Home » गरबा केल्याने आरोग्यास होतात ‘हे’ फायदे

गरबा केल्याने आरोग्यास होतात ‘हे’ फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Dandiya Playing Benefits
Share

सध्या नवरात्रीचे दिवस सुरु आहेत. सगळीकडे चैतन्यमय, भक्तिमय वातावरण आहे. या नवरात्रोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे अतिशय जल्लोषात आणि उत्साहात होणार गरबा आणि दांडिया. या नऊ दिवसांमध्ये सगळेच लोकं त्यांचे दिवसभरातील कामं आटोपून संध्याकाळी मोठ्या आनंदाने गरबा खेळतात. दिवसभराचा कामाचा कितीही थकवा असला तरी हा गरबा आणि दांडिया खेळणे काही चुकत नाही.

रास गरबा म्हणजे नवरात्राचे मोठे वैशिट्य आहे. लोकनृत्य असलेला गरबा कोणाला आवडत नाही असे लोकं अगदी बोटावर मोजण्याइतकेच असतील. गरबा खेळायला आवडणारे लोकं तर नवरात्रांमध्ये गरबा खेळण्यासाठी खास गरबा शिकायचे क्लासेस देखील लावतात. तुम्हाला माहित आहे. केवळ आनंद मिळवण्यासाठी आणि देवीची भक्ती करण्यासाठी खेळला जाणारा हा गरबा अतिशय आरोग्यदायी आहे. या गरबा खेळण्याचे आपल्या शरीराला मोठे फायदे होतात. चला जाणून घेऊया या फायद्यांबद्दल.

गरबा एक उत्तम कार्डियो व्यायाम प्रकार आहे. गरबा हे झुंबाशी मिळत्या-जुळत्या नृत्याचा प्रकार आहे. रस गरबा कॅलरी जाळण्याचे उत्तम माध्यम आहे. गरबाच्या वेगवान हालचालींनी शरीराचा संपूर्ण व्यायाम होतो. जे लोक नवरात्राच्या महिन्यापूर्वीच गरब्याचा सराव सुरू करतात ते जवळपास ३ – 4 किलो वजन सहजपणे कमी करू शकतात. यासोबतच गरब्याचे आरोग्यास होणारे इतर फायदे देखील जाणून घेऊया.

वजन कमी
वजन लवकर कमी करणे हे योग्य पद्धतीने गरबा करण्यावर अवलंबून असते. गरब्याच्या वेगवेगळ्या स्टेप्स केल्याने शरीराला योग्य आकार मिळतो.

स्मरणशक्ती वाढते
विशिष्ट वयाचे लोक गरबा करत असतील तर त्यांना डिमेंशिया किंवा विसरण्याचा आजार होत नाही. गरबा केल्याने मेंदूतील हिप्पोकॅम्पस मेंदूला नियंत्रित करून स्मरणशक्ती वाढवतो. यामुळे फ्रोझन शोल्डरची समस्या देखील दूर होते.

Dandiya Playing Benefits

लवचिकपणा वाढतो
गरब्यामध्ये हातांपासून पाय, कंबर आणि डोक्यापर्यंत हालचाल होते. यामुळे शरीराचा लवचिकपणा वाढतो. सांधेदुखीचा त्रासही यामुळे कमी होतो. गरबा कायम करत राहणे फिटनेससाठी खूप फायद्याचे ठरू शकते.

हृदय राहील निरोगी
गरबा हा कार्डियो व्यायाम आहे. त्यामुळे गरबा केल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. तसेच फुफ्फुसे निरोगी राहतात आणि श्वासाशी संबंधित आजारांपासून बचाव होतो. यासोबतच गरबा केल्याने रक्त प्रवाह वाढतो आणि त्वचा, केसांशी संबंधित समस्यादेखील दूर होतील.

फुफ्फुस मजबूत होतात
गरबा खेळताना त्यात गतीचेही भान ठेवावे लागते. यात तुम्हाला दीर्घ श्वास घेऊन सोडावा लागतो. ही प्रक्रिया जवळपास प्राणायामाच्या जवळ जाणारी असते. यामुळे फुफ्फुस मजबूत होतात.

ताण दूर होतो
दांडिया – गरबा खेळल्याने मनावरील ताण दूर होतो. हा डान्स खूपच उत्साहवर्धक असून, गरबा करताना व्यक्तीला आनंद वाटतो आणि त्याच्या शरीरातील ऊर्जा देखील वाढू लागते.

कंबरेची चरबी कमी होते
जर कंबरेची चरबी कमी करायची असेल तर दांडिया गरबा खूप उपयुक्त ठरू शकतो. दांडियाच्या माध्यमातून शरीराला व्यायाम होतो, त्यामुळे कंबरेची चरबीही कमी होऊ लागते. रोज देखील दांडियाचे काही स्टेप्स करून चरबी कमी करता येते.

========

हे देखील वाचा : नवरात्राची तिसरी माळ – चंद्रघंटा देवी

========

एनर्जी आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी
गरबा एका तासापेक्षा जास्त काळ सतत नृत्य केला जातो, ज्यामुळे तुमची सहनशक्ती आणि ऊर्जा वाढते. याचा नियमित सराव केल्याने तुमचे शरीर थकवा चांगल्या प्रकारे हाताळण्यास शिकते.

स्नायू मजबूत होतात
गरबा तुमच्या संपूर्ण शरीराचे स्नायू, विशेषतः पाय आणि पोटाचे स्नायू सक्रिय करतो. हे स्नायूंना बळकट करण्यास मदत करते आणि शरीराची लवचिकता वाढवते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.