आपल्या भारतीय लोकांचे जेवण म्हणजे वरण, भात, भाजी, पोळी, चटणी, कोशिंबीर. अतिशय साधे आणि सात्विक जेवण आपण जेवतो. शनिवार आणि रविवार असला की अनेकांच्या घरी वेगळे बेत होतात मात्र इतर दिवशी साधे जेवण आपण करतो. मात्र जेवणामध्ये एवढे प्रकार असूनही आपले जेवण एका गोष्टींशिवाय अपूर्ण असते, आणि ती गोष्ट म्हणजे ‘लोणचे’. लोणचे म्हणजे भारतीय लोकांचा जीव की प्राण असतो. सध्या खाण्याला एका क्षणात चविष्ट बनवण्याची ताकत या लोणच्यांमध्ये असते. अतिशय चटपटीत असलेल्या लोणच्याचे नाव जरी काढले तरी तोंडाला पाणी सुटते. (Food)
आपल्या देशातील प्रत्येक घरामध्ये लोणचे असते म्हणजे असते. बाजारात देखील रेडिमेड लोणचे अगदी सर्रास मिळते. मात्र घरच्या लोणच्याची चव बाहेरच्या लोणच्याला नाही. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये आपल्या घरातील महिला लोणचे बनवण्याचा साग्रसंगीत कार्यक्रम करतात. एकदा बनवलेले लोणचे वर्षभर साठवतात. लोणचे म्हणजे फक्त कैरीचेच नाही तर यात लिंबू, मिरची, गाजर आदी अनेक प्रकारची लोणचे बनवली जातात. आपल्या सर्वांचे जेवण या लोणच्याशिवाय अपूर्ण असते. मात्र अनेकदा डॉक्टर आपल्याला लोणचे न खाण्याचा सल्ला देतात. लोणचे खाणे खरंच आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसते का? नक्की लोणचे खाल्ल्याने कोणते फायदे आणि तोटे होतात चला जाणून घ्या. (Pickle)
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, लोणचे खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन बी 12 मिळते. लोणचे खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. त्यात मोहरीचे दाणे म्हणजेच राई, मेथीचे दाणे आणि इतर अनेक मसाले वापरले जातात. हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. लोणचे खाणे पचनसंस्थेसाठी देखील चांगले मानले जाते. शिवाय आंब्याच्या लोणच्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम इत्यादी अनेक पोषक घटक आढळतात. दैनंदिन आहारात आंब्याच्या लोणच्याचा मर्यादित प्रमाणात समावेश केल्यास त्वचा, मज्जातंतूंचे कार्य, डोळे, स्नायू इत्यादी निरोगी राहतात. (Marathi News)
मुख्य म्हणजे सर्वाधिक लोकप्रिय असलेले कैरीचे लोणचे हे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असते, जे शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करते. यामुळे शरीरातील पेशींचे नुकसान होऊन जुनाट आजार आणि वृद्धत्व होऊ शकते. मसाल्यांमध्ये, हळद आणि मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे संपूर्ण आरोग्यासाठी फायदा होतो. कैरीचे लोणचे पचनशक्ती निरोगी ठेवते. मोहरी, हिंग, मेथी, हे सर्व मसाले पोटासाठी खूप आरोग्यदायी आहेत. हे मसाले पाचन तंत्र आणि एन्झाईम्स उत्तेजित करतात, ज्यामुळे पचन सुधारते. पोषणाचे शोषण योग्य प्रकारे होते. कैरीमध्ये फायबर असल्यामुळे ते बाउल मुव्हमेंट योग्य ठेवते आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवत नाही. (Todays Marathi Headline) 
कैरीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्याने ते रोगप्रतिकारशक्ती वाढवते. व्हिटॅमिन सी पांढऱ्या रक्त पेशी तयार करण्यास मदत करते. संक्रमणाशी लढण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. कैरीच्या लोणच्यामध्ये टाकलेली हळद दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्मांनी समृद्ध आहे, जे लोणच्यातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. कैरीच्या लोणच्यामध्ये असलेले घटक रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित करतात. मेथीच्या दाण्यांमध्ये असलेले गुणधर्म साखरेची पातळी नियंत्रित करतात. (Marathi Trending Headline)
कैरीच्या लोणच्यामध्ये मिरची पावडर आणि मोहरी चयापचय वाढवण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, ते चरबी जाळण्याच्या प्रक्रियेस देखील प्रोत्साहन देते. अशा परिस्थितीत याच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते. कैरीमध्ये फायबर देखील असते, ज्यामुळे जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते. कैरीच्या लोणच्यामध्ये पोटॅशियम असते जे निरोगी रक्तदाब पातळी राखण्यासाठी प्रभावी आहे. मेथीच्या बियांमध्ये असलेले हळदीचे दाहक-विरोधी गुणधर्म आणि कोलेस्ट्रॉल-कमी करणारे प्रभाव हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य चांगले राखतात. मात्र घरगुती, स्वच्छ तेलात आणि मर्यादित मीठात बनवलेले लोणचं थोड्या प्रमाणात खाल्ल्यास ते चव वाढवण्यासोबतच काही फायदेशीर प्रोबायोटिक गुणही देऊ शकते. (Top Marathi Headline)
लोणच्याचे अतिसेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी अचानक वाढू शकते आणि इतर समस्या देखील उद्भवू शकतात. याचे कारण म्हणजे, लोणच्यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. तसेच, त्यात वापरलेले मसाले हे बऱ्याचदा पूर्णपणे भाजलेले नसतात. लोणच्याचा जास्त वापर केल्याने आपल्या पोटातील आम्लता वाढते. तसेच त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने अॅसिडिटी, गॅस, करपट ढेकर येणे सारख्या समस्या उद्भवू शकतात. (Latest Marathi News)
लोणच्यांमध्ये मसाले आणि तेल याप्रमाणेच मिठाचे प्रमाणही जास्तच असते. सोडियमचा अर्थात मिठाचा जास्त प्रमाणात वापर केल्यास उच्च रक्तदाब आणि आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू शकतात. लोणच्याचे नियमित सेवन केल्यास अल्सरची समस्या उद्भवू शकते. याचे कारण म्हणजे त्यात वापरले जाणारे व्हिनेगर. व्हिनेगर हे अल्सरचे मुख्य कारण आहे. काही लोणच्यांमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्सही असतात, जे दीर्घकाळात पचनावर परिणाम करू शकतात. (Top Trending News)
============
Protein : प्रोटीन पावडर घेणे खरंच आरोग्यासाठी लाभदायक?
============
अतिसार, उलट्या, छातीत जळजळ आणि आम्लपित्त यासारख्या समस्या असलेल्यांनी देखील लोणचे खाणे टाळावे. रक्तदाब, मधुमेह, यकृत, हृदय किंवा मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्यांनी देखील लोणचे टाळावे. गर्भवती महिला आणि लहान मुलांनी देखील लोणचे टाळावे. प्रत्येकाने मर्यादित प्रमाणात लोणचे खावे. ते भरपूर मीठ, तेल आणि मसाल्यांनी बनवले जाते. म्हणून, जास्त लोणचे खाल्ल्याने उच्च कोलेस्ट्रॉल किंवा उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो. ज्या लोकांना अॅसिडिटीचा त्रास आहे त्यांच्यासाठी जास्त लोणचे खाल्ल्याने या समस्या वाढू शकतात. (Social News)
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. )
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
