जिथे पूर्वी माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन महत्वाच्या गरज समजल्या जायच्या, तिथे आज सर्वात मोठी आणि महत्वाची गरज पैसा (Money) झाली आहे. आजच्या २१ व्या दशकात पैसाच सर्वस्व मानले जात आहे. या पैशाशिवाय एक साधी पिन देखील आपण घेऊ शकत नाही. असा हा पैसा प्रत्येकाकडे किती जरी असला तरी कमीच वाटत असतो. लक्ष्मी आणि कुबेर या दोन व्यक्ती सोडल्या तर सगळ्यांनाच पैसा पाहिजे. काही जणं पैसे कमवण्यासाठी अफाट मेहनत घेतात. तर काही पैसा कमवण्यासाठी सोप्या, चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात. एकूणच काय तर प्रत्येकाला हातात भरपूर पैसा पाहिजे. (Chanakya)
तुमच्या आमच्यासारखे मध्यमवर्गीय लोकं जे सरळ मार्गाने मेहनतीने पैसा कमवण्यासाठी जीवाचे रान करतात आणि आपले जीवन जगत असतात. खर्च बचत यांची सांगड घालण्यातच मध्यमवर्गीय माणूस त्याचे संपूर्ण आयुष्य खर्ची करतो. पैसा टिकण्यासाठी, बचत होण्यासाठी आणि घरात जास्त पैसे यावा साठी सगळेच काही छोटे छोटे ज्योतिष्याचे, फेंगशुईचे उपाय करताना दिसतात. मात्र तुम्हाला जाणून कदाचित आश्चर्य वाटेल की, आपल्या भारतातील सर्वात जुने आणि अतिशय हुशार असलेले अर्थतज्ज्ञ अशी ओळख असलेल्या चाणक्य यांनी देखील पैसे टिकण्यासाठी काही उपाय सांगितले आहे. (Chanakya Thoughts For Wealth)
चाणक्य आपल्या भारत देशाचा गौरव म्हणूनच ओळखले जातात. सगळ्यांनीच ‘चाणक्य नीती’ हा शब्द नक्कीच ऐकला असेल. हीच चाणक्य नीती सांगणारे चाणक्य म्हणजे आपल्या आर्यवर्त देशाचे अनमोल रत्न होते. ‘हुशार’ या शब्दाची तुम्ही जेवढी कल्पना करू शकता त्याहून कितीतरी पट चाणक्य हुशार होते. आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. ते भारतीय राजकारण, अर्थशास्त्र आणि नैतिकतेसाठी ओळखले जातात. प्रत्येक समस्येवर उपाय शोधण्यात त्यांचा हातखंडा होता. मानवी जीवनाच्या कल्याणासाठी त्यांनी चाणक्य नीती शास्त्राचा शोध लावला. आचार्य चाणक्य यांनी जीवनाचा मार्ग सुकर करण्यासाठी अनेक मार्ग सांगितले. (Top Stories)
आचार्य चाणक्य हे तक्षशीलेच्या गुरुकुलात अर्थशास्त्राचे आचार्य होते. आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना केली. चाणक्य यांनी लिहिलेला अर्थशास्त्रावरील ‘ कौटिलीय अर्थशास्त्र‘ (Kautilya Arthashastra) हा ग्रंथही प्रसिद्ध आहे. कौटिल्याचे अर्थशास्त्र हा ग्रंथ आजही मोठमोठे अर्थशास्त्रज्ञ अभ्यासताना दिसतात. याच चाणक्य यांनी आपल्या घरात लक्ष्मी अर्थात पैसा टिकाव म्हणून काही उपाय सांगितले आहेत. चाणक्य नीतीमध्ये,अशा काही धोरणांचा उल्लेख आढळतो, ज्या आपण आपल्या दैनंदिन जीवनात अंमलात आणल्यास घरात पैशाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि पैसा आपल्याकडे येऊ लागेल. (Social News)
प्रत्येक व्यक्तीचे कर्म
आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, व्यक्तीच्या आयुष्यात जी काही गरीब श्रीमंत परिस्थिती आहे ती त्या व्यक्तीच्या कर्मामुळे आहे. ज्या लोकांना मेहनत करण्यास कंटाळा येतो ते लोकं कधीच प्रगती करू शकणार नाहीत आणि असे लोकं कायम पैशाअभावी आपले जीवन व्यतीत करतात. असे लोकं त्यांच्या आयुष्यात कधीच प्रगती करू शकत नाहीत. यास्तहीच आपण आपल्या आयुष्यात कायम असे कर्म केले पाहिजे जे आपल्याला नेहमीच प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाईल आणि यश मिळवून देईल. आचार्य चाणक्य यांच्या मते, माणूस त्याच्या कर्मामुळे विचारांनीही श्रीमंत होत असतो.
दानधर्म करणे
चाणक्य नीतीनुसार, जे लोकं कायम दानधर्म करत असतात त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. याचे कारण म्हणजे ज्या लोकांच्या मनात दानधर्माची भावना असते त्यांच्यावर कायम भगवंताचे आशीर्वाद असतात. हेच आशीर्वाद त्यांना आयुष्यात पुढे नेण्यास मदत करतात. अशा चांगल्या लोकांवर देवी लक्ष्मीचा देखील वरदहस्त असतो. आणि ती या लोकांवर नेहमीच प्रसन्न असते. यामुळे या लोकांचे उत्पन्नाचे स्रोत वाढतात.
अन्नाची नासाडी करू नये
ज्या घरात नेहमीच अन्न वाया जाते, तिथे कायम आर्थिक संकट आणि पैशाची कमतरता भासते. ज्या घरात अन्नाचा आदर केला जातो आणि अन्न वाया जाऊ दिले जात नाही तिथे देवी लक्ष्मी नेहमीच वास करते. जिथे लक्ष्मीचा वास असतो तिथे कायम भरभराट असते. आपल्या संस्कृतीत अन्नाला देवाचे स्था देण्यात आले आहे. अन्न अर्थात अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद समजला जातो. जर पैसा टिकाव किंवा आर्थिक प्रगती व्हावी असे वाटत असेल तर सर्वप्रथम घरातील अन्न वाया जाऊ देऊ नका.
=============
हे देखील वाचा : Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कसे झाले ?
=============
अतिथी देवो भव:
चाणक्य नीतीनुसार कायम आपण आपल्या संस्कृतीमध्ये सांगितल्या प्रमाणे पाहुण्यांचे आदरतिथ्य केले पाहिजे. नेहमी आदराने त्यांचे स्वागत केले पाहिजे. ‘अतिथी देवो भव:’ ही आपली भारतीय संस्कृती कायम जपली पाहिजे. जिथे पाहुण्यांचा आदर केला जातो त्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.