Home » Shrikrushna : श्रीकृष्णांचा मृत्यू कसा झाला?

Shrikrushna : श्रीकृष्णांचा मृत्यू कसा झाला?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Shrikrushna | Todays Marathi News
Share

आज सर्वत्र कृष्ण जन्माष्टमी आणि दहिहंडीचीच धूम पाहायला मिळत आहे. हिंदू धर्मातील अतिशय लोकप्रिय देवता म्हणून श्रीकृष्णाची ओळख आहे. श्रीकृष्ण म्हणजे भगवान विष्णूंचा आठवा अवतार पूर्ण अवतार. जन्मापासूनच श्रीकृष्ण हे ६४ कलांनी समृद्ध होते. कंसाची बहीण देवकी आणि वासुदेव यांची आठवी संतान म्हणून भगवान श्रीकृष्णांनी या पृथ्वीवर दृष्टांचा संहार करण्यासाठी अवतार घेतला. श्रीकृष्णाला जरी देवकीने जन्म दिला असला तरी त्याचा सांभाळ आणि पालनपोषण यशोदाने गोकुळामध्ये केले. (Janmashtami News)

कृष्ण लहान असल्यापासूनच त्याने त्याचे गुण, चमत्कार दाखवण्यास सुरुवात केली होती. कालिया मर्दन, गोवर्धन पर्वत, पुतना वध आदी अनेक चमत्कार केले. त्यानंतर कंसाचा वध केला. पुढे महाभारत घडले. त्यावेळी कृष्णाने अनेक चमत्कार केले, अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. त्यानंतर मात्र कृष्णाबद्दल जास्त माहिती कोणाला नाहीये. कृष्णाचे अवतार कार्य पूर्ण कसे झाले? त्यांचा मृत्यू कसा झाला? याबद्दल आपण जाणून घेऊया. (Marathi News)

भगवान कृष्णाचा जन्म मथुरेत ई.स.पूर्व ३११२ दरम्यान झाला. त्यांचे बालपण वृंदावन, बरसाना, नांदगाव, गोकुळ, द्वारका अशा ठिकाणी गेले. असे म्हणतात की महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्णाने द्वारकेवर ३६ वर्षे राज्य केले, त्यानंतर त्यांनी देह सोडला. त्यावेळी त्यांचे वय १२५ वर्षे होते. खरंतर त्यांच्या मृत्यूमागे दोन शाप आहेत. अठरा दिवस चाललेल्या महाभारताच्या युद्धात रक्तपात झाला. या युद्धात कौरवांचे संपूर्ण कुळ नष्ट झाले, तसेच पाच पांडव वगळता पांडव कुळातील देखील बहुतेक लोकं मारले गेले. पण या युद्धामुळे आणखी एक राजवंश नष्ट झाला, तो म्हणजे श्री कृष्णाचा यदुवंश. हो यदुवंश नष्ट होण्यामागे महाभारताचे युद्धच कारणीभूत असल्याचे मानले जाते. (Top Marathi HEadline)

असे म्हणतात की महाभारताच्या युद्धानंतर दुर्योधन आणि त्याच्या सर्व भावांचा अंत झाला तेव्हा त्यांची आई गांधारी खूप संतापली. आपल्या मुलांच्या मृतदेहांजवळ शोक करत असताना गांधारीने कृष्णाला ३६ वर्षांनी युद्धभूमीवर मरण्याचा शाप दिला. हे ऐकून पांडव चकित झाले, पण कृष्णाने हसतमुखाने शाप स्वीकारला. यानंतर बरोबर ३६ वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा एका शिकाऱ्याच्या हातून मृत्यू झाला. (Todays Marathi Headline)

Shrikrushna

महाभारत युद्ध होऊन ३५ वर्षे द्वारकेमध्ये आनंदाची गेली. नंतर एक दिवस श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न अर्थात सांब याने स्त्री वेष धारण केला आणि तो आपल्या काही मित्रासोबत दुर्वासा ऋषींना भेटायला गेला. सांबने आपल्या वस्त्रात एक लोखंडी मुसळ लपवले आणि तो गर्भवती स्त्रीच्या वेषात दुर्वास ऋषी समोर उभा राहिला आणि विचारले ” मला मुलगा होईल की मुलगी?” ऋषींनी ही अक्षम्य चेष्टा ओळखली. जराही विचलित न होता ते ऋषीराज म्हणाले. या “गर्भातून जो जन्म घेईल तो यादव वंशाच्या सर्वनाशाचे कारण बनेल.” ऋषींनी क्रोधित होऊन सांबला शाप दिला की, तो एका लोखंडी बाणास जन्म देईल आणि त्यामुळे यादवकुळ आणि साम्राज्याचा विनाश होईल. (Marathi Trending News)

या घटनेनंतर द्वारकेत अनेक अशुभ चिन्हे दिसू लागली. ज्यामध्ये सुदर्शन चक्र, बलरामाचा नांगर आणि श्रीकृष्णाचा शंख, रथ नाहीसा झाला. हळुहळु येथे गुन्हे आणि पापंही वाढू लागली आणि एक काळ असा आला की सर्व नगरवासी दारूच्या नशेत गुरफटले गेले. ते आपापसात भांडू लागले आणि मरू लागले. अशा रीतीने सर्वजण एकमेकांशी लढत मारले गेले. (Latest Marathi News)

श्रीकृष्णाचा मृत्यू कसा झाला?
युद्धानंतर श्रीकृष्ण ३६ वर्षांनी द्वारकेपासून दूर असलेल्या जंगलात गेले. तेथे ते एका झाडाखाली विसावले. तेव्हा जारा नावाच्या एका शिकाऱ्याने श्रीकृष्णाला हरण समजले आणि त्यांच्यावर विषारी बाण सोडला. जो त्यांच्या डाव्या पायाला लागला. तेव्हा कृष्ण एकटेच होते. जेव्हा शिकारी तिथे पोहोचला आणि कृष्णाला बाण मारलेला पाहून पश्चात्ताप करू लागला तेव्हा कृष्ण म्हणाले, यात तुझी चूक नाही. त्रेतायुगात मी राम आणि तू बाली होतास. त्यावेळी तू माझ्यामुळे मारला गेलास. म्हणूनच तू मला बाण मारलास आणि तुझ्या हातून माझा मृत्यू होईल, असे म्हणत कृष्णाने प्राण सोडले. (Top Trending News)

==============

हे देखील वाचा : Dahihandi : जन्माष्टमीनंतर साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी सणाचे महत्व

Janmashtami : जन्माष्टमी विशेष : भारतातील प्रसिद्ध कृष्णमंदिरं

===============

कृष्णाने ज्या ठिकाणी प्राण सोडले ते ठिकाण आता भालका तीर्थ म्हणून ओळखले जाऊ लागले. हे ठिकाण गुजरातच्या पश्चिम किनार्‍यावर असलेल्या सौराष्ट्रातील वेरावळमध्ये आहे. भगवान श्रीकृष्णाने ज्या ठिकाणी प्राण सोडला त्या ठिकाणी भालका तीर्थ नावाचे मंदिर बांधण्यात आले आहे. बलरामांनी देखील समुद्र किनारी देश ठेवला आणि आपले अवतार कार्य समाप्त केले. श्रीमद भागवतानुसार श्रीकृष्ण आणि बलराम त्यांच्या घरी गेल्याची माहिती त्यांच्या प्रियजनांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनीही या दु:खामुळे आपला प्राण त्याग केला. देवकी, रोहिणी, वासुदेव, बलरामच्या पत्नी, श्रीकृष्णाच्या पटराणी इत्यादी सर्वांनी देह सोडला. यानंतर अर्जुनाने यदुवंशासाठी पिंडदान आणि श्राद्ध विधी केले. (Top Marathi Stories)

या विधींनंतर अर्जुन यदुवंशातील उरलेल्या लोकांसह इंद्रप्रस्थला परतला. यानंतर श्रीकृष्णाचे निवासस्थान सोडून बाकी द्वारका समुद्रात बुडाली. त्यानंतर सर्व पांडवांनीही हिमालयाच्या दिशेने प्रवास सुरू केला. या प्रवासातच पांडवांनीही एक एक करून देह सोडला. शेवटी युधिष्ठिर शरीराने स्वर्गात पोहोचला होता. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.