Home » ‘या’ अभिनेत्री आहेत यशस्वी उद्योजिका

‘या’ अभिनेत्री आहेत यशस्वी उद्योजिका

by Jyotsna Kulkarni
0 comment
Marathi Actress And Business
Share

मनोरंजनविश्वात सक्रिय असलेले अनेक कलाकार नेहमीच अभिनयासोबतच इतरही अनेक कामं करताना दिसतात. काही कलाकार निर्माते असतात, काही कलाकार दिग्दर्शक, काही कलाकार डिझायनर तर काही इतर विविध व्यवसायांमध्ये सक्रिय असतात. आज आपण या लेखातून अशाच काही हिंदी मराठी कलाकार अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक यशस्वी उद्योजिका देखील आहेत.

Marathi Actress And Business

आरती वडगबाळकर

मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेली अभिनेत्री आरती वडगबाळकर ही देखील एक उत्तम व्यावसायिका आहे. तिचा स्वत:चा ‘कलरछाप’ नावाचा कपड्यांचा ब्रॅन्ड आहे. तिच्या या ब्रॅन्डची सिनेसृष्टीतही विशेष चर्चा असते.

Marathi Actress And Business

तेजस्विनी पंडीत आणि अभिज्ञा भावे

तेजस्विनी पंडीत आणि अभिज्ञा भावे या मराठी इंडस्ट्रीमधील अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहेत. या दोघीनी मिळून ‘तेजाज्ञा’ नावाचा डिझायनर कपड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. या दोघींचा हा ब्रँड इंडस्ट्रीमध्ये आणि लोकांमध्ये देखील खूपच प्रसिद्ध आहे.

Marathi Actress And Business

मृणाली शिर्के

मृणालीचा स्वतःचा घरगुती व्यवसाय देखील आहे. तिचा बेकरीचा व्यवसाय आहे. Mru’s Bakery & Confections असं तिच्या बेकरी व्यवसायाच नाव आहे. मृणाली स्वतः घरात विविध प्रकारचे केक बनवून विकते.

Marathi Actress And Business

तितिक्षा तावडे आणि अभिनेत्री खुशबु तावडे

तितिक्षा तावडे आणि अभिनेत्री खुशबु तावडे या दोघ्या सख्या बहिणींनी अभिनयासोबतच कॅफे सुरू केला आहे. खुशबू ही कॉफी प्रेमी असून तिने आणि तितिक्षाने मिळून ‘साइडवॉक’ नावाचे मुंबईमध्ये एक कॅफे सुरु केले आहे.

Marathi Actress And Business

निवेदिता सराफ

निवेदिता सराफ या एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक यशस्वी उद्योजिका देखील आहेत. ‘हंसगामिनी’ हा त्यांचा साड्यांचा ब्रॅन्ड असून त्या स्वत: साड्या डिझाइन देखील करतात. ग्राहकांना कमी किमतीमध्ये डिझायनर साड्या उपलब्ध करुन देणे हा ‘हंसगामिनी’चा उद्देश आहे.

Marathi Actress And Business

 

प्रिया मराठे

प्रिया मराठे ही चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून कामं करून आपले मनोरंजन करते. ती देखील एक उत्तम व्यावसायिका आहे. मुंबईत मिरारोडला ‘द बॉम्बे फ्राईज’ नावाचा कॅफे तिने उघडला. या सगळ्यामध्ये तिचा नवरा शंतनू मोघे देखील तिला मदत करतो.

Marathi Actress And Business

अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर देखील एक यशस्वी अभिनेत्री असण्यासोबतच यशस्वी उद्योजिका आहे. तिचा स्वत:चा दागिण्यांचा ब्रॅन्ड असून ‘अपूर्वा कलेक्शन’ असे त्याचे नाव आहे. अभिनयाच्या या क्षेत्रात एक काम संपल्यानंतर लगेच दुसरे काम मिळेलच याची शाश्वती नसते. त्यादरम्यान हातात काही तरी असावं हा देखील एक उद्देश या ब्रॅन्डच्या मागं असल्याचं अपूर्वा म्हणते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.