Home » Nepal : ‘ही’ आहेत नेपाळमधील प्रसिद्ध टुरिस्ट डेस्टिनेशन

Nepal : ‘ही’ आहेत नेपाळमधील प्रसिद्ध टुरिस्ट डेस्टिनेशन

by Jyotsna Kulkarni
0 comment
Nepal
Share

नेपाळमधल्या Gen-Z आंदोलनाने जगातील सर्वच लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर घातलेल्या बॅनमुळे आणि देशात होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात आता तरुणाई रस्त्यावर उतरली असून त्यांनीच हे Gen-Z आंदोलन सुरु केले आहे. नेपाळमधील तरुणांनी सरकार विरोधात घोषणा देताना जाळपोळ करत अनेक गोष्टींची तोडफोड देखील केली आहे. या आंदोलनाचे स्वरूप पाहून नेपाळचे पंतप्रधान असलेल्या केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे आता नेपाळमध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले आहे. (Nepal News)

नेपाळ अतिशय छोटा आणि सुंदर देश आहे. भारताच्या शेजारीच असलेल्या या देशातही हिंदू धर्मीय जास्त असून अनेक मंदिर आणि हिंदी भाषिक लोकं सहज आढळतात. निसर्गाने मुक्तहस्ताने या देशावर सौंदर्याची उधळण केली आहे. त्यामुळे हा देश कायमच पर्यटकांना आकर्षित करत असतो. उंचच उंच शिखरे, हिमालय पर्वत, दऱ्या, प्राचीन ऐतिहासिक मंदिर आणि येथील जेवण पर्यटकांचे खास आवडते आहे. आज आपण या लेखातून नेपाळमधील मुख्य पर्यटन ठिकाणांबद्दल जाणून घेऊया. (Marathi News)

काठमांडू
मंकी टेंपल, बौद्धनाथ स्तूप ही नावे तुम्ही ऐकली असतील. ही ठिकाणं पाहण्यासाठी तुम्हाला नेपाळची राजधानी काठमांडूला जावे लागेल. या ठिकाणी असलेली शांतता पर्यटकांना खूपच आवडते. यासोबतच येथे असणारे भगवान शिवाला समर्पित पशुपतीनाथचे मंदिर. पशुपतीनाथ मंदिर नेपाळमध्ये खूप प्रसिद्ध आहे. हे मंदिर काठमांडू शहराच्या पूर्वेला 3 किमी अंतरावर सुंदर आणि पवित्र बागमती नदीच्या काठावर आहे. (Latest Marathi News)

Nepal

भक्तपूर
काठमांडू व्हॅलीमध्ये असलेलं भक्तपूर हे ठिकाणं पर्यटकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. भक्तपूर नेपाळमध्ये फिरणाऱ्या लोकांचे आवडते ठिकाण आहे. भक्तपूरला भक्तांचे शहर किंवा भक्तांची नदी देखील म्हटले जाते. नेपाळमध्ये फिरायला गेल्यानंतर सर्व पर्यटक या ठिकाणी जातातच. (Top Stories)

Nepal

लुंबिनी
भगवान बुद्धांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले लुंबिनी हे एक महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. येथे पर्यटक मायादेवी मंदिर आणि लुंबिनी गार्डनला बघण्यासाठी येतात. हे स्थळ जागतिक वारसा असलेले स्थळ आहे. (Top Marathi Headline)

Nepal

गोरखा
नेपाळच्या जुन्या राजघराण्याशी संबंधित गोरखा हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. येथे गोरखा किल्ला, गोरखा म्युझियम सोबतच रामेश्वर महादेव मंदिरही प्रसिद्ध आहे. (Todays Marathi Headline)

Nepal

पोखरा
पोखरा हे नेपाळचे प्रमुख हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी पर्यटक या हिल स्टेशनला भेट देतात. फेवटल, सारंगकोट, डेव्हिस फॉल्स ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत. (Marathi Latest News)

Nepal

सागरनाथ
सागरनाथ हे नेपाळमधील एक राष्ट्रीय उद्यान आहे, ज्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. येथून तुम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्प, नामचे बाजार आणि माउंट एव्हरेस्टचे दृश्य पाहू शकता. (Marathi Trending News)

Nepal

स्वयंभूनाथ
हा बौद्ध स्तूप काठमांडूच्या पश्चिमेला एका टेकडीवर वसलेले आहे आणि त्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. हे ठिकाण त्याच्या अद्वितीय वास्तुकला आणि नयनरम्य दृश्यासाठी प्रसिद्ध आहे. (Social News)

Nepal

सारणकोट
या ठिकाणाहून अन्नपूर्णा आणि धौलगिरी पर्वतांना पाहता येते. येथील सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटक लांबू येतेय आणि वाट बघतात.

Nepal

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.