Home » Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Sade Sati
Share

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक दिसून येते. म्हणजे अगदी दररोजची लहान मोठी कामे देखील शुभवेल, शुभकाळ पाहून करणारी मंडळी देखील आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसून येतील. याच ज्योतिषशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ग्रह आणि ताऱ्यांचा आपल्या जीवनावर होणार परिणाम. ग्रह तारे मनुष्याच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकतात हे ज्योतिषशास्त्र कायम सांगत असते. याचाच एक भाग म्हणजे साडे साती. अवकाशातील ग्रहांची स्थानं बदलली की, त्याचा चांगला वाईट परिणाम माणसाच्या आयुष्यावर होतो हे अनेकदा सांगितले जाते. साडे साती हा याच ग्रहांच्या बदलीचा एक भाग आहे. (Sade Sati)

आता साडे साती म्हटले की, भल्या भल्या लोकांना घाम फुटतो, टेन्शन येते. कारण साडे साती हा काळ म्हणजे वाईट, नकारात्मक फळ देणारा समजला जातो. आपण कायमच ऐकत आलो आहे की, साडे साती बापरे..आता तुमचा कठीण काळ सुरु झाला. सांभाळून राहा…कायम साडे सातीबद्दल आपल्याला भीतीच घालण्यात आली आहे. मात्र ही साडे साती नक्की आहे तरी काय?, साडे साती किती काळ असते?, साडे सातीमध्ये सर्व वाईटच होते का?, साडे सातीवर उपाय काय? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण आज या लेखातून जाणून घेऊया.

मनुष्याच्या जीवनात शनिदेवाच्या कृपेला विशेष महत्त्व आहे. एवढेच नाही तर आपल्या ज्योतिषशास्त्रात कलियुगाचा दंडाधिकारी म्हणून शनि देवाचे वर्णन केले गेले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव कर्माच्या आधारे फळ देतात. हिंदू धर्मात शनिदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. शनिवारी शनिदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. याच शनि देवाची अवकाशात चाल बदलली की त्या व्यक्तीच्या आयुष्यात साडे सतीला प्रारंभ होतो. प्रत्येक व्यक्तीच्या जन्मावेळी शनि विशिष्ट राशीत विराजमान असतो. त्याची कायम पुढे चाल सुरूच राहते. त्यामुळे सद्यस्थितीत शनि कोणत्या राशीत आहे यावरूनच आपल्याला त्याचे फळ मिळते. आपल्या जन्मराशीच्या आधीच्या राशीत शनीचा प्रवेश झाला की, तो असतो ‘साडेसातीचा प्रारंभ’. (Latest Marathi News)

Sade Sati

ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या साडेसातीचे तीन प्रकार आहेत, पहिला लग्नाशी संबंधित आहे, दुसरा चंद्र लग्न किंवा राशीशी संबंधित आहे आणि तिसरा सूर्य लग्नाशी संबंधित आहे. उत्तर भारतात चंद्रावरून शनीची साडेसाती काढण्याची पद्धत प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. यानुसार शनिदेव जेव्हा चंद्र राशीतून पारगमन करतात तेव्हा ती साडेसाती मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार शनीची साडेसाती साडेसात वर्षे राहते. ज्याच्या आयुष्यात साडेसाती असेल, ती साडेसात वर्षांपर्यंत टिकते, २२ वर्षांनी पुन्हा तुमच्या आयुष्यात शनीची साडेसाती येते. (Top Marathi HEadline)

साडे सातीचा हा कालावधी व्यक्तीच्या जन्म राशीवरून मोजला जातो. जेव्हा शनी ग्रह एखाद्या राशीत भ्रमण करतो, तेव्हा त्या काळाला साडेसाती म्हणतात. प्रत्येक राशीत शनी साधारणपणे २ वर्षे ६ महिने राहतो. त्यामुळे तीन राशी मिळून ७ वर्षे ६ महिने म्हणून “साडेसाती” असे ज्य़ोतिषशास्त्र सांगते. जेव्हा शनी आपल्या राशीच्या आदल्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा तिथं अडीच वर्षे राहतो. मग पुढचे अडीच वर्षे आपल्या जन्मराशीत घालवतो. तर तिसरे अडीच वर्षे आपल्या पुढच्या राशीत काढतो. जर शनी वक्र अवस्थेत असेल तर हा साडेसात वर्षांचा काळ ९ वर्षांचाही होऊ शकतो. (Marathi Headline)

साडेसातीच्या वेळी, शनी एखाद्या व्यक्तीने केलेल्या भूतकाळातील कर्माचा हिशोब घेतो, ज्याप्रमाणे घराची संपूर्ण जबाबदारी घेणार्‍या व्यक्तीला काही काळानंतर हिशेब मागितला जातो आणि चूक केल्याबद्दल त्याला कोणत्या प्रकारची शिक्षा मिळते असेच काहीसे साडेसातीच्या काळात घडते. आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार, साडेसाती म्हणजे शनीमहाराजांनी घेतलेली परीक्षा. आपल्या हातात कुठलंही काम पटकन न येणं, आपल्या हातातली कामं दुसऱ्याला जाणं, अशा गोष्टींचा यात समावेश असतो. (Marathi)

साडेसातीमुळे केवळ दुःख किंवा त्रासच होतो असे नाही, तर या काळात फक्त कर्माचे फळ मिळत असते. ज्यांनी भूतकाळात सत्कर्म केले आहे, लोकांची मदत केली आहे, कुणाचेच वाईट केलेले नसेल त्यांंच्यासाठी हा काळ सुवर्ण काळ असतो. साडेसाती तीस वर्षांतून एकदा प्रत्येक माणसावर नक्कीच येते. धनु, मीन, मकर किंवा कुंभ राशीत असेल तर त्रास कमी होतो, पण चौथ्या, सहाव्या, आठव्या, बाराव्या राशीत असेल तर मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या त्रास होतो. मात्र हे सर्वस्वी प्रत्येकाच्या कर्मावर अवलंबून असते. (Top Trending News)

सध्या कुंभ, मीन आणि मेष राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती चालू आहे. यावर्षीच मकर राशीची साडे साती समाप्त झाली असून, मेष राशीला साडेसाती लागली आहे. २०२५ मध्ये शनिने मीन राशीत प्रवेश करताच, मकर राशीच्या लोकांवर सुरू असलेली साडेसाती समाप्त झाली आणि मेष राशीच्या लोकांची साडेसाती सुरू झाली आहे. त्याचवेळी मीन राशीच्या लोकांवर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, कुंभ राशीच्या लोकांवर असलेल्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. (Astrology)

Sade Sati

साडेसाती लागली म्हटल्यावर अनेकजण घाबरून जातात. मात्र यापेक्षा आपण त्या काळातून स्वतःचा बचाव कसा करू शकतो याकडे लक्ष द्यायला हवे. साडेसाती ही संपवता येत नाही. ती भोगावीच लागते. या काळात तुमच्या कर्माचा न्याय देखील होतो. त्यामुळे साडे सातीच्या दरम्यान सकारात्मक विचार ठेवून चांगले कर्म करावेत. शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी काही उपाय करावेत यामुळे देखील साडेसातीच्या काळात कमी त्रास होतो. पाहुयात ज्योतिषशास्त्रानुसार साडेसातीच्या काळात कोणते उपाय करणे लाभदायक ठरते. (Top Stories)

शनि साडेसातीचे उपाय
– शनिवारी लोखंड, काळी उडीद डाळ, काळे तीळ किंवा काळे कापड दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. शनी दशेत हा उपाय केल्याने तुम्ही शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून दूर राहू शकता. (Marathi News)
– पिंपळाच्या झाडामध्ये शनिदेव वास करतात असे मानले जाते. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावून शनिदेवाची विशेष आशीर्वाद प्राप्त होते. यासोबतच शनि स्तोत्राचे पठण केल्याने साडेसातीमध्ये आराम मिळतो.
– साडेसातीच्या काळात नियमितपणे शनी मंदिरात जाऊन शनीचे दर्शन घ्यावे. तसेच मुख्यत्वे शनिवारी विशेष करून शनिदेवाला तेल वहावे. यामुळे आपल्या डोक्यावरील कर्ज कमी होते असे म्हणतात. आर्थिक अडचणी येत असतील तर हा उपाय शनिवारच्या दिवशी करावा. असे ११ किंवा २१ शनिवार तरी करावे. (Top Marathi News)
– शनिवारी कोणत्याही शनि मंदिरात जाऊन मोहरीचे तेल काळे तीळ आणि लोखंडी खिळे मिसळून शनिदेवाला अर्पण केल्यास साडेसातीच्या प्रभावापासून आराम मिळेल.
– शनिवारी हनुमानजींची पूजा केल्याने, हनुमान चालिसाचा पाठ केल्यानेदेखील शनिदेवाच्या प्रभावामुळे शांती मिळते आणि अशुभ परिणाम कमी होतात. (Latest Marathi Headline)

=========

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

=========
– साडेसातीच्या काळात हनुमानजींची पूजा करण्याचे देखील सांगितले जाते. या दरम्यान तुम्ही नियमितपणे हनुमानचालीसा पठण करावी. तसेच सुंदरकांडचा पाठ करावा, रामस्तुती म्हणावी याने हनुमानजी प्रसन्न होतात आणि कृपा करतात. त्यामुळे साडेसातीचा प्रभाव कमी होतो. (Top Trending News)
– शनिवारी नियमितपणे सकाळी पक्ष्यांना धान्य आणि पाणी दिल्याने शनिदेव प्रसन्न होतात. शिवाय शनिवारी मुंग्यांना पीठ आणि साखर दिल्यानेही साडेसतीचा प्रभाव कमी होतो.
– शनिवारी सूर्याला जल अर्पण करा आणि चुकीचे किंवा अयोग्य काम टाळा. शनिवारी सकाळी आणि संध्याकाळी जेवणात काळे मीठ आणि काळी मिरी वापरा.
– साडेसातीमध्ये चुकूनही नीलम धारण करू नये, अन्यथा लाभाऐवजी नुकसान होण्याची शक्यता असते, असे म्हणतात. कोणतेही नवीन काम, नवीन उद्योग साडेसात वर्षांत करणे टाळावे, कोणतेही काम करण्यापूर्वी जाणकार ज्योतिषाकडून माहिती घ्यावी. (Social News)

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.