हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथांपैकी एक म्हणजे ‘रामायण’. भगवान विष्णूचे सातवे अवतार असलेल्या प्रभू श्रीरामांचा संपूर्ण जीवनप्रवास महर्षी वाल्मिकी यांनी या ‘रामायण’ ग्रंथामध्ये मांडला आहे. या राम अवतारामध्ये अनेक लहान मोठ्या कहाण्या आपल्याला पाहायला मिळतात. भारतामध्ये कैक शे वर्षांपूर्वी रामायण घडून गेले आहे. या रामायणाच्या खुणा आजही आपल्याला पाहायला मिळतात. हिंदू लोकांचे दैवत असणाऱ्या श्रीरामांना आपल्या पुराणांमध्ये आदर्श पुरुष म्हणून संबोधले जाते. एक पुरुष कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रभू श्रीराम. (Ramsetu)
रावणासारख्या बलाढ्य राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान विष्णू राम अवतारात पृथ्वीवर आले होते. रामायणामध्ये उल्लेख केल्यानुसार जेव्हा रावणाने माता सीतेचे अपहरण केले, आणि तिला लंकेला घेऊन गेला. तेव्हा सीता मातेला पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी श्रीरामांनी लंकेमध्ये जायला समुद्रामध्ये एका पुलाची निर्मिती केली. याच पुलावरून श्रीराम आणि त्यांची सेना लंकेमध्ये गेली होती. याच पुलाला रामसेतू पूल असे म्हटले जाते. आजच्या घडीला अतिशय विवादित पूल म्हणून देखील या पुलाची ओळख आहे.(Marathi Top News)
रामसेतू पूल मानवनिर्मित आहे की, नैसर्गिक यावर अनेक वाद आहेत. मात्र अमेरिकेच्या काही अभ्यासकर्त्यांच्या अहवालानुसार हा पूल मानवनिर्मितच असल्याचे सांगितले गेले आहे. भारताच्या तमिलनाडु राज्यातील रामेश्वरम येथे हा रामसेतू पूल आजही आपल्याला पाहायला मिळतो. श्रीलंकेच्या उत्तर पश्चिमी समुद्र किनाऱ्यावर मन्नार बेटाच्या मध्ये चूनखडकाने बांधलेला एक सेतू आहे. भौगोलिक रचनेनुसार आपल्याला लक्षात येते की, अनेक वर्षांपूर्वी हा सेतू भारत आणि श्रीलंका यांना जोडणारा हा एक दुवा होता. या पुलाचे दर्शन आपल्याला विमानातून देखील होते. नासाने देखील त्यांच्या सॅटेलाइटमधून रामसेतू पुलाचे फोटो काढले आहेत.(Marathi Latest News)
=========
हे देखील वाचा : Ramnavmi : रामनवमी खास : श्रीराम जन्म कथा
=========
– १४८० मध्ये समुद्रात मोठे चक्रीवादळ झाल्याने हा रामसेतू पूल पाण्याखाली गेला. आजही हा राम सेतू पाण्याखालीच आहे. काही ठिकाणी पाणी पातळी उथळ आहे. तसेच हा पूल पूर्णपणे पाण्यात बुडलेला नाही. त्यामुळे आजही या रामसेतूजवळून कोणतेही जहाजे जाऊ दिली जात नाही. म्हणूनच श्रीलंकेला जाण्यासाठी भारतातील जहाजांना दुसऱ्या मार्गाचा वापर करावा लागतो. (Marathi News)
– हा पूल 7000 वर्ष जुना आहे, असे समुद्रशास्त्राच्या अभ्यासातून दिसून आले आहे. याचा अर्थ असा की, हा पूल चिनची भिंत आणि इजिप्शियन पिरॅमिड इत्यादींपेक्षाही जुना आहे. वास्तविक, ही रचना 3 ते 4 हजार वर्षे जुनी आहे, तर राम सेतू किमान सात हजार वर्षे जुना असल्याचे काही इतिहासाचे दाखले सांगतात.(Marathi Trending News)
– डिसेंबर १९१७ मध्ये, अमेरिकेच्या सायन्स चॅनेलवरील टीव्ही शो “प्राचीन लँड ब्रिज” मध्ये, अमेरिकन पुरातत्वशास्त्रज्ञांनी काही तपासण्यावरून एक अहवाल तयार केला ज्यात त्यांनी सांगितले की, रामाने श्रीलंकेला जाण्यासाठी पूल बांधला गेल्याची जी हिंदू पौराणिक कथा आहे ती सत्य असू शकते. भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान ५० किमी लांबीची एक रेषा खडकांपासून बनलेली दिसते. हे खडक सात हजार वर्षे जुने असून, ज्या वाळूवर हे खडक स्थिरावले आहेत ती वाळू चार हजार वर्षे जुनी आहेत. या अहवालात असे देखील नमूद केले आहे की, खडक आणि वाळूच्या वयातील ही विसंगती असे दाखवते की हा पूल मानवांनी बांधला असावा.(Marathi News)
=========
हे देखील वाचा : Ramnavmi : रामनवमी कधी आहे? रामनवमीचे महत्व काय?
=========
– वाल्मिकी रामायणात सांगितले आहे की, रामसेतू पूल बांधण्यासाठी विश्वकर्माचे पुत्र नल आणि नील यांनी एक पूल बांधून दिला होता, ज्याला बनवण्यात वानरसेनेने मदत केली होती. हा पुल बांधण्यासाठी तरंगणारे दगड वापरण्यात आले होते जे दुसऱ्या ठिकाणाहून आणले होते. असे म्हणतात की ज्वालामुखीतून निर्माण होणारे दगड पाण्यात बुडत नाहीत. बहुधा या पुलासाठी हे दगड वापरले गेले असावेत अशी मान्यता आहे.(Social News)