Home » लिफ्टपेक्षा पायऱ्यांचा वापर करा आणि निरोगी शरीर मिळवा

लिफ्टपेक्षा पायऱ्यांचा वापर करा आणि निरोगी शरीर मिळवा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Climbing Stairs
Share

उत्तम आरोग्य आणि निरोगी शरीर ही आजच्या काळाची गरज बनली आहे. एकीकडे आपले जीवन सुखकर होण्यासाठी आणि काम, कष्ट कमी होण्यासाठी विविध तंत्रज्ञान विकसित होत आहे. मात्र सोबतच अनेक नवीन जुने आजार देखील होताना दिसत आहे. यामुळे आपल्याला फिट राहणे आणि आरोग्याची काळजी घेणे खूपच आवश्यक आहे. अनेकांना वेळे अभावी किंवा अन्य कारणांमुळे व्यायाम करायला, जिमला जायला, योगा कार्याला वेळ मिळत नाही. अशावेळेस काय करावे. आपला फिटनेस कसा जपावा. तर आज आम्ही तुम्हाला असाच एक उपाय सांगणार आहोत, जो अगदी सहज, सोपा असून, सगळेच लोकं अगदी रोज हा उपाय करून निरोगी राहू शकता.

बदलत्या लाइफस्टाइलमुळे आपल्या सवयी सुद्धा बदलत आहेत. शारीरिक हालचाली कमी होऊन कमी वयात अनेक गंभीर आजार जडत आहे. यावर एक उत्तम उपाय म्हणजे पायऱ्या चढणे. आजकाल ऑफिस, अपार्टमेंट किंवा इतर कुठेही वर – खाली करण्यासाठी अगदी सर्रास लिफ्टचा वापर केला जातो. मात्र आपण जर हीच सवय बदलली आणि खाली आणि वर करण्यासाठी पायऱ्यांचा वापर सुरु केला तर अगदी कमी दिवसातच तुम्हाला याचे फायदे दिसायला लागतील. पायऱ्या चढण्या-उतरण्याचे सर्व फायदे आज आपण या लेखातून जाणून घेऊया.

कॅलरीज बर्न करण्यात फायदेशीर
अभ्यासात असे लक्षात आले आहे की पायऱ्यांवर आणि खाली धावणे आपल्याला जॉगिंगपेक्षा जास्त कॅलरी बर्न करण्यास मदत करते. याचे कारण म्हणजे पायऱ्या चढणे हा एक वेगाचा व्यायाम आहे. यामुळे तुमचे वजन कमी होऊ शकते आणि तुम्ही शरीरातील चरबी कमी करता येते.

सांधे आणि हाडांच्या मजबुतीसाठी
पायऱ्या चढण्याचा आणखी एक फायदा म्हणजे ते तुमचे सांधे आणि हाडे मजबूत करतात. विविध संशोधनांनुसार, हे सिद्ध झाले आहे आणि डॉक्टरांनी शिफारस केली आहे, जिने चढणे हा तुमची ऊर्जा सुधारण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती विकसित करण्याचा एक आदर्श मार्ग आहे.

Climbing Stairs

हृदयासाठी लाभदायक
पायऱ्या चढल्याने हृदय निरोगी राहते. कारण या व्यायामामध्ये हृदयाची गती सुधारते आणि शरीरात रक्ताभिसरण वाढते. पाय जितक्या वेगाने हलतील तितक्या वेगाने तुमची हृदय गती वाढेल ज्यामुळे शरीरात रक्त प्रवाह वाढेल. शरीरातील रक्ताभिसरण वाढल्याने ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो. या व्यायामामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी, हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी हा एक चांगला आणि सोपा मार्ग आहे.

स्नायू मजबुतीसाठी फायदा
पायऱ्या चढणे हे कार्डिओ वर्कआउटसारखे आहे आणि यामुळे तुम्हाला त्याचे फायदे देखील मिळतात. पायऱ्या चढत असताना, तुम्ही तुमचे संपूर्ण शरीर वाढवण्यासाठी गुरुत्वाकर्षणाच्या बळावर ढकलता ज्यामुळे तुमचे संपूर्ण शरीर कार्य करते जे शरीराच्या स्नायूंना देखील कार्य करते. हे त्यांना तयार आणि मजबूत करण्यास मदत करते. विशेषतः, ही क्रिया पोर, नितंब आणि मांड्या यांचे स्नायू कार्य करते.

सोपा व्यायाम
पायऱ्या चढणे आणि उतरणे हा खूप सोपा, साधा आणि विनाखर्चिक असा उपाय आहे. या व्यायामासाठी कोणत्याही मशीन वापरण्याची आवश्यकता नाही. दिवसभरात कोणत्याही वेळी तुम्ही हा व्यायाम करून फिटनेस कमवू शकता.

हाडे मजबूत होतात
हाडांमध्ये दुखत असेल तर रोज पायऱ्या चढण्या-उतरण्याचा व्यायाम केल्याने वेदना कमी होतात, त्यामुळे हाडे मजबूत राहतात. हाडांची घनता टिकवून ठेवण्यासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थांच्या सेवनासोबत १५ मिनिटे पायऱ्या चढण्याचा व्यायाम केल्यास सांधे लवचिक होतात.

मधुमेहापासून बचावासाठी
मधुमेहापासून लांब राहण्यासाठी तुम्ही पायऱ्या चढू शकता. पायऱ्या चढून चयापचय वाढते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. तुम्हाला टाईप-2 मधुमेह असेल तर जेवणानंतर काही मिनिटे पायऱ्या चढा, नक्कीच फायदा होईल.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतेही उपाय करण्यापूर्वी कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.