आपल्या देशात अनेक लहान मोठी मंदिरं आहेत. काही मंदिरांना शेकडो वर्षांचा मोठा इतिहास देखील लाभला आहे. भारतात अशी अनेक मंदिरं आहेत, जे संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहेत. ज्यांना भेट द्यायला रोज हजारो लोकं येत असतात. याच काही मंदिरांमध्ये लाखो रुपयांमध्ये लोकं दान देतात. त्यामुळे ही मंदिरं खूपच श्रीमंत होत जातात. या मंदिरांची श्रीमंती पाहून आपले डोळे नक्कीच दिपून जातात. चला जाणून घेऊया भारतातील सर्वात श्रीमंत पहिल्या पाच मंदिराबद्दल.
पद्मनाभ स्वामी मंदिर
केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम शहरात हे पद्मनाभ स्वामी मंदिर स्थित आहे. हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित असून, या मंदिराच्या तळघरामध्ये ६ दरवाजे उघडले गेले ज्यात अफाट सोने, चांदी, हिरे आणि इतरही अनेक बहुमूल्य रत्ने सापडली ज्यांची किंमत जवळपास २०० अरब डॉलर असल्याचे सांगितले जाते. यातही या मंदिराचा ७ वा दरवाजा अजून उघडला गेला नाही. या दरवाजाच्या मागे देखील अफाट किंबहुना याहूनही जास्त संपत्ती असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या मंदिरात असलेल्या विष्णूची मूर्ती संपूर्ण सोनीची असून तिची किंमत ५०० कोटी आहे.
तिरुपति बालाजी, आंध्रप्रदेश
आंध्रप्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात तिरुमला पर्वतावर असलेले हे जगप्रसिद्ध मंदिर देखील विष्णूला समर्पित आहे. मान्यतेनुसार इथे श्री व्यंकटेश आपली पत्नी पद्मावतीसोबत निवास करतात. या मंदिरात रोज लाखो रुपयांचे दान येते. जवळपास ६५० कोटी रुपयांचे दान वर्षाला या मंदिरात येते. या मंदिरात जवळपास ९ टन सोने आणि १४ हजार कोटी फिक्स डिपॉझिट आहे.
सिद्धीविनायक, मुंबई
मुंबईमधील गणपतीचे हे सिद्धी विनायक मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे. जिथे अनेक सेलिब्रिटी देखील दर्शनाला येत असतात. या मंदिरात लाखो लोकं दर्शनासाठी येत असतात. या मंदिरात ३.७ किलो ग्रॅम सोन्याची कोटिंग आहे. या मंदिरात १२५ कोटी रुपयांचे दान दरवर्षी येत असते.
साई बाबा शिर्डी
संपूर्ण जगभरात शिर्डी येथील साई बाबा मंदिर खूपच प्रसिद्ध आहे. या मंदिरामध्ये हजारो लोकं दर्शनासाठी येत असतात. एका माहितीनुसार या मंदिराकडे ३८० किलो सोने असून, ४ हजार किलो चांदी आहे. यासोबतच विविध देशातील चलन देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. सोबतच १८०० कोटी रोख रक्कम देखील आहे.
जगन्नाथ पुरी, उडीसा
उडीसा राज्यातील पुरी इथे श्रीकृष्णाला समर्पित असलेले जगन्नाथ पुरी म्हणजे चार धामांमधील एक धाम म्हणून ओळखले जाते. समुद्र किनारे असलेले हे मंदिर अतिशय चमत्कारिक मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराकडे १०० किलो सोने आणि चांदीचे बहुमूल्य वस्तू आहे.