Home » जायफळाचे ‘हे’ फायदे ऐकाल तर चकित व्हाल

जायफळाचे ‘हे’ फायदे ऐकाल तर चकित व्हाल

by Jyotsna Kulkarni
0 comment
Jaiphal Benefits
Share

मसाल्यांचा देश म्हणून भारताची जगामध्ये ओळख आहे. आपल्या देशात खाद्यपदार्थांमध्ये विविध मसाल्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. जेवणाची चव वाढवणाऱ्या या मसाल्यांचे यापेक्षा देखील अनेक फायदे आहे. विविध प्रकारच्या मसाल्यांनी समृद्ध असलेल्या भारतामध्ये या मसाल्यांना मोठे महत्व आहे. हे मसाले आपल्या आरोग्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहेत.

याच मसाल्यांपैकी एक म्हणजे जायफळ. अतिशय गोड वास असलेले हे जायफळ गोड पदार्थांची चव अधिकच वाढवते आणि आपल्याला मोहित करते. मूळचे इंडोनेशियाचे असलेले हे जायफळ सर्वात जास्त भारतमध्ये वापरले जाते. मायरिस्टिका या झाडापासून जायफळ मिळते. जायफळाशिवाय गोड पदार्थ पूर्णच होत नाही. काही विशिष्ट पदार्थांमध्ये आपण जायफळचा वापर करत असतो. परंतु जायफळाचे आपल्या शरीरास खूप चमत्कारी फायदे होतात.

जायफळमध्ये अनेक औषधी गुण असतात. जायफळ हे उष्ण स्वरूपाचे आहे. त्याचा फायदा आपल्याला पेन रिलिव्ह, पोटाचे दुखणे, शरीरातील घाण काढणे, रक्त शुद्धीकरण, तोंडातील किटाणू मारणे, दातांची निगा राखणे, रक्त पुरवठा सुरळीत ठेवणे, त्वचा चमकावणे आदी अनेक कारणांसाठी होतो.

जायफळ हा एक असा मसाला आहे जो खूप कमी प्रमाणात जेवणामध्ये वापरला जातो, पण त्याचे फायदे शरीराला मोठ्या प्रमाणावर मिळतात. यामध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. फायबर, मॅग्नेशिअम, लोह, व्हिटॅमिन B3 व B6, कॉपर आणि macelignan जे शरीराला खूप उपयोगी आहेत. या लेखातून जाणून घेऊया जायफळाचे फायदे.

Jaiphal Benefits

१)  फक्त एक चिमूटभर जायफळ वजन कमी करणे, त्वचा, निद्रानाश, अपचन यांसारख्या अनेक समस्या सोडवू शकते आणि एकंदर आरोग्य सुधारू शकते.

२) संधिवात झाल्यावर शरिरावर सूज येणे आणि सांधे ठणकणे असा त्रास सुरू होतो. जायफळाचे सेवन केल्यास किंवा त्याचे तेल लावल्यास सांधेदुखीची सूज आणि वेदना दूर होतात.

३) जायफळमुळे निद्रानाश, अपचन यांसारख्या अनेक समस्या दूर होऊन संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत होते. जायफळाचे सेवन केल्यास त्वचेसंबंधित समस्याही दूर होतात.

४) स्रित्रांनी गरोदरपणात जायफळाचे सेवन नक्की करावं. गरोदरपणात दररोज रात्री नियमितपणे एक चिमूटभर जायफळ मिसळून दूध प्यायल्यास आरोग्य सुधारते.

५) जायफळाच्या सेवनामुळे शरीरातील हार्मोनल संतुलन देखील वाढवते, ज्यामुळे शरीराच्या अनेक समस्या दूर होतात.

६) जायफळ भरपूर खनिजे आणि फायबरयुक्त आहे.

७) स्नायूंमध्ये वेदना होणे आणि ओटीपोटात दुखणे या समस्या दूर करण्यासाठी जायफळ फायदेशीर आहे. सांधे आणि स्नायूंच्या वेदनांसाठी जायफळ हा उत्तम पर्याय आहे.

८) जायफळ हे मँगनीज, तांबे, मॅग्नेशियम आणि फायबरसह विविध आवश्यक पोषक तत्वांचा एक चांगला स्रोत आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि अनेक ब जीवनसत्त्वे यांसारख्या जीवनसत्त्वे देखील कमी प्रमाणात असतात.

९) जायफळामध्ये असलेले आवश्यक तेल अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करते आणि कर्करोग टाळू शकते. अभ्यासानुसार, जायफळ त्याच्या अँटी-मायक्रोबियल गुणधर्मांमुळे पोटाच्या कर्करोगापासून आपले संरक्षण करू शकते.

१०) जायफळ हा ट्रायटेरपेन्सचा (triterpenes) समृद्ध स्रोत मानला जातो. ट्रायटरपेन्समध्ये मधुमेहाविरोधी गुणधर्म असतात, जायफळ हे टाईप-2 मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करते.

११) दातांच्या अनेक समस्यांसाठी जायफळ खूप फायदेशीर ठरू शकते. जायफळ हे अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्माने समृद्ध आहे आणि हे दातांच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे.

======

हे देखील वाचा : केसांना आठवड्यातून किती वेळा तेल लावावे? घ्या जाणून

======

१२) डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी जायफळाचे सेवन करणे हे फायदेशीर ठरू शकते. जायफळाचे सेवन केल्याने प्रोस्टाग्लॅंडिन नावाच्या हार्मोनचे उत्पादन नियंत्रित करून डोळ्यांच्या समस्या कमी केल्या जाऊ शकतात.

१३) जायफळाचे सेवन केले तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होईल. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई असते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

१४) जायफळाचे सेवन केल्यास कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. त्यात असलेल्या इथॅनॉलिकचा अर्क कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. परंतु, जायफळाचे सेवन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.