Home » Kitchen Tips ‘अशा’ पद्धतीने घ्या नॉनस्टिक भांड्यांची काळजी घ्या

Kitchen Tips ‘अशा’ पद्धतीने घ्या नॉनस्टिक भांड्यांची काळजी घ्या

by Jyotsna Kulkarni
0 comment
Kitchen Tips
Share

आजच्या मॉडर्न काळात जिथे आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धतीपासून रोजच्या जीवनशैलीपर्यंत सर्वच गोष्टी झपाट्याने बदलत आहे. या आधुनिक गोष्टींचा प्रभाव आपल्यावर होत असताना आपले घर आणि आपले किचन देखील यापासून कसे वेगळे राहील? आधुनिक गोष्टींनी आपल्या किचनचा देखील ताबा घेत अगदी किचनच्या डिझाइनपासून गॅस स्टोव्हपर्यंत सर्वच गोष्टी बदलून टाकल्या आहेत. मग यात किचनमध्ये वापरली जाणारी भांडी कशी काय मागे राहतील?  (Kitchen Tips)

आधी स्टील, ऍल्युमिनियम, पितळीच्या भांड्यांमध्ये बनणारे जेवण आता नॉनस्टिक भांड्यांमध्ये बनण्यास सुरुवात झाली आहे. तसा हा बदल जुना असला तरी आधी फक्त नॉनस्टिक (Non Stick) तवा वापरण्याची फॅशन होती, ती पण डोसा तवा. मात्र आता नॉनस्टिकमध्ये सर्वच स्वयंपाकाची भांडी उपलब्ध झाल्याने सगळेच ही भांडी वापरण्यासाठी आग्रही असल्याचे दिसते. (Non Stick)

नॉनस्टिक भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याचे अनेक फायदे आहेत. यातला एक महत्वाचा आणि मोठा फायदा म्हणजे. यात खूपच कमी तेल वापरून जेवण बनवता येते. सोबतच यात जेवण चिटकत नाही. आरोग्यच्या दृष्टीने तेल कमी खाणे केव्हाही चांगले असल्याचे सांगितले जाते. मग अशा वेळेस नॉनस्टिक भांडी खूपच फायदेशीर ठरतात. (Non Stick Cookeware Advantages)

मात्र अनेक लोकं इच्छा असून देखील ही भांडी घेत नाही कारण एकच की, हे भांडे स्वच्छ करता येत नाही, किंवा कसे स्वच्छ करावे ते समजत नाही. आपण भांडी स्वच्छ करताना कोटिंग निघण्याची भीती असल्याने ही भांडी वापरण्याचे अनेक लोकं टाळतात. मात्र ही भांडी साफ करणे अतिशय सोपे आहे. मग चला जाणून घेऊया नॉनस्टिक भांडी कशी स्वच्छ करायची आणि कोणती काळजी घ्यायची . (How To Clean Non Stick Cookware)

Kitchen Tips

– सर्वात आधी नॉनस्टिकची भांडी गरम गरम कधीच धुवू नये. बऱ्याच जणांना भांडी गॅसवरुन काढली का ती नळाखाली धरण्याची सवय असते. ही फार चुकीची सवय आहे. यामुळे नॉन-स्टिक भांड्याचे कोटींग खराब होते. त्यामुळे नॉन-स्टिक भांडे गरम असताना धुवू नये ते सामान्य तापमानावर येऊ द्यावे आणि त्यानंतर ते धुवावे. (Marathi Tips)

– हार्ड स्पंज वापरल्याने नॉन-स्टिक भांडीच्या टेफ्लॉन थराला नुकसान होते. म्हणून, फक्त मऊ स्पंजने ही भांडी स्वच्छ करणे योग्य असते. यासाठी एका नॉन-स्टिक भांड्यात पाणी आणि लिक्विड सोप टाकून भिजवा. मग मऊ घासणीने भांडी घासा. (Kitchen Tips In Marathi)

– नॉन-स्टिक भांडी स्वच्छ करण्याचा सर्वात चांगला आणि प्रभावी उपाय म्हणजे, मिठाच्या पाण्यानी धुणे. यासाठी कोमट पाण्यात ४ – ५ चमचे मीठ मिसळून पेस्ट करून ही पेस्ट १५ – २० मिनिटे जळलेल्या भांड्यावर ठेवा. नंतर स्पंजने घासून स्वच्छ पाण्याने धुवा. (Tips For Non Stick Cookware)

– जळलेले नॉन-स्टिक भांडे स्वच्छ करण्यासाठी, गरम पाण्यात बेकिंग सोडा मिसळून थोडा वेळ उकळून घ्या. नंतर त्यात थोडे व्हिनेगर घाला आणि पेस्ट तयार करून, जळलेल्या भागावर लावा आणि ५ -१० मिनिटे ठेवा. पुढे ते स्पंजने घासून स्वच्छ करा. (How To Clean Non Stick Cookware)

– नॉन-स्टिक भांडी चमकवायची असेल तर स्वयंपाकाच्या नॅपकिनवर तेलाचे काही थेंब घ्या आणि त्याने नॉन-स्टिक भांडी साफ करुन घ्या. यामुळे भांडी चमकण्यास मदत होईल. आणि त्या भांड्याचे कोटींग जास्त काळ टिकण्यास मदत होईल.

Kitchen Tips

– अ‍ॅल्युमिनियम फॉइलच्या मदतीने नॉनस्टिक भांडीही स्वच्छ करता येतात. यासाठी फॉइलचे मध्यम आकाराचे गोळे बनवा. आता भांड्यात डिटर्जंट घाला आणि गोळ्यांच्या मदतीने स्वच्छ करा. त्यामुळे ही भांडी चमकण्यास मदत होते. (NonStick Cookware Hacks)

– नॉन-स्टिक भांडी स्क्रॅच होऊ नयेत म्हणून त्यांच्या देखभालीकडे लक्ष द्या. ही भांडी ठेवण्यासाठी टिश्यू पेपर वापरा. आणि त्यावर कोणतेही जड भांडे ठेवू नका. त्यांना धातूच्या भांडीच्या ढिगाऱ्यापासून वेगळे ठेवा.

– नॉन-स्टिक भांड्यांमध्ये अन्न ढवळण्यासाठी कोणत्याही धातूचा चमचा वापरू नका. नेहमी लाकडी, प्लास्टिक किंवा सिलिकॉन चमचे वापरा. तसेच, या भांड्यांमध्ये उच्च आचेवर काहीही शिजवू नका. अन्न पटकन शिजवण्यासाठी, आपण वरून पॅन झाकून ठेवू शकता.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.