थंडीचे दिवस जसजसे जवळ येण्यास सुरुवात होते, तसतशी आपली तयारी सुरु होऊ लागते. ऋतू बदलला की त्याचे चांगले वाईट परिणाम शरीरावर दिसण्यास सुरुवात होते. थंडी अर्थात हिवाळा म्हटले की अनेकांना आनंदच होतो. कारण हे चार महिने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तमाचे आणि हिताचे असतात. कारण या दिवसांमध्ये व्यायाम करून चांगले शरीर कमवता येते. मात्र या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपली त्वचा रुक्ष होते आणि तिचे तेज निघून जाते.
त्यावेळी प्रत्येक घरात सर्रास वापरले जाते ते म्हणजे पेट्रोलियम जेली अर्थात व्हॅसलिन. आपल्या त्वचेला चकाकी देऊन त्यांना मऊ करण्यासाठी हे पेट्रोलियम जेली वापरले जाते. मात्र या व्यतिरिक्त देखील या जेलीचे अनेक फायदे आहेत. आपल्या त्या फायद्यांपासून अनभिज्ञ असतो. जर तुम्ही या जेलीचे हे फायदे ऐकाल तर नक्कीच हैराण व्हाल. चला जाणून घेऊया पेट्रोलियम जेलीचे विविध फायदे.
– पेट्रोलियम जेली हायड्रोकार्बन, खनिज तेल आणि मेण यांचे मिश्रण आहे. त्यामुळे हिवाळ्यात रात्री झोपताना ही जेली त्वचेवर आणि ओठांवर ते लावली, तर ते उत्कृष्ट मॉइश्चरायझर म्हणून काम करते आणि त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.
– पेट्रोलियम जेली ही चेहरा आणि डोळ्यांचा मेकअप काढून टाकण्यासाठीही खूप फायदेशीर आहे. सोबतच ही जेली उत्तम क्लीन्सर म्हणून काम करते.
– कोणत्याही बॅग, जीन्स किंवा पॅन्टची चेन खराब झाल्यास आपण त्यावर पेट्रोलियम जेली लावून तिला पुन्हा दुरुस्त करता येते. खराब चेनवर पेट्रोलियम जेली लावून, दोन ते तीन वेळा ती चेन उघड बंद करा.
– पेट्रोलियम जेली आपण शू पॉलिश म्हणून देखील वापरू शकतो. यामुळे शूजचा रंग खराब होत नाही. शूजवर थोडे पेट्रोलियम जेली लावून स्वच्छ कपड्याने चोळले तर शूज चमकू लागतील
– हिवाळा सुरू झाला की पायाच्या टाचा कोरड्या पडतात आणि त्वचेवर भेगा पडू लागतात. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी आपल्या पायांवर पेट्रोलियम जेलीची मालिश करा आणि सॉक्स घालून झोप.
– केसांना मेंदी किंवा रंग लावत असताना आपल्या कपाळ, मान आणि कानावर पेट्रोलियम जेली लावून ठेवा. यामुळे कपाळ, मान आणि कानांवर मेहंदी पडली तरी डाग लागणार नाही.
– याशिवाय मुलांच्या केसात उवा झाल्या असतील तर आपण पेट्रोलियम वापरू जेली उत्तम उपाय आहे. यासाठी केसांच्या टाळूवर पेट्रोलियम जेली लावा. थोड्या वेळाने, केस एखाद्या शॅम्पूने चांगले धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा असे केल्याने केसांतील उवा कमी होईल.
– चेहर्याची मृत त्वचा काढून टाकण्यासाठी आपण स्क्रब म्हणून पेट्रोलियम जेली वापरू शकता. यासाठी साखरेमध्ये पेट्रोलियम जेली मिसळून ते चेहर्यावर लावा आणि हलके हाताने स्क्रब करा.
– पेट्रोलियम जेली ही उत्तम लिप बाम आहे. ही जेली कोरडे, फाटलेले ओठ शांत करण्यास आणि हायड्रेट करण्यास मदत करते.
– जखमांना ओलसर आणि सुरक्षित ठेवून, पेट्रोलियम जेली जखमांचे चट्टे कमी करण्यास मदत करते.
– डोळ्यांखालील त्वचेवर पेट्रोलियम जेली वापरल्याने काळी वर्तुळे आणि सूज यापासून आराम मिळतो. डोळ्यांखाली हलक्या हाताने ही जेली लावून मसाज करा. यामुळे डोळ्यांखालील त्वचा चमकदार आणि ताजी दिसते.
=======
हे देखील वाचा : सकाळी लवकर उठण्याचे फायदे
=======
– जर तुम्हाला तुमच्या पापण्या लांब आणि जाड दिसाव्यात, तर रात्री झोपण्यापूर्वी त्यावर हलकी प्रमाणात पेट्रोलियम जेली लावा. यामुळे तुमच्या पापण्यांचे पोषण तर होईलच पण ते तुटण्यापासूनही बचाव होईल.
– नखांजवळची त्वचा जाड झाली असेल, त्याभागात आग व्हायला लागली असेल त्या भागावर पेट्रोलियम जेलीचा वापर करू शकता. ज्यांची नखं कडक होऊन तुटतात अशा लोकांनी नखांवर पेट्रोलियम जेली लावावी. ज्यामुळे नखं आणि त्यांच्या जवळची त्वचा मऊ होते.