Home » Tirupati Balaji तिरुपती बालाजी मंदिरातील पुजाऱ्यांना महिन्याला किती वेतन मिळते?

Tirupati Balaji तिरुपती बालाजी मंदिरातील पुजाऱ्यांना महिन्याला किती वेतन मिळते?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Tirupati Balaji
Share

आपल्या देशातले सर्वात मोठे मंदिर कोणते असा प्रश्न जर कोणी तुम्हाला विचारला तर तोंडात सर्वात पहिले नाव बाहेर येईल आणि ते म्हणजे तिरुपती बालाजी मंदिर (Tirupati Balaji). भारतातील किंबहुना जगातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे. (Richest Temple in World) या मंदिरामध्ये दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात आणि सढळ हाताने दान करतात. भक्तांच्या या दानामुळेच हे मंदिर श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते. (Tirupati Balaji)

आंध्रप्रदेशमध्ये असलेल्या या तिरुपती बालाजी मंदिराची कीर्ती सर्वदूर पसरलेली आहे. भगवान बालाजीला लोकं त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर लाखो, करोडो रुपयांचे दान करतात. मंदिरामध्ये देखील संपूर्ण सोन्याचे बांधकाम केलेले आहे. अशा या मंदिरामध्ये जे पुजारी आहेत, त्यांना किती पगार मिळत असेल याचा एकदा तरी विचार आपल्या मनात आला असेलच. (Marathi News)

साधारणपणे पुजाऱ्यांना खूप खास किंवा खूपच जास्त पगार असल्याचे आपण कधीही ऐकले नसेल. नेहमीच मंदिरांमध्ये जे पुजारी असतात त्यांना पाहून अतिशय माफक पगार असावा असे आपल्याला वाटते. मात्र तिरुपती बालाजी मंदिर (Tirupti Balaji Temple) हे या सर्व गोष्टींसाठी अपवाद आहे. या मंदिरात असणाऱ्या पुजाऱ्यांना जेवढा पगार मिळतो तेवढा आयटी क्षेत्रात मोठ्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला मिळत असेल. चला जाणून घेऊया या पुजाऱ्यांच्या पगाराबद्दल.

सर्वाधित श्रीमंत असणाऱ्या या तिरुपती देवस्थानाच्या धार्मिक बाबींची जबाबदारी चार मानाच्या पुरोहित कुटुंबांकडे सोपविण्यात आली आहे. या चारही कुटुंबाना अनेक पिढ्यांपासून तिरुपती देवाची पूजाअर्चा करण्याचा मान देण्यात आला आहे. या परिवारातील लोकं रोज पहाटे पासून संध्याकाळपर्यंत धार्मिक अनुष्ठान करतात. परंपरेनुसार मंदिराच्या ट्रस्टने या चार श्रीमंत कुटुंबांतील २३ लोकांना पुजारी म्हणून नियुक्त केलेले आहे. तर एकुण कर्मचाऱ्यांची संख्या ५८ इतकी आहे. (Priests of Tirupati Balaji)

Tirupati Balaji

तिरुमाला तिरुपती बालाजी मंदिराच्या सर्व धार्मिक गोष्टींची जबाबदारी दीपल्ली, गोल्लापल्ली, पेद्दिन्थी आणि तिरुपतम्मा या चार कुटुंबांकडे आहे. पिढ्यानुपिढ्या बालाजी मंदिराची पूजा ही कुटुंबे करत आली आहेत. तिरुमालाच्या श्री व्येंकटेश्वर स्वामी मंदिरात सर्व धार्मिक अनुष्ठानाची जबाबदारी यांच्यावर आहे. (The Four Families Are Responsible for all the religious affairs of Tirumala Tirupati Balaji Temple)

तिरुमाला तिरुपती देवस्थानम ट्रस्टने विविध कार्यासाठी जवळपास १६,००० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ट्रस्टने मंदिरात ३५ घराण्याच्या बाहेरील पुजाऱ्यांची देखील नियुक्ती केलेली आहे. अशातच मंदिरातील मुख्य पुजाऱ्याला प्रताधन आराधक नावाने ओळखले जाते. त्यांची नियुक्ती वंशपरंपरागत पद्धतीने होते. त्यांना ८२,००० रुपये दर महिना वेतन दिला जातो.

================

हे देखील वाचा : George Soros : सोरोस खरचं प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडमसाठी पात्र होता का ?

================

इतर मुख्य पुजारी देखील वंशपरंपरागत पद्धतीने नियुक्त केले जातात. त्यांना ५२,००० आणि अन्य खर्च दिले जातात. वंशाबाहेरील पुजाऱ्यांना त्यांचा अनुभवानुसार ३०,००० ते ६०,००० वेतन दिले जाते. या पुजाऱ्यांच्या निवाससाठी स्वतंत्र व्यवस्था देखील आहे. त्यांना त्यांच्या पगारासोबतच व्यतिरिक्त अन्य भत्ते देखील मिळतात. पुजाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६५ वर्ष आहे. (priests of Tirupati Balaji) त्यानंतर काही पुजाऱ्यांना निवृत्ती वेतन देखील दिले जाते. मात्र चार घराण्याच्या बाहेरील पुजाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन दिले जात नाही.

दरम्यान आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर जगातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते. या मंदिराच्या मालकीचे हजारो किलो सोने असून, ज्याची किमती कोटींमध्ये आहे. यासोबतच या मंदिराकडे हजारो कोटींची रोख रक्कम देखील आहे. शिवाय अनेक कोटी रुपयांची एफडी देखील मंदिराच्या नावावर आहे, ज्याचे विजय देखील कोटींमध्ये येते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.