Home » Haunted : तुम्हाला माहित आहे का…? भारतातील ‘या’ Haunted जागा

Haunted : तुम्हाला माहित आहे का…? भारतातील ‘या’ Haunted जागा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Haunted
Share

नवनवीन ठिकाणं एक्सप्लोर करायला सगळ्यांनाच आवडतं. पर्यटनाची काही ठिकाणं ही त्या ठिकाणच्या सौंदर्यामुळे प्रसिद्ध असतात तर काही ठिकाणं ही त्या ठिकाणच्या नकारत्मक एनर्जीमुळे किंवा तिथे घडणाऱ्या काही विचित्र भयावह घटनांमुळे देखील प्रसिद्ध असतात. काही ठिकाणं अशी आहेत जिथं आजही लोकांना जायला भीती वाटते किंवा आजही या ठिकाणी काही अविश्वसनीय घटना घडतात. मात्र अशा ठिकाणांना भेट देणाऱ्या लोकांची संख्या देखील मोठी आहे. मात्र या ठिकाणांबद्दल ऐकिवात येणाऱ्या सर्वच गोष्टी खऱ्या आहेत की नाही? याबाबत साशंकता नक्कीच आहे.(Haunted)

सध्या भारतात पॅरानॉर्मल टुरिझम मोठ्या प्रमाणात चर्चेत येत आहे. या टुरिझमचा ट्रेंडच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. लोकांना निसर्ग पाहण्यासोबतच भीती, अकल्पनीय, गूढ या जगाचा अभ्यास करायला किंवा अशी ठिकाणं पाहायला देखील इंटरेस्ट येत आहे. त्यामुळे अनेक लोकं सुट्ट्यांमध्ये अशा काही ठिकाणांना भेट देण्याचा प्लॅन देखील करतात. मग भारतात अशी कोणती प्रसिद्ध ठिकाणं आहेत जिथल्या पॅरानॉर्मल गोष्टींची चर्चा संपूर्ण जगात होताना दिसते. चला जाणून घेऊया.(Haunted Places In India)

शिमलाचा ​​चार्लीव्हिला (Shimla Charlivilla)

शिमल्यात अतिशय सुंदर असे चार्लीव्हिला नावाचे एक ठिकाण आहे. तिथल्या स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी ब्रिटीश अधिकारी व्हिक्टर वेले आणि त्यांची पत्नी यांचा मृत्यू झाला आणि आता त्यांचा आत्मा, त्यांचे भूत या ठिकाणी असल्याचे सांगितले जाते. रात्रीच्या वेळी इथे विचित्र आवाज आणि काही सावल्या पाहिल्याचा दावा अनेक पर्यटक आणि तिथले स्थानिक लोकं करतात. या ठिकाणी अनेक लोकं जायची हिंमत करत नाही.(Social News)

Haunted

======

हे देखील वाचा : Summer : उन्हाळ्यात शरीराची काळजी कशी घ्यावी?

======

भानगढ किल्ला (Bhangarh Fort)

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात असलेल्या भानगड किल्ल्याबद्दल तर सगळ्यांनीच ऐकले असेल. भारतातील सर्वात जास्त हॉन्टेड ठिकाणांपैकी हा किल्ला सर्वाधिक प्रसिद्ध आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने या किल्ल्यावर रात्रीच्या वेळी प्रवेश बंदी घातली आहे. हा किल्ला अनेक आख्यायिकांनी, दंतकथांनी आणि अंधश्रद्धांनी प्रसिद्ध झालेला रहस्यमयी किल्ला आहे.

Haunted

शनिवार वाडा (Shanivar Wada)

पेशव्याचा अतिशय जवळचा वाडा आणि पेशव्यांची शान म्हणजे पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाडा. या किल्ल्याबद्दल, वाड्याबद्दल आजवर तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या असतील. ऐतिहासिक वारसा असलेला हा वाद देखील हॉन्टेड ठिकाणांमध्ये येतो. या वाड्याबद्दल अनेक किस्से, दंतकथा आणि कहाण्या लोकांमध्ये चर्चेत असतात. या ठिकाणी भुतांचा आवाज येत असल्याचे सांगितले जाते. शनिवारवाड्याच्या अंगणात रात्री विचित्र आवाज ऐकू येतात असा अनेक लोकांनी दावा देखील केला आहे. शिवाय अनेकांनी रात्री किल्ल्याभोवती ओरडण्याचे आवाज ऐकल्याचे देखील सांगितले जाते. (Marathi Top News)

Haunted

मेरठचा जीपी ब्लॉक (Meerut JP Block)

मेरठच्या कँट भागात जीपी ब्लॉक नावाचा एक जुना बंगला आहे. या बंगल्याबद्दल तर लोकांच्या मनामध्ये एवढी भीती आहे की, या भागात लोकं रात्रीच काय तर दिवसा देखील जायला घाबरतात. हा बंगला १९५० पासून बंद असून आता तो पूर्णपणे मोडकळीस आला आहे. स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार त्यांनी एका महिलेला येथे भटकताना पाहिले आहे, तर काही लोकांचा दावा आहे की त्यांनी मेणबत्तीच्या प्रकाशात चार पुरुषांना बसलेले पाहिले आहे.(Marathi Latest News)

Haunted

======

हे देखील वाचा : Five Eyes : फाइव्ह आयज आणि भारत !

======

कोलकात्ताची नॅशनल लायब्ररी (Kolkata National Library)

कोलकाता येथील नॅशनल लायब्ररी दुर्मिळ पुस्तकांसाठी ओळखली जाते, तर इथल्या भीतीदायक कथाही प्रसिद्ध आहेत. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी हे ग्रंथालय भारताच्या गव्हर्नर जनरलचे अधिकृत निवासस्थान होते. येथे येणाऱ्या लोकांना वाटते की, या ठिकाणी कोणतीतरी अदृश्य शक्ती आहे. याशिवाय काहींनी इथे अनेक विचित्र आवाज देखील ऐकल्याचे सांगितले जाते. या विचित्र घटनांमुळे गार्ड देखील इथे नाईट ड्युटी करण्यास नकार देतात.(Trending News)

Haunted


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.