Home » Cheque : जाणून घ्या चेक वर काय लिहावे Lakh की Lac?

Cheque : जाणून घ्या चेक वर काय लिहावे Lakh की Lac?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Cheque
Share

नोटबंदी झाल्यानंतर आता सर्वच लोकांनी लहान किंवा मोठे व्यवहार ऑनलाईन किंवा चेकनेच करण्यास सुरुवात केली आहे. खासकरून मोठे व्यवहार तर चेकनेच केले जातात. चेकने व्यवहार करताना थेट कॅशचा संबंध येत नाही. बँकेतूनच व्यवहार होतो. त्यामुळे सुरक्षितता असते. इंटरनेट बँकिंग सारख्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे चेकचा वापर कमी झाला आहे, मात्र अजूनही बँकेतील मोठ्या आर्थिक व्यावाहारांमध्ये चेकचाच वापर केला जातो. मात्र चेकवर सर्व माहिती लिहिताना काळजीपूर्वक लिहिणे आवश्यक आहे. जेव्हा आपण चेकवर मजकूर लिहितो तेव्हा त्यात आपल्याला रक्कम ही अंकासोबतच अक्षरांमध्ये देखील लिहावी लागते. (Cheque)

पण आपण जेव्हा लाखोंची अमाऊंट चेकवर अक्षरात इंग्रजीमध्ये लिहितो तेव्हा त्यावर लिहिताना काही लोकं ‘लाख’ अर्थात Lakh तर काही लोकं ‘लॅक’ Lac असे लिहितात. मात्र Lakh लिहावे की Lac हेच समजत नाही. प्रत्येक जणं लाख हे वेगवेगळ्या पद्धतीने लिहितात. मात्र दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे? नेमका कोणता शब्द लिहिले योग्य आहे हेच आपण या लेखातून जाणून घेऊया. (Marathi)

‘लाख’ हा शब्द इंड‍ियन काउंट‍िंग स‍िस्‍टममध्ये १,००,००० रुपयांना दर्शवते. हा शब्द हिंदी आणि भारतीय संस्कृतीमध्ये सोपा आहे. तर दुसरीकडे ‘लॅक’ चा इंग्रजी शब्दकोशात याचा अर्थ वेगळा असतो. ‘लॅक’ चा इंग्रजी शब्दकोशात अर्थ हा एक रेझिनसारखा पदार्थ आहे जो कीटकांद्वारे तयार केला जातो आणि वार्निश, पॉलिश किंवा सीलिंग मेणांमध्ये वापरला जातो. पण हा ‘लॅक’ (Lac) शब्द भारतात ‘लाख’ १,००,००० रुपयांसाठी देखील वापरला जातो. (Todays Marathi HEadline)

Cheque

सामान्य लोकांसाठी ‘लाख’ किंवा ‘लॅक’ या शब्दांच्या वापरासाठी आरबीआयने कोणतेही कठोर नियम स्थापित केलेले नाहीत. तथापि, बँकांसाठी आरबीआयच्या मास्टर सर्क्युलरमध्ये असे म्हटले आहे की ‘लाख’ हा शब्द १,००,००० साठी योग्य आहे. आरबीआय त्यांच्या चलनी नोटांवर आणि वेबसाइटवर लाख चिन्ह वापरते. याचा अर्थ अधिकृत शब्द ‘लाख’ आहे. पण चांगली बातमी अशी आहे की जर तुम्ही चेक देताना ‘Lac’ लिहिले तरी तुमचा चेक रद्द होणार नाही किंवा तो अनादर होणार नाही. हे दोन्ही शब्द देशात सामान्य आहेत आणि सामान्य लोकांसाठी आरबीआयने कोणतेही कठोर नियम बनवलेले नाहीत. (Top Stories)

बहुतेक बँका ‘लाख’ किंवा ‘लॅक’ मध्ये असलेले चेक स्वीकारतात. तरी एकरूपता आणि ऑफ‍िश‍ियल स्‍टॅंडर्डसाठी ‘लाख’ लिहिणे चांगले. चेकवर रक्कम लिहीत असताना ‘लाख’ या शब्दाचा उपयोग करावा. हा आर्थिक कागदपत्रांमध्ये स्पष्टता आणतो. ‘लाख’ लिहिण्याऐवजी ‘लॅक’ लिहिल्याने चेक रद्द होणार नाही, तरीही योग्य पद्धतीचे पालन करणे चांगले ठरते. यामुळे भविष्यातील गैरसमज टाळता येतील. (Top Trending Headline)

=======

मेलोनी यांच्या गावात ३० वर्षानंतर असं काय झालं…

=======

थोडक्यात काय तर मात्र आरबीआयच्या गाईडलाईननुसार चेकवर नेहमी ‘lakh’ असाच उपयोग करावा, lakh हाच शब्द योग्य आहे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. Lac लिहिल्यास तुमचा धनादेश रद्द होईल, पण असे अजिबात नाही, हे देखील वैध असेल. पण Lac लिहिणं हे योग्य प्रॅक्टिस नाही. वास्तविक, Lac हा एक पदार्थ आहे, परंतु बोली भाषेत,’lakh’चा वापर गणनेसाठी केला जातो, म्हणून तो बँकांकडून स्वीकारला जातो. (social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.