Home » नियमित सायकलिंग केल्यास मिळतील ‘हे’ मोठे फायदे

नियमित सायकलिंग केल्यास मिळतील ‘हे’ मोठे फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Cycling
Share

जवळपास ५० / ६० वर्षांपूर्वी ज्या घरात सायकल असायची तो व्यक्ती ते घर श्रीमंत समजले जायचे. मात्र जसा काळ पुढे सरकला तशी सायकलची जागा टू व्हिलर मग फोर व्हिलरने घेतली. सायकल आपल्याला कमीपणाचे प्रतीक वाटू लागली. मात्र आज कोट्यवधींच्या गाड्या घरात असल्या तरी सायकल देखील घरात असतेच असते. आता जे नियमित सायकल चालवतात आणि ज्यांना माहिती सायकल चालवण्यामुळे काय फायदे होतात ते त्यांच्या घरात सायकल ठेवतातच.

आजच्या धकाधकीच्या काळात लोकं आपले आरोग्य जपण्यासाठी बक्कळ पैसा खर्च करून जिमला जातात, योग्य करतात, विविध प्रकारचे डाएट करतात, मात्र तरीही त्यांना अपेक्षित परिणाम दिसत नाही. उत्तम आरोग्यासाठी आणि शरीराची निगा राखण्यासाठी आजच्या काळातला अतिशय सोपा आणि विना खर्चिक उपाय म्हणजे रोज नियमित सायकल चालवणे.

सायकल चावलण्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात आणि शरीर सुडौल राहण्यास मदत होते. सायकल चालवणे केवळ तुमच्या शारीरिकच नाही तर तुमच्या मानसिक आरोग्यासाठीही चांगले आहे. शिवाय सायकल ही आपल्या निसर्गाच्या पर्यावरणाच्या दृष्टीने देखील खूपच उत्तम आहे. सायकल चालवण्यामुळे नक्की कोणते आणि कसे फायदे होतात हे आपण जाणून घेऊया.

– तज्ज्ञांच्या माहितीनुसार ज्या लोकांना स्मरणशक्तीशी संबंधित समस्या आहेत, अशा लोकांनी सायकल चालवणे आवश्यक आहे, यामुळे त्यांची स्मरणशक्ती तीक्ष्ण होते.

– सायकल चालवल्याने शरीराचा खालचा भाग मजबूत होतो. यामुळे टोन्ड स्नायू, वासरे आणि क्वाड्रिसेप्स होतात.शरीराला उत्तम ठेवण येण्यासाठी सायकलिंगची चांगली मदत होते.

Cycling

– अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी सायकलिंग हा एक उत्तम मार्ग आहे. सायकलिंगमुळे तुमची चयापचय क्रिया वाढते आणि तुमच्या शरीरातील अतिरिक्त वजन कमी करून लठ्ठपणा कमी होतो.

– दररोज २५ ते ३० मिनिटे सायकल चालवल्यास रात्री चांगली झोप लागते. सायकल चालवल्याने शरीराचे स्नायू ताणले जातात त्यामुळे शरीर थकते आणि छान झोप लागते.

– सायकलिंग केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते आणि त्यामुळे त्वचेच्या पेशींना चांगले पोषक तत्व मिळतात. यामुळे त्वचेवर चमक येते आणि तुम्ही तरुण राहता.

– सायकलिंग शरीरात आवश्यक प्रथिनांचे उत्पादन वाढवून, पांढऱ्या रक्त पेशींना उत्तेजित करून आपली प्रतिकारशक्ती सुधारते. सायकलिंग केल्याने माणसाची सहनशक्तीही वाढते.

– सायकल चालवल्याने नैराश्य, चिंता आणि तणाव टाळण्यासही मदत होते. याशिवाय सायकल चालवल्याने आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात. ज्यामुळे मूड सुधारतो. रोज काही तास सायकल चालवल्याने झोपही चांगली लागते.

– सायकल चालवल्याने खालच्या शरीरातील सांधे निरोगी राहण्यास मदत होते आणि ऑस्टियोआर्थरायटिसचा धोका कमी होतो. तसेच हृदयाचा आणि कोलेस्ट्रॉलचा धोका देखील कमी होतो.

– सायकल चालवणे हाडांची घनता वाढवते आणि स्नायूंवर ताण देऊन हाडांची ताकद सुधारते. नियमित सायकलिंगमुळे शरीराची साचेबद्ध हाडे मजबूत राहतात.

– सायकलिंग मुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो. विशेषतः हृदय आणि फुफ्फुसांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे फायदेशीर आहे.

– नियमित सायकल चालवण्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते, ज्यामुळे मधुमेहाच्या धोक्याचा सामना करता येतो. तसेच, मधुमेह झालेल्या लोकांसाठी सायकलिंग हे योग्य व्यायाम आहे.

– सायकल चालवणे सांध्यांना आवश्यक ताण आणि लवचिकता देते. यामुळे सांधे आणि स्नायूंची लवचिकता वाढून शरीर सशक्त होते.

(टीप : वरील माहितीमधून आम्ही कोणताही दावा करत नाही. कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ल्या घ्या)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.