Home » Health : दिवाळीत फराळ खाऊन त्रास होतोय मग करा झटपट ‘हे’ उपाय

Health : दिवाळीत फराळ खाऊन त्रास होतोय मग करा झटपट ‘हे’ उपाय

by Jyotsna Kulkarni
0 comment
Health
Share

वर्षातल्या सर्वात मोठ्या सणाची दिवाळीची आज सांगता होत आहे. दिवाळी हा हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. प्रकाशाचा सण अशी ओळख असलेल्या या सणाची तयारी बरेच दिवस आधी सुरु होते. घराची स्वच्छता, सजावट, पणत्यांची आरास, रांगोळ्या आणि मुख्य म्हणजे भरपूर चविष्ट असा फराळ. फराळाशिवाय दिवाळी पूर्णच होऊ शकत नाही. चिवडा, लाडू, शंकरपाळे, चकली, शेव, अनारसे, करंजी, कडबोळी, विविध प्रकारच्या मिठाई अशा एक न अनेक पदार्थांची दिवाळीमध्ये नुसतीच रेलचेल असते. मुख्य म्हणजे दिवाळीमध्ये घरी बाहेर हेच पदार्थ असले तरी कोणीच हे खाण्यासाठी नाही म्हणत. (Diwali Health)

सगळेच यावर आनंदाने ताव मारतात. आपण सणात जोशामध्ये जे समोर येईल ते दणकून खातो तर खरी मात्र नंतर याचा आपल्या शरीराला चांगलाच त्रास होतो. तेलकट, तुपकट, तिखट, गोड, खव्याचे अतिशय जड पदार्थ सतत खाल्ल्यामुळे अनेकांना याच खूपच त्रास होऊ लागतो. ऍसिडिटी, पोट दुखणे, गॅस, अपचन, छातीत जळजळ, पोटफुगी आदी त्रास जाणवतात. तसेही सणाच्या दिवसांमध्ये डॉक्टर देखील उपलब्ध होतीलच असे नाही. त्यामुळे या त्रासांवर आम्ही तुम्हाला काही छोटे आणि सहज घरच्या घरी करता येणारे उपाय सांगणार आहोत. (Marathi)

हलके अन्न खा
दिवाळीनंतर एक-दोन दिवस हलके आणि शरीराला सहज पचवता येईल असे अन्न खा. जसे की लापशी, डाळ खिचडी, पेज, उकडलेल्या भाज्या किंवा सूप यासारख्या गोष्टी पचायला सोप्या असतात आणि पोटाला आराम देखील देतात. तुम्ही आहारात दही आणि ताक देखील घेऊ शकता. दहयामध्ये प्रोबायोटिक्स असते, जे चांगल्या बॅक्टेरियाचे संतुलन राखून पचन सुधारते. (Health Care)

गरम पाणी प्या
पोट बिघडण्याचे कारण डिहायड्रेशनदेखील असू शकते. कारण पाण्याच्या कमतरतेमुळे पचनाच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे दिवसभरात किमान ४ लिटर पाणी पिणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सकाळी गरम पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरू शकते. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून प्या. पोट साफ करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी हे खूप फायदेशीर मानले जाते. (Marathi Health News)

आलं आणि लिंबू
आलं पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यातील काही घटक पोटातील वायू कमी करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत. लिंबात असलेले व्हिटॅमिन सी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. एक कप पाण्यात एक इंचाचा आल्याचा तुकडा उकळा. गाळून घ्या आणि त्यात अर्धा लिंबू पिळून घ्या. चवीनुसार एक चमचा मध घाला आणि घोट घोट करून प्या. या चहामुळे पोटातील जळजळ कमी होईल आणि जडपणा कमी होईल. (Todays Marathi Headline)

Health

ओवा आणि बडीशेप
पचनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ओवा खाणे फायदेशीर मानले जाते. याच्या सेवनाने अपचन आणि गॅसच्या समस्यांपासून आराम मिळतो. तसेच जेवल्यानंतर बडीशेप खा ते देखील पचनासाठी फायदेशीर आहे. बडीशेप व खडीसाखर खाल्ल्यामुळे पचन सुधारते आणि पोटात थंडावा मिळतो. (Top Marathi Headline)

जेवल्यानंतर थोडे चाला
अपचन होणे टाळण्यासाठी जेवल्यानंतर काही वेळ तरी बाहेर चालायला हवे. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहिल्याने पचनाच्या समस्या दूर होतात आणि आरोग्यही चांगले राहते. (Marathi News)

थंड दूध
दुधात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, यामुळे पोटातील अतिरिक्त आम्ल शोषून घेतले जाते आणि लगेच आराम मिळतो. थंड दूध नैसर्गिक अँटासिड म्हणून देखील काम करते. साखर न घालता एक ग्लास थंड दूध प्या. दूध थंड असलं पाहिजे कारण गरम दुधामुळे आम्लता वाढू शकते. लैक्टोजचा त्रास होत असेल, तर हा उपाय खूप प्रभावी ठरेल. (Latest Marathi Headline)

लवंग
लवंगेतल्या युजेनॉलमुळे पोटातील वायू आणि आम्लता कमी होते. यामुळे पाचक घटक देखील वाढतात. एक किंवा दोन लवंग चघळा. लवंगाचा रस हळूहळू पोटात गेल्यानं आराम मिळेल. लवंग बारीक करून पावडर देखील बनवू शकता. (Top Marathi News)

=========

Healthy Meal Ideas : निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी आहारात करा या गोष्टींचा समावेश

Diwali : फटाके फोडताना भाजल्यास ‘हे’ सोपे उपाय करून मिळवा त्वरित आराम

=========

नारळ पाणी
नारळाचे पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरात इलेक्ट्रोलाइट संतुलन देखील नियंत्रित ठेवते, विशेषतः जेव्हा तुम्ही जास्त मसालेदार किंवा गोड पदार्थ खाल्ले असतील. दिवसातून १-२ वेळा हे डिटॉक्स ड्रिंक्स प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होण्यास आणि गॅस, छातीत जळजळ आणि जडपणा यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. (Marathi Top Trending Headline)

फायबरयुक्त आहार
फायबर हे नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन एजंट मानले जाते. तुमच्या आहारात भरपूर फायबरचा समावेश करा. यासाठी भरपूर काकडी, गाजर, लेट्युस, स्प्राउट्स आणि हिरव्या पालेभाज्या खा. यामुळे तुमचे शरीर आतून मजबूत होईल. (Social News)

(कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.