट काळजी घेऊन चहा घेतला तर त्याचे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होणार नाही. आपण आपण जर पाहिले तर चहा पिण्याच्या बाबतीत बहुतांशी लोकं एक चूक करतात जी त्यांच्या आरोग्यासाठी खूपच घातक ठरू शकते. ही चूक म्हणजे सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी चहा पिणे.

know side effects of drinking tea on an empty stomach

हे देखील वाचा : दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी गंभीर आणि दुर्मिळ आजाराचा सामना, हसूच ठरले आजाराचे कारण

सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी चहा पिण्याचे अनेक तोटे आहेत, जे तुमच्या शरीरासाठी खूपच हानिकारक ठरू शकतात. चला तर जाणून घेऊया या तोट्यांबद्दल.

उठल्यावर लगेचच चहा घेतला तर तो पोटासाठी सर्वात जास्त त्रासदायक ठरू शकतो. असे केल्याने पोत्याच्या तक्रारी वाढतात, ज्यात अॅसिडिटी, गॅस, पोट फुगणे आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवतात. ज्यांना आधीपासूनच्या पोटाच्या समस्या आहेत त्यांनी रिकाम्या पोटी चहा पिऊ नये. चहामध्ये अॅसिडचे प्रमाण जास्त असल्याने सकाळी रिकाम्या पोटी चहाचे सेवन पोटात अॅसिडचे प्रमाण आणखी वाढवते .

चहामध्ये ऍसिड तत्व असल्याने सकाळी उठल्याबरोबर चहा घेण्याची सवय तोंडासाठी अजिबात योग्य नाही. असे केल्याने दात वेगाने सडतात. शिवाय तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या जास्त वाढते. सोबतच चहामध्ये टॅनिक अॅसिड असल्याने दात पिवळे आणि खराब देखील होऊ शकतात.

know side effects of drinking tea on an empty stomach

हे देखील वाचा : ‘ही’ काळजी घ्या आणि लुटा पाऊसाचा मनमुराद आनंद

रोज रिकाम्या पोटी चहाचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरात लोह आणि कॅल्शियम या दोन्ही गोष्टींची कमतरता निर्माण होऊ शकते. चहामध्ये टॅनिन घटक असल्याने तो आपल्या शरीरात लोह आणि कॅल्शियम याचे योग्य प्रकारे शोषण होऊ देत नाही. त्यामुळे शरीरात अॅनिमिया, थकवा, चक्कर येणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. यासोबतच विविध गंभीर आजार देखील होऊ शकतात.

चहाच्या सेवनामुळे कॅन्सर होण्याचा धोका देखील वाढतो. सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढतो. एकाच दिवसात पाच ते सहा कप चहा पिणाऱ्या पुरुषांमध्ये हा धोका जास्त असला तरी सकाळी रिकाम्या पोटी पिण्यामुळे हा धोका वाढतो. तुम्ही उठल्यानंतर साधारण १ ते २ तासाने चहा अथवा कॉफीचे सेवन केलेत तर तुमच्या शरीराला याचा इतका त्रास होत नाही.

हे देखील वाचा : जाणून घ्या गायिका अलका याग्निक पीडित असलेल्या “Sensorineural Hearing Loss” या दुर्मिळ आजाराबद्दल


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.