आपण नेहमीच टाइमपास म्हणून फुटाणे खातो. फुटाणे खायला सगळ्यांना आवडतात. त्यातही जर ते भाजलेले आणि मीठ लावलेले असतील तर विचारायलाच नको. फुटाणे खाणे म्हणजे वेळ घालवण्याचे साधन अजिबातच नाहीये. कारण हे फुटाणे खाणे म्हणजे टाइमपासचे काम नाही तर आरोग्यसाठी फायदेशीर आहे. फुटाणे खाल्ल्याने आपल्या शरीरास अनेक लाभ होतात. हिवाळ्यामध्ये तर फुटाणे खाणे खूपच उत्तम मानले गेले आहे.
पोटाचा त्रास असेल किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, शरीरात रक्ताची कमतरता असेल तर आहारात भाजलेल्या हरभऱ्याचा म्हणजेच फुटाण्यांचा समावेश करणे अतिशय फायदेशीर ठरू शकते. फुटाण्यामध्ये प्रथिने, फोलेट, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फायबर सारखे गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात. फुटाणे गुळासोबत खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता देखील दूर होते. याच्या नियमित सेवनाने तुमचा रक्तदाब नियंत्रित राहून वजन कमी करण्यातही मदत होते.
रोगप्रतिकार क्षमता वाढते
दररोज नाष्टा करताना किंवा दुपारी जेवणाच्या आधी फुटाणे खाल्ले की रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती वाढल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो. त्याशिवाय बदलत्या हवामानानुसार होणाऱ्या शारीरिक समस्याही दूर होतात.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
जर तुम्हाला पटकन वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारात फुटाण्याला नक्कीच स्थान द्या. फुटाणेमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते, जे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते. यासाठी सकाळी रिकाम्या पोटी मूठभर फुटाणे खाल्ल्याने तुम्ही तुमचे वजनही नियंत्रणात ठेवू शकता.
मूत्रासंबंधी रोग
फुटाणे खाल्ल्याने मूत्रासंबंधी समस्या दूर होतात. ज्यांना सतत युरिन होण्याची समस्या असेल अशा लोकांनी फुटाणे आणि गूळ दररोज खाल्ल्याने काही दिवसांत फरक दिसेल.
बद्धकोष्ठता
ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, त्यांना दररोज फुटाणे खाल्याने फायदा होतो. बद्धकोष्ठता शरीरातील अनेक आजारांचे मूळ कारण ठरते. बद्धकोष्ठता असल्यास दिवसभर आळस, अस्वस्थता जाणवते.
पचनशक्ती वाढवते
फुटाणे पचनशक्ती संतुलित करण्याचे काम करतात. चण्यामुळे रक्त शुद्ध होते. त्यामुळे त्वचा तजेलदार होण्यासही फायदा होतो. चण्यामध्ये फॉस्फरस असते, ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढते आणि किडनीतील अतिरिक्त मीठही निघून जाते.
मधुमेहासाठी फायदेशीर
मधुमेही रुग्णांसाठीही भाजलेले चणे गुणकारी आहेत. भाजलेले चणे ग्लुकोजचे प्रमाण धरून ठेवते. त्यामुळे मधुमेहही नियंत्रणात राहतो. मधुमेहींनी दररोज भाजलेले चणे खाल्ल्याने ब्लड-शुगर लेव्हल कमी होते. यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात असते.
रक्त स्वच्छ करते
रोज सकाळी रिकाम्या पोटी फुटाणे खाल्ल्याने शरीरात साचलेले टॉक्सिन सहज निघून जातात. फुटाणे रक्त स्वच्छ करण्यासही मदत करतो. यामुळे त्वचा सुधारते, रक्त शुद्ध होते आणि रक्ताशी संबंधित समस्या दूर होतात.
हृदयासाठी फायदेशीर
फुटाण्यांमध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदय निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे. यामुळे हृदयविकारापासून बचाव होतो. शरीरातील महत्त्वाच्या अवयवांमध्ये रक्तप्रवाह सुधारतो. रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करते. हृदयाची लय बरोबर ठेवते. याशिवाय रक्तदाबही सामान्य राहतो.
ब्लड प्रेशर नियंत्रण
हरभऱ्यामध्ये फॅट आणि कॅलरीजचे प्रमाण कमी असते आणि त्यात प्रथिने आणि फायबर भरपूर असते. याशिवाय फुटाण्यामध्ये असलेले कॉपर, मॅगनीज आणि मॅग्नेशियम रक्तवाहिन्यांना आराम देऊन सूज कमी करण्यास मदत करतात. मॅगनीज ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करते. यात फॉस्फरस असतो, जो रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.
(टीप : कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)